टीम मंगळवेढा टाईम्स ।
कर्तव्यावर असलेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव टेम्पोनं चिरडल्याची घटना समोर आली आहे. मुंबई-हैदराबाद महामार्गावरील टेंभुर्णी गावाजवळील वरवडे टोल नाक्याजवळ रविवारी सायंकाळी घटना घडली.
पोलीस कर्मचाऱ्यानं तपासणीसाठी टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता टेम्पो चालकानं थेट पोलिस कर्मचाऱ्याच्या अंगावर टेम्पो घातला.
यात पोलीस कर्मचाऱ्याचा जागेवरच मृत्यू झाला. सागर औदुंबर चोबे असे मयत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. सागर चोबे हे पोलिस नाईक म्हणून कार्यरत होते.
मिळालेली माहिती अशी की, वरवडे ( ता.माढा) येथील टोल नाक्यावर कर्तव्य बजावत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याला भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोनं ठोकरलंयात पोलिस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
सोलापूर- पुणे राष्ट्रीय महामार्गावर वरवडे टोल नाक्यावर टेंभुर्णीच्या दिशेने निघालेल्या टेम्पोला थांबवण्यासाठी ड्युटीवर असलेल्या पोलिस नाईक औदुंबर चोबे यांनी हात केला होता. यावेळी भरधाव टेम्पोने चोबेंना ठोकरलं व त्यातच त्यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज रविवारी सायंकाळी 6 वाजता घडली.
टेम्पो क्रमांक ( MH 04 hd 0170) ह्या हैद्राबादहून आलेल्या टेम्पोचा चालक नवनाथ शिवाजी गुट्टे ( रा. परळी वैजनाथ, जि बीड) यास अटक करण्यात आली आहे.
पोलिस नाईक औदुंबर चोबे पंढरपूरचे रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. त्यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी टेंभुर्णी पोलीस पुढील तपास करत आहेत.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज