टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर येथील उपजिल्हा रुग्णालय हे सध्या 100 खाटांचे आहे. स्थानिक आमदार समाधान अवताडे यांच्या मागणीनुसार 200 खाटांचे सामान्य रुग्णालयात रूपांतर करून
लवकरच कॅबिनेटच्या बैठकीत अंतिम मंजुरी देऊन निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी पंढरपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत दिली.
संपूर्ण देशाला मधुमेह या रोगाने ग्रासले आहे, यामुळे ज्याप्रमाणे ‘पोलिओ हटाव मोहीम’ राबविण्यात आली, त्याचपध्दतीने
महाराष्ट्रात ‘मधुमेह हटाव’ ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याची घोषणा पंढरपूर येथे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली.
सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असणाऱ्या डॉ. तानाजी सावंत यांनी पंढरीत विश्रामगृह येथे पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी प्रा. शिवाजी सावंत, महावीर देशमुख यांच्यासह शिंदे गटाच्या शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज