mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी अजून पक्षांचे उमेदवार गुलदस्त्यात; उमेदवारांच्या हातात केवळ तीनच दिवस

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 25, 2021
in सोलापूर
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणूकी दरम्यान प्रचार सभा,रॅली बाबत जिल्हाधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा-पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या अर्ज दाखल करण्यामध्ये तीन दिवसांची सलग सुट्ट्या आल्याने केवळ तीनच दिवस उमेदवारांच्या हातात उरले असून अजून राष्ट्रवादी अथवा भाजपने आपल्या उमेदवारांची नावे गुलदस्त्यात ठेवल्याने इच्छुकांची धाकधूक वाढू लागली आहे.

दि.23 मार्चपासून या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली होती. मात्र बंडखोरी केलेली स्वाभिमानी शेतकरी संघटना व धनगर समाजाच्या वतीने असे दोनच उमेदवारी अर्ज अद्यापपर्यंत दाखल झाले आहेत. अशातच शनिवार, रविवार आणि सोमवार अशा तीन दिवस सलग सुट्ट्या आल्याने उमेदवारांना केवळ आज, उद्या व मंगळवारी असे तीनच दिवस उमेदवारी दाखल करता येणार आहे.

यातच अजून राष्ट्रवादीकडे जयश्री भालके किंवा भगीरथ भालके यांच्यातील उमेदवारीचा घोळ संपला नसल्याने ही उमेदवारी जाहीर झालेली नाही.

तर भाजपकडून विधानपरिषद आमदार प्रशांत परिचारक अथवा गेल्यावेळचे अपक्ष उमेदवार समाधान अवताडे यातील एकाचं नाव अद्याप निश्चित झालेले नाही. त्यामुळे या दोन्ही प्रमुख पक्षांनी अद्याप आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेले नाहीत.

यातच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन पाटील आणि धनगर समाजाचे संजय माने यांनी उमेदवारी दाखल करीत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढवली असताना आता शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख शैला गोडसे यांनी बंडाचा झेंडा फडकावत थेट गावोगावी प्रचाराला सुरुवात केली आहे.

गेल्यावेळी त्यांना उमेदवारी देण्याचे आश्वासन देत शिवसेनेत प्रवेश दिला होता. मात्र गेल्यावेळी त्यांना उमेदवारी नाकारल्यानंतर आता कार्यकर्त्यांच्या दबावामुळे त्यांनी उमेदवारी दाखल करण्याची घोषणा करीत जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे.

शैला गोडसे या सोलापूर जिल्हा परिषदेच्या सदस्य असून महिला वर्गात त्या चांगल्याच लोकप्रिय आहेत.शिवसेना उमेदवारी देणार नाही याची जाणीव ठेवूनच त्यांनी अपक्ष लढविण्याचा निर्णय घेतला असून गेल्या काही दिवसापासून गावभेटीचा धडाका लावला आहे .

आता लोकशाही आघाडीतील उरलेल्या काँग्रेसनेही पंढरपूर जागेवर आपला दावा केला असून युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन नागणे यांनी आम्ही निवडणूक लढविणार असल्याचा दावा केल्याने निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीला या मित्रपक्षातील बंडखोरांची समजूत काढायचे प्रयत्न करावे लागणार आहेत.

त्या तुलनेने भाजप व मित्र पक्षाकडून एकास एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरु झाल्या असून समाधान अवताडे यांच्या नावावर एकमत होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी मध्येही भगीरथ भालके यांनाच उमेदवारी द्या असा आग्रह कार्यकर्त्यातून वाढत चालल्याने पक्ष समोरचा पेच वाढला आहे.

खुद्द शरद पवार हे तासगाव पॅटर्नप्रमाणे दिवंगत आमदार भारत भालके यांच्या पत्नी जयश्री भालके याना उमेदवारी देण्यासाठी आग्रही आहेत मात्र त्यांचा मुलगा भगीरथ याच्यासाठी कार्यकर्ते आग्रही झाल्याने हि उमेदवारी कोणाकडे जाते यावर भाजपचा उमेदवार ठरला जाईल असे सांगितले जात आहे.

अशा परिस्थितीत येत्या दोन दिवसात उमेदवारी जाहीर न झाल्यास उमेदवारी दाखल करण्यासाठी केवळ मंगळवारचा एकचं दिवस मिळणार आहे.(ABP)

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पोटनिवडणुकमंगळवेढा पंढरपूर मतदारसंघ

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

प्रशासनाचा मोठा निर्णय! सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे विभाजन; जाणून घ्या तुमच्या भागातील नवीन उपविभाग; नागरिक व भाविकांना कसा होणार फायदा?

July 28, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

आत्याच्या मुलाशी लग्न, पदरात 2 मुली, सुखाचा संसार सुरू असतानाच महिलेनं मुलीसह संपवलं जीवन, सोलापूर जिल्ह्यात हळहळ

July 29, 2026
पावसाचा कहर! उजनीतून दीड लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग, भीमाकाठी सावधानतेचा इशारा 

सोलापूरकरांसाठी सर्वात मोठी खूशखबर! उजनी ७५ टक्के भरले; दोन-तीन दिवसांत धरण ‘इतक्या’ टक्क्यांचा टप्पा पार करणार; शेतकऱ्यांची वर्षभराची चिंता मिटणार

July 26, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

जमीन खरेदीचा व्यवहार पडला महागात! कमिशन बुडाल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने प्राणघातक हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

July 26, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

शेतकरी कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या खात्यात ‘या’ तारखेपर्यंत पैसे जमा होणार, मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; योजनेतील प्रमाणपत्रप्राप्त शेतकरी

July 25, 2026
मंगळवेढ्यातील सर्वात बेस्ट लोकेशन! नर्मदा पार्क मधील फक्त 13 N/A प्लॉट शिल्लक; बस स्टँड, पासून फक्त 2 मिनिट अंतरावर; त्वरा करा ही संधी पून्हा नाही; संपर्क अमर डेवलपर्स 9132105105/9823533526

बंपर ऑफर! थेट खरेदी खतासोबत हक्काचा प्लॉट; मंगळवेढ्यात ‘दामाजी सिटी’चा धमाकेदार शुभारंभ; कमी बजेट, उत्तम लोकेशन

August 1, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

​शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या आणि स्मार्ट मीटरची सक्ती थांबवा; बोंबाबोंब आंदोलन शिवसेना आक्रमक; मंगळवेढा महावितरणला ८ दिवसांची मुदत; नेमकी अडचण आणि नागरिकांचा विरोध का?

July 24, 2026
Next Post
पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी पहिल्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; बावीस इच्छुकांनी घेतले 24 उमेदवारी अर्ज

पंढरपूर-मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी तिसऱ्या दिवशी दाखल झाले ‘एवढे’ अर्ज; 'या' 4 इच्छुकांनी घेतले उमेदवारी अर्ज

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

संतापजनक! उपचाराच्या अन् प्रलोभनांच्या बहाण्याने अल्पवयीन मुलांना जाळ्यात ओढणारा डॉक्टर गजाआड

August 2, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

बसस्थानकावर चोरट्यांचा सुळसुळाट! बसमध्ये चढणाऱ्या महिला प्रवाशाचे ४३ हजार लांबवले; मंगळवेढा बसस्थानकावरील CCTV कॅमेरे पडले बिनकामी

August 1, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

आषाढी एकादशीला ३३ लाखांची तुफान गर्दी, तरीही एकही चोरी नाही; सोलापूर पोलिसांची ऐतिहासिक कामगिरी; SP अतुल कुलकर्णी यांचे ‘स्मार्ट’ नियोजन

August 2, 2026
गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

गोणेवाडीची सहकार क्रांती! श्री सिद्धनाथ महिला पतसंस्थेची बिनविरोध निवड; हजारे चेअरमन तर उपाध्यक्षपदी चव्हाण

July 31, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

राजकीय पार्श्वभूमी आहे म्हणून सूट मिळणार नाही! मंगळवेढा न्यायालयात आरोपीला ३ वर्षांची ठोकली शिक्षा

July 31, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ खपवून घेणार नाही! एफडीएचा शाळांना शेवटचा अल्टीमेटम; शाळांच्या ५० मीटर परिसरात जंक फूड विकल्यास थेट कारवाई; तुकाराम मुंढेंची शाळांवर थेट धाड

July 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा