टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील हाजापूर येथून 19 वर्षीय नवविवाहिता बेपत्ता झाली असल्याची तक्रार तीच्या पतीने मंगळवेढा पोलिसात केली आहे.
दरम्यान या नववधूचा पोलिस कसून शोध घेत आहेत.मंगळवेढयाच्या ग्रामीण भागात गेल्या दोन दिवसात दोन महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी,नवविवाहितेचे पती हे वाहन चालक असून ते कामानिमित्त ऊरण येथे गेले होते.दि.19 डिसेंबर 2021 रोजी यांचा विवाह झाला आहे.
दि.15 फेबु्रवारी रोजी सायंकाळी 5.00 वा. चालकाच्या आईने फोन करून सांगितले तुझी पत्नी घरी नसून ती अचानक गायब झाली आहे.
तीचा सर्वत्र शोध घेतला परंतू ती मिळून आली नाही.असे सांगताच चालक दि.15 रोजी रात्री 8.00 आपल्या मूळ गावी हाजापूर येथे येवून मंगळवेढा पोलिस ठाण्यात पत्नी बेपत्ता झाल्याची खबर दिली.
चालकाने पत्नीबाबत सासरवाडीलाही भ्रमणध्वनीवरून चौकशी केली मात्र ती मिळून आली नाही.
बेपत्ता महिलेचे वर्णन-अंगाने सडपातळ,रंग सावळा,चेहरा गोल,नाक बसके,डोळे काळे,उंची 4.5 फुट,नेसणेस लाल व आकाशी रंगाची साडी अशा वर्णनाची मुलगी कोणाच्या नजरेस आल्यास त्यांनी मंगळवेढा पोलिसांशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज