मंगळवेढा टाईम्स ऑनलाईन । सोलापूरात आज नव्याने 13 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. आज सायंकाळी नव्याने आलेल्या 13 रुग्णांमध्ये 8 पुरुष व 5 महिलांचा समावेश आहे. आज नव्याने वाढलेल्या 13 रुग्ण मुळे सोलापुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 343 झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली.
आज एकूण 105 रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 13 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 92 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत.
3 हजार 243 जण आत्तापर्यंत निगेटिव्ह आले असून 24 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे. कोरोना मुक्त झालेल्या व्यक्तींची संख्या 113 असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली.
सोलापूर शहर व जिल्ह्यातील 3 हजार 833 जणांची आतापर्यंत कोरोना चाचणी करण्यात आली असल्याची माहितीही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिली. सोलापूर शहर व जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिकेच्यावतीने सुरू असलेल्या सर्व्हे मध्ये नागरिकांनी खरी माहिती द्यावी. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींची माहिती प्रशासनाच्यावतीने संकलित केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील ज्येष्ठ नागरिक व इतर आजाराने त्रस्त असलेल्या व्यक्तींना स्वतंत्र ठेवण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने मंगल कार्यालयांमध्ये व्यवस्था करण्यात आली असल्याचेही जिल्हाधिकारी शंभरकर यांनी सांगितले.
आजचे नवे रुग्ण
लष्कर 3
विजापूर नाका 1
नवनाथ नगर MIDC रोड 1
बापूजी नगर 1
शास्त्री नगर 1
दत्त चौक 1
कुमारस्वामी नगर 2
अरविंद धाम पोलीस वसाहत 1
भगवान नगर 1
सिव्हिल हॉस्पिटल हॉस्टेल 1
——————
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 9561617373 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज