टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घरासमाेर गाेठ्यात बांधलेले १ बाेकड व २ शेळ्या आसा ऐकुन २४ हजाराचा मुद्देमाल चाेरून नेल्याची घटना घडली आसुन या प्रकरणी आज्ञात चाेरट्याविरूध्द गून्हा दाखल करन्यात आला आहे.
तसेच मंगळवेढा शिवारातील यादव वस्ती येथून घरासमोरील कंपौंडमध्ये बांधलेली 25 हजार रुपये किमतीची पाच बोकडे, 8 हजार रुपये किमतीच्या दोन पाटी असा एकूण 33 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरटयांनी चोरून नेल्याची घटना घडली असून या प्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दोन वेगवेगळ्या घटनेत 57 हजारांच्या बोकड व शेळ्या आतापर्यंत चोरीला गेले आहेत. दरम्यान चोरटयांनी घरफोडीनंतर आपला मोर्चा शेळयांकडे वळविल्याने पशुपालकांनी चोरटयांबाबत धास्ती घेतली आहे. पोलिसांनी त्या चोरटयांचा शोध लावून पशुपालकांना भयमुक्त करावे अशी मागणी होत आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी सुनील भारत सोनवले हे पशूपालक आसून त्यांनी दिनांक १४ रोजी दिवसभर शेतामध्ये शेळ्या चारून सायंकाळी एक जर्सी व काही शेळ्या घरासमाेरील गोठ्यात बांधल्या होत्या.
रात्री बारा वाजता कुत्रे भुंकण्याचा आवाज येत असल्याने ते उठून गोठ्यात आले. त्यांनी पहिले आसता शेळ्या व जनावरे गाेठ्यात होती.
त्यानंतर दि.१५ च्या पहाटे ५.३० वाजता नैसर्गिक विधीसाठी फिर्यादी उठले असता त्यांना घरासमोर बांधलेली एक शेळी,एक बोकडे, एक पाठ असे चोवीस हजाराची किमतीची शेळ्या दिसून आले नाहीत.
मंगळवेढा शिवारातून 33 हजार रुपये किमतीच्या शेळया व बोकडे गेली चोरीला; अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी ताई गोरख यादव (वय 30) यांची मंगळवेढा शिवारातील यादव वस्ती येथे शेती असल्याने शेती व्यवसायाबरोबर त्या शेळीपालन व्यवसाय करतात.दि. 15 रोजी शेळया चारून घरासमोरील कंपौंडमध्ये बांधल्या होत्या.
पहाटे 2.30 वा. कुत्री भुंकण्याचा आवाज ऐकू आल्याने फिर्यादी झोपलेली उठून कंपौंडमध्ये शेळया आहेत का याची पाहणी करीत असताना 5 बोकडे व 2 लहान पाटी जागेवर दिसून आल्या नाहीत.सर्वत्र शोधाशोध केली असता त्या कोठेही मिळून आल्या नाहीत.
अज्ञात चोरटयाने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर त्यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद दाखल केली आहे.ब्रम्हपुरी येथेही शेळया चोरून नेण्याचा प्रकार घडला होता.
शेळया चोरण्याच्या प्रकारात दिवसेंदिवस वाढ होत असल्याने पशुपालक धास्तावले आहेत.यापुर्वीही शेळया चोरीला गेल्याने एका सतर्क नागरिकामुळे शेळीचोर पोलिसांच्या जाळयात अडकला होता.
या चोरटयाकडून अनेक शेळया जप्त करण्यात आल्या होत्या. पुन्हा शेळया चोर्याचे प्रमाण वाढले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज