टीम मंगळवेढा टाईम्स । मंगळवेढा शहरात व ग्रामीण भागात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची वाढ होत असून आज 3 रुग्णांची वाढ झाली आहे. यामधील दोन ब्रम्हपुरी व एक निंबोणी येथील रुग्ण आहेत.
आज दि.13 सप्टेंबर रोजी एकाही नागरीकांचे स्वब ( RT – PCR ) व रॅपीड अॅन्टीजन टेस्ट कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे 3 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे.
मंगळवेढा तालुक्यात आज अखेर एकुण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 861 पॉझिटिव्ह रुग्ण झाले आहेत.तर आज उपचारानंतर 7 रूग्णांना घरी सोडणेत आलेले आहे. आज अखेर 387 जनांना उपचार कालावधीनंतर घरी सोडणेत आलेले आहे. आज अखेर 457 जण उपचार घेत आहेत. तर आज अखेर 17 मयत झालेले आहेत.
सांगोला तालुक्यात आज 43 जणांना कोरोनाची बाधा
सांगोला शहरात मंगळवार पासून जनता लॉकडाउन सुरू होत आहे.दिवसेंदिवस रुग्णांची मोठी होताना दिसत असून आज 43 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
आज दि.13 सप्टेंबर रोजी नागरीकांचे स्वब ( RT – PCR ) कोरोना चाचणी अहवाल तपासणी कामी घेणेत आलेले नाहीत.
तसेच आज 156 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत.वरील 156 रॅपीड अॅन्टीजन टेस्ट केलेल्या नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह 30 आणि निगेटिव्ह 126 आलेले आहेत.
सदर नागरिक हे सांगोला शहर 13 , गौडवाडी 1 , बामणी 1 , जवळा 3 , कोळा 1 , बलवडी 2 , कमलापुर 2 , संगेवाडी 1 , देवळे 1 , धायटी 1 , नाझरे 1 , महुद बु .1 , आणि भोसे 1 नंदुर 1 त . मंगवळेवढा येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
सोलापूर येथे पाठविणेत आलेले स्वब ( RT – PCR ) चे आज 13 नागरीकांचा पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाला आहे. सदर नागरिक हे उदनवाडी 3 , वझरे 9 , मेडशिंगी 1 , येथील निकटतम पॉझिटिव्ह रुग्णाचे संपर्कातील आहेत.
सांगोला तालुक्यात आतापर्यंत 1 हजार 119 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर 486 रुग्णांना उपचार कालावधी नंतर घरी सोडण्यात आले आहे. आणि आतापर्यंत 621 रुग्णांवर उपचार सुरू आहेत व आत्तापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे.
नागरिकांची योग्य ती काळजी घेत प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 9561617373 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज