मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । मुंबईत रविवारीही बाधित रुग्णांचा आकडा वाढला असून, नव्याने 2,085 रुग्णांची भर पडली आहे. त्यामुळे मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 1,69,693 झाली आहे. रुग्णवाढीचा दरही 1.21 वरून 1.24 टक्क्यावर पोहोचला आहे.
रविवारी दिवसभरात 41 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृतांचा आकडा 8,147 वर पोहोचला आहे. तर 902 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून रुग्ण बरे होण्याचा दर हा 77 टक्के इतका आहे.
मुंबईत रविवारी नोंद झालेल्या 41 मृत्यूंपैकी 27 जणांना दीर्घकालीन आजार होते.मृत व्यक्तींमध्ये 21 पुरुष, तर 11 महिलांचा समावेश आहे. 41 रुग्णांपैकी 32 रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते, तर नऊ रुग्ण 40 ते 60 वर्षांदरम्यान होते.
रविवारी 902 रुग्ण बरे झाले असून, आजपर्यंत 1,30,918 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर हा 56 दिवसांवर गेला आहे. 12 सप्टेंबरपर्यंत एकूण 9,15,789 कोव्हिड चाचण्या करण्यात आल्या, तर 6 सप्टेंबर ते 12 सप्टेंबर दरम्यान कोव्हिड रुग्णवाढीच्या दरात वाढ होऊन तो 1.24 इतका झाला आहे.
अति जोखमीचे 14,449 रुग्ण
मुंबईत 555 इमारती आणि झोपडपट्ट्या कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर केलेले आहेत. तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 7,983 असून, गेल्या 24 तासांत बाधित रुग्णांच्या संपर्कात असलेले 14,449 अति जोखमीचे रुग्ण आहेत, तर 2,335 रुग्ण कोव्हिड केअर सेंटर 1 मध्ये उपचार घेत आहेत.
Corona’s havoc in Mumbai will not stop! Sunday 2,085 patients added
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज