मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर बदली झाली मात्र त्यांच्या जागी कोण पोलीस अधीक्षक पदाचा भार घेणार याची सोलापूरकरांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी.आर पाटील व तुषार दोशी या तिघांपैकी एका अधिकाऱ्याची सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस अधीक्षक या पदावर वर्णी लागणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे.
शासनाने गुरुवार, १७ सप्टेंबर रोजी राज्यातील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्त, विशेष पोलीस महानिरीक्षक व पोलीस उपमहानिरीक्षक श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. त्यात मनोज पाटील यांची बदली अहमदनगरच्या पोलीस अधीक्षक पदावर करण्यात आल्याचा उल्लेख होता.
मात्र सोलापूरच्या रिक्त झालेल्या अधीक्षक पदावर कोणाचीही नियुक्ती करण्यात आली नव्हती.
दरम्यान, बदलीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी आज बुधवार दि.२३ सप्टेंबर रोजी अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगितले होते.
दि.२१ सप्टेंबर रोजी मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर पुकारलेल्या सोलापूर बंदच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पाटील यांनी आपला पदभार दोन दिवस लांबणीवर टाकला होता.
दरम्यान, आता शुक्रवारनंतरच अहमदनगरचा पदभार घेणार असल्याचे सांगण्यात आले पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दि.१ आॅगस्ट २०१८ रोजी सोलापूरच्या ग्रामीण पोलीस दलाचा पदभार घेतला होता.
दोन वर्षे ५२ दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मनोज पाटील यांची अहमदनगर येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली झाली मनोज पाटील हे १८ वे पोलीस अधीक्षक होते.
सोलापूरचा तिघांनाही अनुभव
सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या पोलीस अधीक्षक पदासाठी सध्या लातूरचे पोलीस अधीक्षक राजेंद्र माने, पुणे शहर पोलीस दलातील पी.आर.पाटील, तुषार दोशी यांचीही नावे चर्चेत आहेत.
राजेंद्र माने,पी.आर.पाटील व तुषार दोशी या तीन अधिकाऱ्यांनी यापूर्वी सोलापुरात विविध पदांवर आपली सेवा बजावली आहे.
या तीन अधिकाऱ्यांना सोलापूरच्या गुन्हेगारी, राजकीय पार्श्वभूमीची माहिती आहे.त्यामुळे या तिघांपैकी एका अधिकाऱ्यांची वर्णी लागली तर सोलापूर जिल्ह्यातील माहिती असणारा अधिकारी लाभणार आहे हे मात्र नक्की.
Solapur Rural Discussion of Mane, Patil Antushar Doshi for the post of Superintendent of Police
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज