mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने भालकेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने भालकेंची मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता



मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-

सोलापूर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार भारत भालके यांचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे . राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहिलेल्या आ.भारत भालके यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मंगळवेढा उपसा सिंचन योजना , पंढरपूर एमआयडीसी आणि पंढरपूर – मंगळवेढ्यातील प्रलंबित विकासकामे प्राधान्याने मार्गी लागतील ,अशी अपेक्षा आहे. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814




पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात हॅट्रिक केलेल्या भालकेंनी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी कोणतीही नवीन आश्वासने दिलेली नाहीत. १० वर्षांत भालके यांनी विधानसभेत अनेक प्रश्नांच्या संदर्भात सातत्याने आवाज उठवला परंतु त्यांच्याकडे पक्षीय भूमिकेतून पाहिले गेल्याने कामे होऊ शकली नाहीत. आता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस देखील सहभागी होत आहे . राज्यातील गेल्या चार दिवसांतील राजकीय घडामोडींच्या वेळी आ.भालके यांच्याविषयी उत्सुकता निर्माण झाली होती. 

परंतु आ.भालके यांनी कोणताही वेगळा विचार न करता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची भूमिका घेतली. त्यामुळे बदललेल्या राजकीय परिस्थितीत आमदार भालके यांचा मंत्रिपदासाठी प्राधान्याने विचार होईल. 

आ.भालके यांना ग्रामीण भागातील प्रश्नांची जाण आहे. त्याचबरोबर त्यांचे उत्तम वक्तृत्व आणि सभागृहातील गेल्या १० वर्षांतील कामाचा अनुभव या गोष्टी लक्षात घेऊन त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यातून मंत्रिमंडळात समावेश होण्याची दाट शक्यता आहे. त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाल्यास मतदारसंघातील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी मदत होईल . 

शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शेतीपरक उद्योगांना चालना देण्याची आवश्यकता आहे. पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील सुशिक्षित बेकार तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे . अभियांत्रिकी शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांच्या हाताला काम नाही. त्यामुळे एमआयडीसी उभारून तिथे उद्योग व्यवसाय उभारणीस प्रोत्साहन दिले पाहिजे. पाणी , रस्ते , रेल्वे सेवा आणि कुशल कामगार मुबलक प्रमाणात उपलब्ध असल्याने एमआयडीसीमध्ये नवउद्योजक उद्योग सुरू करतील आणि तिथे गरजू तरुणांना काम मिळू शकेल. 

आता महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर येणार असल्याचे स्पष्ट झाल्याने आ.भालके यांना मतदारसंघातील गेल्या काही वर्षांतील अनेक प्रलंबित कामे मार्गी लावता येऊ शकतील.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांचे २ कोटी ५३ लाख आले;खात्यावर वर्ग करण्यात येणार

मंगळवेढा तालुक्यातील छावणी चालकांचे २ कोटी ५३ लाख आले;खात्यावर वर्ग करण्यात येणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

धनश्री अर्थकारणाच्या यशस्वी परंपरेचा तीन दिवस दिमाखदार सोहळा; शरद पवार व सुशीलकुमार शिंदे यांच्या उपस्थीत संपन्न होणार प्रा.शिवाजीराव काळुंगे सर यांचा अमृतमहोत्सव

दुष्काळाचा बिमोड करण्यासाठी शेतकऱ्यांची वज्रमुठ; मंगळवेढ्यात गाजणार ३४ वी ‘पाणी संघर्ष परिषद; २६ जूनला दुष्काळग्रस्तांचा हुंकार

June 23, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

मोठी बातमी! मंगळवेढा तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा बिगुल वाजला; प्रारूप आरक्षण जाहीर होताच इच्छुकांची उडाली धावपळ; हरकती नोंदवण्यासाठी अवघे ‘इतके’ दिवस शिल्लक

June 23, 2026
मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 10 जणांना लागण

भयंकर निष्काळजीपणा! डॉक्टरांच्या अनुपस्थितीत नर्सने केली प्रसूती; निष्पाप माता-बाळाचा बळी, चितेच्या राखेत पुरावा

June 22, 2026
बळीराजाला मोठा दिलासा! शेतकरी कर्जमाफीची घोषणा; देवेंद्र फडणवीसांची घोषणा; कोणाचे कर्ज होणार माफ?

शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी घोषणा! राजकारण की समाजकारण? मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना थेट आव्हान; नेमका प्लॅन काय?

June 22, 2026
महिलांनो! बसने प्रवास करताय तर सावधान, मंगळवेढा बसस्थानकावरून महिला प्रवाशाचे १० लाख किंमतीचे सोन्याचे दागिने चोरट्याने हातोहात पळविले; स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल

सावधान! मंगळवेढा बस स्टँडवर चोरटे सक्रिय; वृद्धेचे दागिने आणि रोकड लंपास, गुन्हा दाखल; प्रवाशांची सुरक्षा धोक्यात

June 22, 2026
​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

​मंगळवेढ्यातील महिलांनो सावधान! मॉर्निंग वॉक दरम्यान शिक्षिकेसोबत घडला धक्कादायक प्रकार

June 21, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा