mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

तेरा वर्षे प्रेमानं जगले.. दोघांचा शेवटही एकाच दिवशी झाला; भारत पेट्रोलियम कंपनीने मुलाचे पालकत्व स्वीकारावे

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
September 30, 2021
in मंगळवेढा, क्राईम
पतीच्या निधनानंतर 33 वर्षीय पत्नीची आत्महत्या; मंगळवेढयातील दाम्पत्याचा करुण अंत

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मृत्यू हा कोणालाही चुकला नाही… नव्हे तो चुकवताही येत नाही… लग्नानंतर जवळपास १३ वर्षे एकमेकांवर जिवापाड प्रेम… कोरोनामुळे पतीवर दहा दिवसांपासून उपचार सुरू असतानाच पतीचा मृत्यू… पतीच्या निधनानंतर तासाभरातच पत्नीने रेल्वेखाली दिला प्राण.

जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत पती-पत्नीचे नाते अतूट असल्याची प्रचिती देणाऱ्या या घटनेत गावकऱ्यांनी व नातेवाईकांनी दोघांचे एकाच सरणावर अंत्यसंस्कार करून निरोप दिला.

एकमेकांत जीव गुंतलेल्या पती-पत्नीचा तासाभरातील मृत्यू सर्वांनाच चटका  लावून गेला आहे. मल्लेवाडी येथील आप्पासाहेब रावसाहेब कोरे (वय ३९) व अनुसया आप्पासाहेब कोरे ( वय ३३ ) यांचा सुखाचा संसार गेल्या १३ वर्षांपासून सुरू होता.

एकमेकांवर भरपूर प्रेम. आप्पासाहेब गॅस पाईपलाईनमध्ये काम करत होते. अप्पासाहेब यांचे आई-वडील मयत झाले आहेत. त्यामुळे घरात पत्नी व मुलगा असे छोटे व सुखी कुटुंब होते. मुलासह पती-पत्नी सुखात संसार करत होते.

मुलगा ओम हा सातवी इयत्तेत मंगळवेढा येथे इंग्लिश स्कूलमध्ये शिक्षण घेत आहे. या सुखी कुटुंबाला १० दिवसांपूर्वी दृष्ट लागली. आप्पासाहेब यांना कोरोनाची लक्षणे आढळल्याने त्यांना उपचारासाठी सोलापूर येथील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले होते.

दोन दिवसांपासून त्यांना ऑक्सिजनचा त्रास जास्त जाणवू लागला. पती लवकर बरे होणार व गावी घेऊन जायचे, हे स्वप्न अनुसया पाहात असतानाच नियतीने अघटीतच घडवले.

आप्पासाहेब यांचा बुधवारी सकाळी ५.५५ ला उपचारादरम्यान मृत्यू झाला. हॉस्पिटलमध्ये असलेल्या पत्नी अनुसया यांना हे समजताच त्यांनी एका तासाच्या आत सोलापूर रेल्वे स्थानकाजवळ रेल्वेखाली आत्महत्या करून जगाचा निरोप घेतला.

एकमेकांवरील अतूट प्रेम पाहता, नातेवाईकांनी व गावकन्यांनी या दोघांवर एकत्र अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर एकाच सरणावर या पती-पत्नीवर बुधवारी दुपारी तीन वाजता मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.(स्रोत:लोकमत)

भारत पेट्रोलियम कंपनीने मुलाचे पालकत्व स्वीकारावे

अप्पासाहेब कोरे हे भारत पेट्रोलियम गॅस पाईप लाईनवर सुरक्षा रक्षक म्हणून गेली सहा वर्षे काम करीत होते. गेल्या महिनाभरापासून आजारी असल्याने ते कामावर जात नव्हते. त्यांच्या निधनामुळे व त्यांच्या पत्नीनेदेखील आत्महत्या केल्याने त्यांचा ११ वर्षीय मुलगा पोरका झाला आहे. त्याच्या मागे कोणीही नसल्याने भारत पेट्रोलियम कंपनीने पालकत्व स्वीकारावे अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे

बारा वर्षाचा ओम झाला पोरका

चित्रपटात आपण अनेकदा पाहिलं की, नायिकेचं निधन झाल्यानंतर त्यांचा साथीदारही आपला जीव सोडून देतो. अशीच मन हेलावून टाकणारी घटना मल्लेवाडीतील कोरे कुटुंबाच्या बाबतीत घडली आहे. मात्र , यापूर्वी आजी आजोबांच्या मायेला पारखे झालेल्या १२ वर्षांच्या ओमवरील माता – पित्याचे छत्रही हरपल्याने त्याच्यावर आभाळ कोसळले आहे. पालकांचे छत्र हिरावलेल्या ओमला मायेची सावली मिळणे अत्यंत गरजेचे आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा

संबंधित बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

‘दामाजी सिटी’चा पहिला टप्पा यशस्वीरीत्या पूर्ण; नागरिकांच्या नावावर झाले प्लॉट्स; दुसऱ्या टप्प्यासाठी बुकिंग सुरू; मोजकेच 10 प्लॉट शिल्लक; आजच 9890605962 संपर्क साधा

September 8, 2026
अखेर ठाकरे सरकार नमलं! मराठा समाजासाठीचा सवलतींचा जीआर निघाला

​​ब्रेकिंग! मराठा आरक्षणासाठी आज शिवतीर्थावर विद्यार्थी आणि पालकांची धडक; विद्यार्थ्यांच्या वतीने प्रशासनाला सादर करणार निवेदन; मंगळवेढ्यातील पालकांना सहकुटुंब उपस्थित राहण्याचे आवाहन

September 8, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

खळबळ! विवाह जुळत नसल्याने तरुणाने केला नायब तहसीलदार असल्याचा बनाव; लन्नानंतर पुढे जे घडलं, पत्नीने पोलीस स्टेशन गाठलं

September 7, 2026
शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

शिक्षकांनी पिढ्या घडवल्या! मंगळवेढ्यात विठाई परिवारातर्फे शिक्षक सन्मान सोहळा उत्साहात संपन्न; पारदर्शक कारभाराचे मान्यवरांकडून कौतुक

September 7, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मंगळवेढ्यात खळबळ! बायको, सासू-सासऱ्यांची फसवणूक झाली, आयुष्याचं वाटोळं केलं; भावनिक व्हिडीओ स्टेटस ठेवत तरुणाने संपवले जीवन

September 6, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढ्याच्या दोन ‘नायब तहसीलदारां’ची तहसीलदार पदावर पदोन्नती

संकट काळात 'या' नंबरवर कॉल केल्यास संबंधित व्यक्तीच्या आवाजातील कॉल सर्व गावातील नागरिकांना जाणार

ताज्या बातम्या

रतनचंद शहा बँकेच्या सर्व खातेदारांच्या ठेवी सुरक्षित : चेअरमन राहुल शहा

रतनचंद शहा बँकेचे खातेदार व सभासदांसाठी महत्त्वाची बातमी! ​अपप्रचारावर विश्वास ठेवू नका, बँक सभासदांच्या विश्वासावर भक्कम; चेअरमन राहुल शहा यांनी मांडली वस्तुस्थिती

September 10, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

चौकात मित्रांसोबत गप्पा मारत बसले होते, अचानक समोरून आले आणि दोन तरुणांवर चाकूने केला हल्ला; मंगळवेढ्यात खळबळजनक घटना

September 10, 2026
येरे येरे पावसा! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थिती, गावगाडा ठप्प झाल्याने नागरिकांचे गावागावात ग्रामदैवतांना जलाभिषेक

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात दुष्काळसदृश स्थिती, पिकांच्या नुकसानीचा वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्यासाठी विशेष समिती गठीत; तज्ज्ञांचे पथक थेट बांधावर उतरणार

September 10, 2026
गणपतीची प्रतिष्ठापना कधी करावी? जाणून घ्या शुभ मुहूर्त; आणि पूजन विधी

गणपती बाप्पा मोरया!’ यंदा बाप्पाचा पाहुणचार ‘एवढे’ दिवस; १४ सप्टेंबरला जुळून आलाय अनोखा दुर्मिळ योग

September 10, 2026
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज मुढवी येथे भव्य रक्तदान शिबिर; मंगळवेढा येथील शिवालयापासून मुढवी पर्यंत भव्य सायकल रॅलीचे आयोजन

मनोज जरांगे भडकले, मराठ्यांचे वाटोळे करून पळ काढताय, तुम्हाला सोडणार नाही; सरकारला दिला कडक इशारा, मराठा आंदोलन चिघळणार

September 9, 2026
धक्कादायक! सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पती व सासूविरुद्ध फिर्याद दाखल

धक्कादायक! सावकारी त्रासाला कंटाळून तरुणाची आत्महत्या; मंगळवेढा शहरातील घटना, ‘या’ सावकाराविरुद्ध गुन्हा दाखल

September 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा