mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

प्रेयसीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न;मंगळवेढ्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
October 11, 2020
in Uncategorized
प्रेयसीचा गळा दाबून खुनाचा प्रयत्न;मंगळवेढ्यातील दोघांविरोधात गुन्हा दाखल

मंगळवेढा टाईम्स वृत्तसेवा:-



गेल्या तीन वर्षांपासून एकत्रित (प्रेमसंबंधातून लिव्ह इन रिलेशनशिप) राहत असलेल्या प्रेयसीचा प्रियकराने गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 29 नोव्हेंबर रोजी वासुद रोड,सांगोला येथे घडली आहे. याबाबत प्रेयसीच्या तक्रारीवरून श्रीकांत रामकृष्ण दुधाळ (रा. खवे, ता.मंगळवेढा) व पप्पू माने या दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. 

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क:7588214814


सांगली येथील 26 वर्षीय युवती व श्रीकांत रामकृष्ण दुधाळ (रा.खवे, ता.मंगळवेढा) यांचे गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. श्रीकांत दुधाळ हा ट्रकचालक म्हणून सांगली मार्केट यार्ड येथे काम करीत होता. श्रीकांत दुधाळ व युवती गेल्या तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये एकत्र राहत होते. 1 नोव्हेंबर रोजी श्रीकांत दुधाळ याने आई-वडिलांच्या इच्छेखातर लग्न केले असल्याचे युवतीस सांगितले. माझे लग्न झाले असले तरी तुझ्याशी लग्न करणार आहे, लग्न झालेल्या बायकोस फार दिवस नांदवणार नाही, मी तुझ्यासोबत लग्न करतो, असे युवतीस श्रीकांत दुधाळ वारंवार सांगत होता. यावरून युवतीत व श्रीकांत दुधाळ या दोघांत वारंवार भांडणे होत होती. 

29 नोव्हेंबर रोजी श्रीकांत दुधाळ याने प्रेयसीस तू सांगोला येथील बसस्थानकावर थांब, मी तुला भेटायला येतो, असे सांगितले. सांगोला येथील बसस्थानकावर श्रीकांत दुधाळ व त्याचा मित्र पप्पू माने हे दोघेजण आले. पप्पू माने याने आता रात्र भरपूर झाली आहे. त्यामुळे आपण माझ्या घरी जाऊया, असे म्हणून तिघेही दुचाकीवरून वासुद रोडने निघाले. वासुद रोडवरील एका निर्जनस्थळी दुधाळ याने अत्याचार केला असता, तिने त्यास नकार दिला. त्या वेळी श्रीकांत दुधाळ याने प्रेयसीचा हाताने गळा दाबण्याचा प्रयत्न केला. श्रीकांत दुधाळ हा पप्पू माने यांच्याकडून पांढऱ्या रंगाची वायर घेऊन प्रेयसीचा गळा आवळू लागला. त्या वेळी प्रेयसीने प्रतिकार करून सुटका करून घेतली. तसेच हा प्रकार कोणाला सांगितला तर मी जीव देईन, अशी धमकी श्रीकांत दुधाळ याने दिली. 

याप्रकरणी प्रेयसीने प्रियकर श्रीकांत दुधाळ व पप्पू माने यांच्याविरुद्ध गळा आवळून खून करण्याचा प्रयत्न केल्याबाबत सांगली येथील विश्रामबाग पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा सांगोला पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पोलिस निरीक्षक सुरेश नलवडे तपास करीत आहेत.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

संबंधित बातम्या

सोने-चांदीचे दागिने खरेदी करायचेय मग वाट कसली पाहताय; भावात मोठी घसरण

खळबळ! मुलीच्या लग्नासाठी बुक केलेले सोन्याचे दागिने न देता चार लाखांची फसवणूक; विधवा महिलेची पोलीस ठाण्यात धाव; सोलापूर जिल्ह्यातील प्रकार

January 1, 2026

1 april to 9 april birthday

March 31, 2023

आठ मार्च वाढदिवस

March 8, 2023

प्रा.शिवाजीराव काळुंगे सर वाढदिवस

March 6, 2023
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

पालकांनो! दहावी निकालाच्या तारखेची अद्याप घोषणा नाही; विद्यार्थी, पालकांमध्ये निकालाची उत्सुकता शिगेला

June 15, 2022
आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

आ.समाधान आवताडेंच्या कामगिरीने भारावले मुख्यमंत्री; तोंडभरून केले कौतुक

July 21, 2021
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

शेतकऱ्यांना कोणीच वाली नाही! खत विकेत्यांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू; शेतकरी संघटना गप्प का?

July 12, 2021
रमजान ईदचा सण साधेपणाने साजरा करावा व घरातच नमाज पठण करावे : मुजम्मील काझी

केंद्र सरकारने इंधन व खत दरवाढ न थांबवलेस राष्ट्रवादी पद्धतीत अंदोलन करू; मुजम्मील काझी यांचा इशारा

May 17, 2021
कोरोनाला रोखण्यासाठी मंगळवेढा व्यापारी महासंघाचा पुढाकार; नागरिकांच्या सुरक्षतेच्या दृष्टीने घेतला ‘हा’ निर्णय

मंगळवेढेकरांनो नीट समजून घ्या! शहरात दुकानासाठी पुर्वीचेच नियम लागू असतील; विनाकारण बाहेर पडाल तर…

May 17, 2021
Next Post
आयडिया-व्होडोफोन एअरटेलच्या ग्राहकांना बसणार झटका; उद्यापासून 50 टक्के दरवाढ

आयडिया-व्होडोफोन एअरटेलच्या ग्राहकांना बसणार झटका; उद्यापासून 50 टक्के दरवाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

मंगळवेढ्याचा शूर सुपुत्र अमर झाला! श्रीनगरमध्ये कर्तव्य बजावताना जवान वैभव आवताडे यांना वीरमरण; आज रात्री पार्थिव पुण्यात येणार

August 15, 2026
सोलापूर! चोरीच्या संशयावरून झाडाला उलटं लटकवून जमावानं केला तरूणाचा खून

मंगळवेढ्यातील ‘त्या’ एका घटनेने खळबळ! प्रांत कार्यालयाशेजारी मध्यरात्री नक्की काय घडलं? वाचा पडद्यामागचे सत्य…

August 15, 2026
मेजवानी! मराठी व हिंदी गाण्याच्या ‘ट्रॅक शो’; सुरसंगम ग्रुपचा आज सहावा वर्धापनदिन सोहळा

मंगळवेढ्यात आज घुमणार देशभक्तीचा सूर! ‘सुरसंगम’ व ‘माजी सैनिक संघटने’तर्फे ‘मेरे देशप्रेमियों…’ कार्यक्रमाचे भव्य आयोजन

August 15, 2026
सोलापुरात चोरट्यांची नवी शक्कल!  खिडकीतून बांबूच्या साह्याने केली चोरी

मंगळवेढ्यात चोरांचा उच्छाद! पोलीस प्रशासनाला उघडे आव्हान; घर बंद दिसताच घरफोडी करून ६७ हजारांचा ऐवज लांबवला; वाढदिवसाला गेले अन् चोरट्यांनी साधला डाव

August 15, 2026
मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

मंगळवेढ्यात ‘विश्वकर्मा महिला नागरी सहकारी पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; आकर्षक ठेवी व कर्ज योजनांचा शुभारंभ

August 15, 2026
​मंगळवेढेकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद! ‘दामाजी सिटी’मध्ये अवघे मोजकेच प्लॉट्स शिल्लक; खरेदीसाठी ‘दामाजी सिटी’ ठरतेय नागरिकांची पहिली पसंती

गुंतवणूक भविष्याची, बचत आजची! ​स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी ‘फ्री खरेदीखत’ ऑफर जाहीर; ‘दामाजी सिटी’ला नागरिकांचा उदंड प्रतिसाद; आजच 9890605962 बुकिंगसाठी कॉल करा

August 14, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा