टीम मंगळवेढा टाईम्स ।
रतनचंद शहा सहकारी बँकेस सन २०१९-२० मध्ये २ कोटी ४ लाख इतक्या रुपयाचा नफा झाल्याचे बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी ऑनलाईन पद्धतीने आयोजित सर्वसाधारण सभेच्या बैठकीत सांगितले.
रतनचंद शहा सहकारी बँकेची ५८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने बँकेच्या रतनचंद शहा सभागृहात झूम अँपद्वारे ऑनलाईन पध्दतीने पार पडली.
सभेचे सुरवातीस स्व.रतनचंद शहा यांचे प्रतिमेचे पूजन बँकेचे व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांचे व उपस्थित सर्व संचालकांच्या हस्ते करणेत आले.
तसेच अहवाल काळात निधन झालेले बँकेचे सभासद, हित चिंतक यांना बँकेचे संचालक मुझफ्फर काझी यांनी श्रध्दांजली वाहिली.
त्यानंतर बँकेचे सरव्यवस्थापक शामसुंदर कुलथे यांनी विषय वाचून दाखविले त्यास ऑनलाईन उपस्थित सभासदांनी मंजुरी दिली.
तसेच बँकेचे चेअरमन राहूल शहा यांनी अहवाल वाचन केले. बँक हि सभासद ठेवीदार यांचे सहकार्यानेच प्रगतीपथावर आहे. बँकेस सन २०१९ -२० या कालावधीत राखीव निधीत ७२.४ ९ लाख वाढ होऊन तो २७ कोटी ४ लाख झाला.
ठेवीमध्ये २९ कोटी ८५ लाख वाढ होऊन ठेवी २८४ कोटी झाल्या , नेटवर्थ ७४ लाखाने वाढून २३ कोटी ४७ लाख झाले तसेच बँकेचा नेट एन.पी.ए हा ४.८३ % आहे.
सद्याची आर्थिक परिस्थिती पाहता कोरोना या विषाणूचा प्रार्दुभावामुळे लॉकडाऊन झाले होते. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान झाले आहेत. अशा कालावधीत सर्व खातेदार , सभासद यांना बँकेने आर्थिक सहकार्य केले आहे.
बँक हि प्रगतीपथावर नेणेकामी सर्व संचालक मंडळ कटिबध्द आहे. सर्व सभासदांच्या उपस्थितीत सभा घेणे आनंदाचे वाटते.
परंतू पुन्हा एकदा कोरोना विषाणूमुळे परिस्थिती पाहता प्रथमच ऑनलाईन पध्दतीने सभा पार पडत आहे. सर्वानी सहकार्य केले त्याबद्दल आभार व्यक्त केले.
सभेस बँकेचे व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप,संचालक मुाफ्फर काझी, महोदव माळी, बजरंग ताड , रमेश जोशी, लक्ष्मण नागणे, छबाबाई दत्तू , सौ.बबीता गोवे व बँकेचे विधी सल्लागार अँड.विनायक नागणे हे उपस्थित होते.
सभेचे आभार व्हा.चेअरमन रामचंद्र जगताप यांनी मानले व सभेचे सुत्रसंचालन सरव्यवस्थापक शामसुंदर कुलथे यांनी केले.
बँक सर्वसामान्य ठेविदारांची,शेतकऱ्यांची
बॅंकेच्या माध्यमातून विविध योजनांची आखणी करून बँक सर्वसामान्य ठेविदारांची, शेतकऱ्यांची राहील या बाबतीमध्ये प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत, असे बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांनी सांगितले
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज