mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

डोळ्यात चटणी टाकून सराफाला लुटण्याचा प्रयत्न सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 4, 2020
in क्राईम, सोलापूर
सोन्या-चांदीच्या दरात कमालीची घसरण; आज मंगळवेढ्यातील सराफ दुकाने सुरू असणार

सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी येथील पाठक ज्वेलर्सचे सराफ मालक शुभंकर सुरेंद्र पाठक (वय-२६, रा. जैन मंदिराराजवळ, कुर्डूवाडी) हे आपल्या तानाजी सलगर या कामगाराबरोबर एमएच-४५, यू-७४८९ या दुचाकी गाडीवरून दुकानातील सोन्या चांदीच्या मालाच्या बॅगा घेऊन जैन मंदीराजवळ असणाऱ्या घराकडे जात होते.

गुरुवारी सायंकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या पाठीमागून अचानकपणे अज्ञात तीन चोरट्यांनी येऊन त्यांना हाक मारत पाठीमागे बसलेल्या कामगाराच्या डोळ्यात चटणी टाकली व जवळ असणाऱ्या पिस्तुलचा धाक दाखवत सोने चांदीच्या बॅगा लुटण्याचा प्रयत्न केला.

या प्रकार लगेच लक्षात आल्याने अगदी हाकेच्या अंतरावर राहिलेल्या घराकडे पाहत शुभंकर पाठकने एकच आरडाओरड सुरू केला व त्या अज्ञात चोरट्यांच्या हातातून तावडीतून सुटका करून घेतली व घरात सोन्या चांदीच्या सर्व बॅगासह धाव घेतली व सुटकेचा निश्वास टाकला.

त्यामुळे येथील सोनारावर सायंकाळच्या वेळच्या गर्दीच्या ठिकाणी धाड टाकण्याचा असफल प्रयत्न अज्ञात चोरट्यांचा झाला असला तरी शहरात मात्र या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत रात्री उशिरापर्यंत कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. मात्र पोलीस ठाण्यात शहरातील व्यापाऱ्यांनी एकच गर्दी केली होती.

व घटनेवर येथील पोलीस मात्र सारवासारव करण्याचे प्रयत्न करत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या त्यांच्याविषयीच्या तीव्र भावना दिसून आल्या.

याबाबत अधिक माहिती अशी की, कुर्डूवाडी येथील सराफी चौकात शुभंकर सुरेंद्र पाठक यांचे सराफाचे मोठे दुकान आहे.नेहमीप्रमाणे ते पावणे आठ वाजता आपल्या कामगाराला घेऊन दुकानातील माल घरी घेऊन जात होते.

त्यावेळी पाठीमागून आलेल्या दुचाकीवरून अज्ञात तिघांनी हा हल्ला त्यांच्यावर केला आहे.त्यातून त्यांनी सुटका करून घेतली आहे. यामुळे अज्ञात हल्लेखोरांपासून ते लाखो रुपयांच्या चोरीपासून वाचले आहेत.

कुर्डूवाडी शहरात याअगोदरही मागील काही महिन्यात अश्याच एक दोन घटना घडल्या आहेत.त्याही घटनेतील अज्ञात हल्लेखोरांनी पिस्तुलचा धाक दाखवून एका सोनाराच्या बॅगा पळविण्याचाच प्रयत्न केला होता.

अद्यापपर्यत त्यातील एकही आरोपी सापडला नाही. या वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे शहरात मात्र चोरट्याविषयी भीती व्यक्त होऊ लागली आहे. याकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी येथील व्यापाऱ्यांतून होत आहे.

या घटनेबाबत कुर्डूवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र डोंगरे व सहायक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांना संपर्क साधला असता त्यांनी त्याला प्रतिसाद दिला नाही.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: सोलापूर

संबंधित बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आमदार समाधान आवताडेंचा मास्टरस्ट्रोक! प्रशासकीय कामांसाठी सोलापूरला जाण्याची कटकट संपली; पंढरपूरला अपर जिल्हाधिकारी कार्यालय मंजूर; ‘या’ सात तालुक्यांना मोठा दिलासा

September 23, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

माझ्या मुलीला का नांदवत नाही?’ जावयाला रस्त्यावर पाडून दगडाने ठेचले; सासऱ्याचा मंगळवेढ्यात थरारक राडा; सासू, सासरे आणि पत्नीवर पोलीस कारवाई

September 25, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मोठा निर्णय! सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळांचा होणार कायापालट; वाचा सविस्तर योजना

September 22, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

समाज माध्यमावरील व्हायरल दुष्काळग्रस्त तालुक्यांची यादी खोटी; अफवांवर विश्वास ठेवू नका; जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

September 22, 2026
Next Post
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

दिलासा! सोलापुरच्या ग्रामीण भागात एकाच दिवशी 219 जण कोरोनामुक्त, 121 नव्या रुग्णांची भर

ताज्या बातम्या

प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 27, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026

राज्यात दोन टप्प्यात दुष्काळ जाहीर होणार? पहिल्या 139 तालुक्यांची यादी आली समोर; सोलापूर जिल्ह्यातील ‘या’ तालुक्यांचा समावेश

September 26, 2026
कै.आण्णासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त मंगळवेढयात विविध कार्यक्रम; सामाजिक कार्याबद्दल ‘यांना’ पुरस्कार जाहीर

कै.आण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त मंगळवेढ्यात आज पुरस्कार सोहळा; आमदार आवताडेंच्या हस्ते होणार सन्मान; पाहा कोणा-कोणाला मिळणार मानाचा ‘समाजभूषण पुरस्कार’?

September 25, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा