mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

सोलापूरच्या ग्रामीण भागात मृत्यूचे भय कायम, आणखी आठ बळी; 154 नवे कोरोना पॉझिटिव्ह

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 13, 2020
in सोलापूर
सोलापूर ग्रामीणमध्ये आज 244 जण कोरोनामुक्त, 223 नवे रुग्ण; वीस वर्षीय तरुणीचा मृत्यू

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आज आणखी आठ जणांचा मृत्यू झाला असून ग्रामीण भागात मात्र मृत्यूचे भय कायम आहे. तर आज कोरोनाबाधितांची संख्या केवळ 154 एवढी आढळून आली आहे. 312 जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 544 जणांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 हजार 390 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 154 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये आत्तापर्यंत कोरोनाबाधित झालेल्यांची संख्या आता 28 हजार 255 एवढी झाली आहे. तर आतापर्यंत कोरोनामुळे 779 जणांचा बळी गेला आहे. कोरोनाग्रस्त झाल्याने वेगवेगळ्या दवाखान्यांमध्ये 4 हजार 351 उपचार घेत आहेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 20 हजार 125 जण कोरोनामुक्त झाल्याने आपापल्या घरी परतले आहेत.

आज ‘या’ भागातील आठ जणांचा मृत्यू

मंगळवेढा शहरातील सणगर गल्ली येथील 56 वर्षाची महिला, उचेठाण (ता. मंगळवेढा) येथील 30 वर्षाचे पुरुष,उजनी (ता. माढा) येथील 50 वर्षाचे पुरुष, खवणी (ता. मोहोळ) येथील 70 वर्षाचे पुरुष, श्रीपत पिंपरी (ता. बार्शी) येथील 70 वर्षाचे पुरुष,  बलवडी (ता. सांगोला) येथील 67 वर्षाची महिला, कासेगाव (ता. दक्षिण सोलापूर) येथील 70 वर्षाचे पुरुष तर घोळसगाव (ता. अक्कलकोट) येथील 70 वर्षाच्या पुरुषाचा आज कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

सोलापूर शहरात आज 35 पॉझिटिव्ह

सोलापूर शहरातील 336 पुरुष आणि 171 महिलांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. त्यात सर्वाधिक रुग्ण 60 वर्षांवरील तथा को- मॉर्बिडच आहेत. कोरोनापासून त्यांचा बचाव व्हावा म्हणून राज्य सरकार व महापालिका आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या माध्यमातून विविध प्रकारच्या उपाययोजना केल्या जात आहेत.

घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात असतानाही मृत्यू पूर्णपणे कमी झालेले नाहीत. दोन दिवसांपूर्वी साबळे नागरी आरोग्य केंद्रातील गैरप्रकार समोर आला. तर जिजामाता आरोग्य केंद्रातही असेच प्रकार सुरु असल्याचे काही शिक्षकांनी नाव न घेण्याच्या अटीवर सांगितले. त्यामुळे अशा गंभीर प्रकाराबाबत आयुक्‍त काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

शहरात आज रेल्वे लाईन्स, रेसिडेन्सी क्‍वार्टर, महोदव नगर, मुकुंदराय आंबेडकर गृहनिर्माण सोसायटी, सुनिल नगर, राघवेंद्र नगर, पश्‍चिम मंगळवार पेठ, विजापूर नाका, अंत्रोळीकर नगर, मंत्री चंडक रेसिडेन्सी, दावत चौक, आशियाना नगर (जुळे सोलापूर), जमादार टॉवर (मुरारजी पेठ), मुळे बिल्डींग (नवी पेठ), राधाकृष्ण कॉलनी (वसंत विहार रोड), अविनाश रेसिडेन्सी, मल्लिकार्जुन नगर (हत्तुरे वस्ती), कोंडा नगर, वज्रेश्‍वरी नगर (अक्‍कलकोट रोड), कर्णिक नगर, बसवेश्‍वर नगर, नंदीकेश सोसायटी, धर्मराज नगर, कामाक्षी नगर, सिध्दमोग नगर, (शेळगी), शुक्रवार पेठ आणि माशाळ वस्ती, उत्कर्ष नगर (विजयपूर रोड) येथे नव्या रुग्णांची भर पडली आहे.

आतापर्यंत सर्वाधिक को- मॉर्बिड रुग्णच कोरोनाचे बळी ठरले आहेत. अशा परिस्थितीत त्यांचा जीव वाचविण्याच्या हेतूने संपूर्ण राज्यभर ‘कुटूंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत घरोघरी जाऊन सर्व्हे केला जात आहे.

सोलापूर शहरात सुमारे 40 हजार ज्येष्ठ नागरिकांना पूर्वीचे गंभीर आजार असल्याची माहिती यापूर्वीच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे. सर्व्हेवेळी अशा व्यक्‍तींची ऑक्‍सिजन लेव्हल, तापमानाची नोंद वारंवार घेऊन तब्बेतीची विचारपूस केली जाते.

अनेक कुटुंबातील व्यक्‍ती सहकार्य करीत नाहीत, ही वस्तुस्थिती सर्व्हे करणाऱ्या शिक्षकांनी संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांसमोर कथन केली. त्यानंतरही काही अधिकाऱ्यांकडून त्यांना अंदाजे तापमान व ऑक्‍सिजन लेव्हल नोंदविण्याचा सल्ला दिला जातोय.

यापूर्वीही तीनवेळा सर्व्हे झाला असतानाही शहरात पुन्हा 60 वर्षांवरील व्यक्‍तींचाच कोरोनामुळे मृत्यू होत असल्याचे आश्‍चर्य व्यक्‍त होत आहे.

आज सुशिल नगर (विजयपूर रोड) येथील 60 वर्षीय महिला, आरटीओ कार्यालयाजवळील 78 वर्षीय पुरुष, माधव नगरातील 65 वर्षीय महिला आणि रोहिणी नगर भाग तीनमधील 85 वर्षीय पुरुषाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: Solapur corona news

संबंधित बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

अस्मानी-सुलतानी संकटांपुढे १८ वर्षांचा पोराचा धीर सुटला; संकटांच्या मालिकेने सोलापूर जिल्ह्यातील तरुण शेतकऱ्याचा घेतला बळी; रुग्णालयात नातेवाइकांची गर्दी

September 30, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

गुगलवरून नंबर शोधणं पडलं महागात! पाच रुपये ऑनलाइन पाठवायला सांगून पाच लाख खात्यातून लुटले; हॉस्पिटल अपॉइंटमेंटच्या नावाखाली सायबर दरोडा

October 1, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

शेतकऱ्यांनो आणि व्यापाऱ्यांनो सावधान! जिल्ह्याची वेस ओलांडण्यापूर्वी ‘हा’ नियम नाही वाचला तर थेट पोलीस कारवाई; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचा मोठा निर्णय

October 1, 2026
प्रियकराच्या सांगण्यावरूनच जन्मदात्या आईने 9 महिन्याच्या बाळाचा गळा घोटला

दारूचे व्यसन ठरले काळ! पत्नीच्या विरोधाने खवळलेल्या पतीने कोयत्याने वार करून केली हत्या

September 28, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ज्येष्ठ नागरिकांचा मोठा विजय! सुनेची याचिका फेटाळली; घराचा ताबा वृद्ध सासू-सासऱ्यांकडेच राहणार

September 30, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

​मोठी खळबळ! पोलिसांनाच गाडीखाली चिरडण्याचा प्रयत्न; पंढरपुरात आरोपींची बेधडक कृती, पाठलाग करून मुसक्या आवळल्या

September 27, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

मोठी बातमी! दुष्काळाच्या झळा; दोन शेतकऱ्यांनी गमावला जीव, लातूर आणि सोलापूर जिल्ह्यातील धक्कादायक घटना

September 27, 2026
Next Post
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

ताज्या बातम्या

न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

चाकूने भोसकून थरार घडवणाऱ्या वडदेगाव येथील दत्ता बागल यांचा हत्या प्रकरणातील दोन्ही आरोपींची तुरुंगातच रवानगी; सोलापूर न्यायालयाचा दणका; वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य

October 2, 2026

चेकपोस्टवर थरार! पोलिसांची नाकाबंदी तोडून कार पळाली, पण पाठलाग करत दारूने भरलेला टेम्पो पकडलाच; १० लाखांच्या मुद्देमालासह मंगळवेढ्याचे दोघे अटकेत

October 2, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

शेतकऱ्यांच्या बांधावर आमदार! समाधान आवताडे आज मंगळवेढ्यातील दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यावर

October 2, 2026
कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

कथित खोट्या ॲट्रॉसिटी गुन्ह्याची निष्पक्ष चौकशी करा; अन्यथा ३ ऑक्टोबरपासून मंगळवेढा तालुका बेमुदत बंद; समस्त मंगळवेढेकर नागरिकांचा पोलीस प्रशासनाला थेट इशारा

October 1, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा हादरले! वादाच्या तडजोडीसाठी बोलावून महिलेला लज्जास्पद वागणूक व बेदम मारहाण प्रकरणी नगरसेवकासह १२ जणांवर गुन्हा

October 1, 2026
तगडा बंदोबस्त! सोलापूर व माढा लोकसभेसाठी आजपासून अर्ज दाखल होणार, अनामत रक्कम रोखच भरावी लागणार; उमेदवाराबरोबर ‘एवढ्या’ लोकांनाच प्रवेश

दुष्काळात दांडी मारणाऱ्या अधिकाऱ्यांवर थेट गुन्हे दाखल होणार; सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; ​मुख्यालय सोडण्यास सक्त मनाई

September 30, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा