टीम मंगळवेढा टाईम्स ।
सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण भागात शनिवारी करण्यात आलेल्या कोरोना चाचण्यात ३८७ नवीन बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
आता शहर – जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ९ ८२ इतकी झाली आहे.
शनिवारी सोलापूर शहरात १७७ , तर जिल्हा ग्रामीण भागात २१० नवीन बाधित रुग्ण आढळून आले. सोलापूर शहर व जिल्हा ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून ही बाब चिंताजनक आहे.
मात्र दिलासादायक बाब म्हणजे शहर – जिल्ह्यातील कोरोना आजारामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण घटले आहे. शनिवारी १ हजार ६८७ तपासणी अहवाल प्राप्त झाले.
त्यापैकी १ हजार ३०० अहवाल निगेटिव्ह , तर ३८७ अहवाल पॉझिटिव्ह आले. आजारातून बरे झालेल्या ७४ जणांना घरी सोडण्यात आले.
आता शहर – जिल्ह्यातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १ हजार ९ ८२ इतकी झाली आहे. शनिवारी जिल्हा ग्रामीण भागातील ९०२ तपासणी अहवाल प्राप्त झाले . त्यापैकी ६ ९ २ अहवाल निगेटिव्ह,
तर २१० अहवाल पॉझिटिव्ह आले . आजारातून बरे झालेल्या ६३ जणांना घरी सोडण्यात आले. आता जिल्हा ग्रामीण भागातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९०८ झाली आहे.
शनिवारी सोलापूर शहरातील ७८५ तपासणी अहवाल प्राप्त झाले . त्यापैकी ६०८ अहवाल निगेटिव्ह, तर १७७ अहवाल पॉझिटिव्ह आले.
आजारातून बरे झालेल्या ११ जणांना घरी सोडण्यात आले . आता सोलापूर शहरातील अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ९ ७४ इतकी झाली आहे.
शनिवारी आढळलेल्या नवीन रुग्णांची सोलापूर शहरासह तालुकानिहाय संख्या
सोलापूर शहर – २१० , अक्कलकोट – ३ , बार्शी – ४८, – करमाळा – १५ , माढा – ८, माळशिरस – ३४ , मंगळवेढा- २, मोहोळ – ३ , सांगोला – २१ , दक्षिण सोलापूर – १७ . उत्तर सोलापूर – १ , पंढरपूर ५८, एकूण- ३८७.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज