mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविणे आले अंगलट, सोलापूर विद्यापीठातील परीक्षा नियंत्रकासह चार जणांना अटक

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
January 20, 2021
in क्राईम, सोलापूर
खळबळ! महिलांच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ७ जणींना अटक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठातील नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे यांच्यासह चौघांना न्यायाधीशांनी 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाच्या परीक्षा विभागातील गैरप्रकार अनेकदा समोर आले आहेत. नापास विद्यार्थ्यांना चांगल्या गुणाने उत्तीर्ण करणे, कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणे, परीक्षेला उपस्थित असलेल्या विद्यार्थ्याला गैरहजर दाखविणे असे प्रकार यापूर्वी समोर आले आहेत.

पण 25 डिसेंबर 2019 रोजी विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांचे गैरप्रकार करून गुण वाढविण्याची तक्रार पोलिसांत दिली होती.यात धक्कादायक बाब म्हणजे कुलगुरू परदेशी गेल्यानंतर त्यांचा लॉगीन आयडी व पासवर्ड वापरून नापास विद्यार्थ्यांचे गुण वाढविल्याचे समोर आले.

त्यावेळी विद्यापीठाने एक समिती स्थापन करून प्राथमिक तपास केला होता. त्यानंतर गैरप्रकार झाल्याचे उघड झाल्यानंतर विद्यापीठाने पोलिसांत धाव घेतली होती. त्यादरम्यान परीक्षा नियंत्रक डॉ.श्रीकांत कोकरे यांनी त्यांच्या पात्रतेची कागदपत्रे अपूर्ण दिल्याने त्यांना पदावरून काढण्यात आले होते.

यानंतर सायबर क्राईमने कसून तपास केला व हा गैरप्रकार समोर आला.दरम्यान, नापास तथा कमी गुण असलेल्या विद्यार्थ्यांना गुण वाढवून देणारी टोळी विद्यापीठात कार्यरत असल्याचा पोलिसांना संशय आहे.

या प्रकरणी पोलिसांनी परीक्षा नियंत्रक डॉ. श्रीकांत कोकरे, तत्कालीन यंत्रणा विश्‍लेषक प्रशांत चोरमले, सुविधा समन्वयक हसन शेख व प्रोग्रामर प्रवीण गायकवाड या चौघांना दोषी धरत मंगळवारी 19 रोजी अटक केली.

चारही जणांना कोर्टापुढे उभे केले असता न्यायाधीशांनी चौघांना 22 जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

ही कारवाई शहर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अभय डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक बजरंग साळुंखे, फौजदार होटकर, बायस, हवालदार श्रीरंग कुलकर्णी, संतोष येळे, प्रांजली काळे, सचिन गायकवाड, बाबू मंगरूळे, अमोल कानडे, करण माने, वसिम शेख, प्रवीण शेळकंदे, पूजा कोळेकर, अर्जून गायकवाड, समर्थ शेळवणे आदींनी पार पाडली.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर विद्यापीठ

संबंधित बातम्या

मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

धक्कादायक! आई-वडील झोपेतून उठले नाही म्हणून जाऊन पाहिलं; तोंडातून फेस आलेला अन्…, सोलापुरात राहत्या घरात आढळला पती-पत्नीचा मृतदेह

February 28, 2026
जिल्हाधिकाऱ्यांच्या कामाला राष्ट्रीय पुरस्कार, राष्ट्रपतींच्या हस्ते आज दिल्लीत सन्मान; सोलापुर जिल्ह्यात लवकरच गडचिरोलीचा ‘आशीर्वाद’ पॅटर्न

सोलापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा: जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी जबाबदारी

March 3, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

जिल्हा परिषद अध्यक्षांची व पंचायत समिती सभापती निवड ‘या’ तारखेपूर्वी होणार; सत्तास्थापनेसाठी आता राजकीय हालचालींना वेग

February 26, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

मोठी बातमी! सासऱ्याचा खून, हल्ला करणाऱ्या जावयाने स्वत:वरही वार करून घेतले; सोलापुर जिल्ह्यातील घटना

February 25, 2026
मंगळवेढ्यात ‘समाधान’ पर्व; विरोधकांच्या टीकेपेक्षा जनतेला विकास भावला; टीका करणाऱ्यांना जनतेनेच झापले; आमदार आवताडेंच्या ‘विकास मॉडेल’वर शिक्कामोर्तब

हॅट्ट्रिक! आमदार समाधान आवताडे सलग तिसऱ्यांदा विधानसभेच्या तालिका अध्यक्षपदी; विधिमंडळात संतभूमीचा सन्मान

February 24, 2026
Next Post
शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आजपासून तापमान वाढीचे अन् वादळी पावसाचे संकेत

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढणार! आजपासून तापमान वाढीचे अन् वादळी पावसाचे संकेत

ताज्या बातम्या

मोठी बातमी! उपसा सिंचन योजनेच्या कामाचे निघाले टेंडर; आ.आवताडे यांच्या प्रयत्नामुळे प्रत्यक्षात कामाला लवकरच होणार सुरुवात

शेतकऱ्यांना अधिक स्थिर वीजपुरवठा मिळणार, सर्व शेतीपंप फिडरवरील कृषी ग्राहकांना थेट लाभ होणार; ‘या’ योजनेचा आमदार आवताडे यांनी घेतला आढावा

March 3, 2026
मोठी बातमी! मंगळवेढ्यात नगरसेवक पदासाठी आज भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षाकडून अर्ज दाखल; नगराध्यक्षपदासाठी ‘इतके’ अर्ज; मतदारांमध्ये उत्सुकता वाढली

सोलापूर झेडपीत ट्विस्ट! अध्यक्षपदाची माळ गळ्यात पडण्यापूर्वीच दावेदाराने झटकले हात; सोलापूरच्या राजकारणात खळबळ

March 3, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

खळबळ! घराचा दरवाजा पुढे करुन कुटूंबिय झोपले, चोरट्याने घरात प्रवेश करुन 62 हजारांचा मुद्देमाल नेला चोरुन; ‘या’ गावात चोरट्याने हातोहात शेळी पळविली; मंगळवेढा तालुक्यातील प्रकार

March 3, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

​धक्कादायक! ऐन उमेदीच्या काळात तरुणीने संपवले जीवन; मंगळवेढा हादरले

March 2, 2026
चल ग सखे पंढरीला…! आषाढी यात्रेसाठी आज मंगळवेढ्यातून एसटीच्या मोफत पाच फेऱ्या; दोन विठ्ठल भक्तांची भाविकांसाठी केले आयोजन

एसटीच्या तिकीटाबाबत शासनाचा युटर्न! ज्येष्ठ नागरिक, महिला, दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा; NCMC कार्डबाबत दिलं स्पष्टीकरण

March 3, 2026
मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

मंगळवेढेकरांसाठी गुढीपाडवा धमाका! सम्राट मोटर्सची मोठी ऑफर; चक्क ९९,९९९ रुपयांत ३ ई-बाईक्स

March 1, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..