mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूर ब्रेकिंग! ‘या’ तालुक्यात ७ नोव्हेंबरला  असणार संचारबंदी; एसटी सेवाही बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
November 5, 2020
in सोलापूर, राज्य
कोरोनाचा वाढता उद्रेक रोखण्यासाठी ‘या’ राज्यात आजपासून जमाव बंदी 144 कलम लागू

मराठा समाजाने पुकारलेल्या पंढरपूर ते मंत्रालय आक्रोश मोर्चाचा राज्य सरकारने चांगलाच धसका घेतला आहे. मोर्चासाठी शहरात गर्दी जमू नये यासाठी जिल्हा प्रशासनाने 24 तासांसाठी विठ्ठल मंदिर, चौफाळा आणि महाद्वार या भागात संचारबंदी लागू केली आहे.

शिवाय आजपासून पंढरपुरातून बाहेर जाणारी आणि पंढरपूरकडे होणारी एसटीची प्रवासी वाहतूकही बंद ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी घेतला आहे.

सध्या सोलापूर जिल्हयासह पंढरपुरात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठा आहे. मराठा आरक्षण मागणीसाठी पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई या मार्गाने काढण्यात येणाऱ्या पायी दिंडी आक्रोश मोर्चासाठी पंढरपुरात अनेक लोक जमतील. या शहरातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो.

यामुळे मोर्चानिमित्त लोक एकत्र येऊ नये यासाठी विठ्ठल मंदिर परिसरात ०६ नोव्हेंबर २०२० रोजी रात्रीचे १२ वा जल्यापासून ते ०७ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२ वाजेपर्यंत संचारबंदी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.

मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने मराठा आरक्षण मागणीसाठी ७ नोव्हेंबरपासून पंढरपूर- अकलुज- बारामती- आकुर्डी- निगडी- मावळ- वाशी या मार्गाने मुंबई मंत्रालय पर्यंत पायी दिंडी आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे.

पायी दिंडीत मराठा समाजातील लोकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे यासाठी मराठा क्रांती मोर्चा, मराठा क्रांती ठोक मोर्चा, सकल मराठा समाज, महाराष्ट्र राज्य या संघटनांचे वतीने संघटनांनी आवाहन केले आहे.

सोलापूर जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार व प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. सध्या सोलापूर जिल्ह्यात ३१४०४ व्यक्ती कोरोना बाधीत आहेत व ९१६ ठिकाणे ही प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून सध्या कार्यान्वित आहेत. सध्या कोरोना या संसर्गजन्य महामारीचे काळात मराठा आरक्षण मागणीसाठी संबंधित असलेल्या संघटनांनी मराठा समाजातील व्यक्तींना पंढरपूर येथे जमण्यासाठी जे आवाहन केलेले आहे.

व त्यांचे वतीने पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई असा जो आक्रोश मोर्चा काढणेत येणार आहे. त्यानुसार पंढरपूर येथे आंदोलनकर्ते एकत्र जमल्यास कोरोनाचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढू शकतो. त्यातून सर्वसामान्य नागरिकांचे आरोग्य व जिवितास धोका निर्माण होवू शकतो.

त्यामुळे कोरोना या महामारीचा वाढलेला प्रसार व प्रादुर्भाव पाहता ७ नोव्हेंबरला आंदोलनकर्ते पंढरपूर मध्ये येऊ नयेत यासाठी साथरोग अधिनियम, १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ व फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ चे कलम १४४ अंतर्गत खालील बाबींना मनाई करणे अत्यंत गरजेचे असल्याचे मलिंद शंभरकर यांनी सांगितले.

संचारबंदीचा असा आहे आदेश

महाद्वार घाट ते नामदेव पायरी परिसर, चौफाळा ते पश्चिम द्वार परिसर, विठ्ठल-रुक्मिणी मंदिर प्रदक्षिणा मार्ग या ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

पंढरपूर शहरात दोन व दोन पेक्षा अधिक व्यक्तिना एकत्र येण्यास जमण्यास मनाई करण्यात येत आहे. व उक्त नमुद कालावधीत नामदेव पायरी दर्शन सर्वांसाठी बंद ठेवणेत येत आहे.

मराठा आरक्षण पायी दिंडी आक्रोश मोर्चात जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील सहभागी होण्यासाठी येणारे आंदोलनकर्ते, संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांना दि. ०५.११.२०२० रोजी रात्रीचे १२.०० वाजल्यापासून ते ०७ नोव्हेंबर २०२० रोजीचे रात्री १२.०० वाजेपर्यंत पंढरपूर व सोलापूर जिल्ह्यात येण्यास बंदी करण्यात येत आहे.

या आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती/ संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १८६०) कलम १८८ मधील तरतूदीनुसार दंडनीय / कायदेशीर कारवाईस पात्र आहे. आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी आणि इतर कायदे आणि विनियम यानुसार कारवाई करणेत येईल.

अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांचेविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी. असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी पारीत केला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूरसंचारबंदी

संबंधित बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
सोलापूर जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाचे आदर्श पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका पुरस्कार जाहीर; संपूर्ण नावाची यादी बघा…

​मिनी मंत्रालयातील भाजपचा सेनापती ठरणार, गटनेतेपदाच्या नावावर आज शिक्कामोर्तब; सोलापूरच्या राजकारणात भाजपचा मोठा गेमप्लॅन

March 10, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

आगळ्यावेगळ्या विवाहाची चर्चा! नवविवाहित जोडप्याकडून लग्नाच्या आहेरात मिळालेले 2 लाख सामाजिक संस्थांना दान

March 11, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

सर्वसामान्यांची चिंता वाढवणारी बातमी! घरगुती गॅस सिलिंडर बुकिंगबाबत सरकारचा मोठा निर्णय; पुन्हा नियम बदलले

March 11, 2026
घरबसल्या रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर आणि पत्ता अशाप्रकारे करा अपडेट

नागरिकांनो! राज्यातील लाखो रेशन कार्ड्स होणार बंद; सरकारकडून 5 मोठे बदल, जाणून घ्या नवे नियम काय?

March 11, 2026
Next Post
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

पंढरपुरात चार वर्षाच्या बालकाच्या अंगावर पडली भिंत; वाढदिवसादिवशी झाला मृत्यू

ताज्या बातम्या

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

चविष्ट फालुद्याचा आनंद आता मंगळवेढ्यात! सोलापूरचे सुप्रसिद्ध ‘हरे कृष्णा आईसक्रीम पार्लर’ आजपासून तुमच्या भेटीला

March 12, 2026
महाराष्ट्रातील ‘या’ भागात पुन्हा मुसळधार पावसाचा इशारा; प्रशासनाला सतर्क राहण्याचं आवाहन

शेतकऱ्यांनो! पाऊस पुन्हा कोसळणार; ‘या’ जिल्ह्यांवर संकट; थेट विजांच्या कडकडाटासह

March 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

लग्नाच्या चारच महिन्यात सुखी संसाराला दृष्ट लागली! मंगळवेढ्यात विवाहितेच्या आत्महत्येने खळबळ; पती गजाआड, सासू-सासरे फरार

March 11, 2026
कुटुंबातील सदस्यांना कोरोनाची बाधा, विवाहितेने घेतला गळफास; सोलापुरातील धक्कादायक घटना

सुनेच्या जाचाला कंटाळून सासऱ्याचं टोकाचं पाऊल; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

March 11, 2026

धक्कादायक! 50 लाखांच्या विम्यासाठी अपघाती मृत्यूचा बनाव, पोलीस अन् डॉक्टरही मॅनेज; अखेर पर्दाफाश, 9 जणांना अटक

March 10, 2026
खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

मोठी बातमी! मंगळवेढ्यात तब्बल ८ कोटींचा ‘शेअर’ बाजार! ‘बाळू’ने शेकडो जणांना घातली टोपी; शिक्षक अन् व्यावसायिकांचे कष्टाचे पैसे पाण्यात?”तक्रार अर्ज दाखल, तालुक्यात एकच खळबळ

March 10, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा