टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथे सुरू केलेल्या यशस्वी वाटचालीनंतर सांगोला शहरातील महात्मा फुले चौक येथे नव्याने सुरू होत असलेल्या नागेश फोटोवाला फोटो प्रिंटिंग लॅब व स्टुडिओचा उदघाटन समारंभ आज शुक्रवार दि.१२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मा.आ.गणपतरावजी देशमुख, आ.शहाजीबापू पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष मा.आ.दिपकआबा साळुखे पाटील, लोकनियुक्त नगराध्यक्षा राणीताई माने, पंचायत समिती सभापती राणीताई कोळवले, भाजपा सोलापूर जिल्हा अध्यक्ष श्रीकांतदादा देशमुख,पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांच्या शुभहस्ते होणार आहे.
सदर उद्घाटन समारंभ प्रसंगी प्रमुख आकर्षण म्हणून तुझ्यात जीव रंगला टीव्ही मालिकेच्या प्रमुख अभिनेत्री तसेच अप्सरा आली विजेती डान्स-शो मधील मुख्य कलाकार अभिनेत्री माधुरी पवार या उपस्थित राहणार आहेत.
सदर उदघाटन कार्यक्रमासाठी सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.पी.सी. झपके सर, सांगोला अर्बन बँकेचे चेअरमन के.एस. माळी, गुरु माऊली पतसंस्थेचे चेअरमन मारुती आबा बनकर, उपनगराध्यक्ष प्रशांत धनवजीर नगरसेविका अप्सराताई ठोकळे, नगरसेविका शोभाताई घोंगडे, नगरसेविका छायाताई मेटकरी, नगरसेविका अनुराधाताई खडतरे, नगरसेविका भामाबाई जाधव, नगरसेविका सुनीताताई खडतरे,
नगरसेविका स्वातीताई मगर , नगरसेविका पूजाताई पाटील , नगरसेविका रंजनाताई बनसोडे , नगरसेविका स्वातीताई मस्के , शिवसेना नेते तथा फॅबक ग्रुपचे अध्यक्ष भाऊसाहेब रुपनर , राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते बाबुरावभाऊ गायकवाड , मा . नगराध्यक्ष डॉ . प्रभाकर माळी , लक्ष्मण जांभळे गुरुजी , नगरसेवक चेतनसिंह केदार , गटनेते आनंदा माने,
गटनेते सचिन लोखंडे , नगरसेवक सतीश सावंत , नगरसेवक सुरेशआप्पा माळी , नगरसेवक गजानन बनकर , नगरसेवक रफिकभाई तांबोळी , नगरसेवक अस्मीर तांबोळी , नगरसेवक जुबेर मुजावर , नगरसेवक सुरजदादा बनसोडे , नगरसेवक सोमेश यावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ पार पडणार आहे.
अत्याधुनिक आणि डिजिटल दुनियेत तसेच मल्टिमीडिया अँड्रॉइड मोबाईलच्या दुनियेत नवीन नवीन डिजाइनर फोटो ला अधिक महत्त्व आहे. यामध्ये फोटोग्राफर व नागरिकांना त्यांच्या सोयीचे दालन उपलब्ध व्हावे. म्हणून नागेश फोटो वाला फोटो प्रिंटिंग लॅब व स्टुडिओ यांनी सांगोला येथे पदार्पण केले आहे.
यामध्ये लेझर टेक्नॉलॉजी फोटोप्रिंटिंग , मॉडलिंग फोटोग्राफी, बर्थडे गिफ्ट , डेकोरेटेड प्रिंटिंग स्कूल आयडी कार्ड, प्रिंटिंग फोटो फ्रेम्स , करिज्मा अल्बम, फोटो बुक अल्बम, यासह वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या कार्यक्रमास सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संचालक शरद साखरे यांनी केले आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज