टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला वैदयकिय अधिकारी यांना खालच्या पातळीवर बोलून शिवीगाळ करून शासकिय कामात अडथळा आणल्याप्रकरणी सोमनाथ माळी यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील फिर्यादी डॉ.सुलोचना लक्ष्मण जानकर (वय 35) ह्या मंगळवेढा ग्रामीण रुग्णालयात स्त्री रोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत.
दि.9 रोजी यातील फिर्यादी या सकाळी 11.25 वा. रुग्णालयामध्ये आल्या. त्यावेळी आरोग्य तपासणीसाठी महिला रुग्णांची बरीच गर्दी जमली होती.
फिर्यादी येण्यापुर्वी येथील महिला कर्मचारी केंदुळे यांनी ओ.पी.डी.चालू करून पेशंट तपासत होते. या दरम्यान सोमनाथ माळी हे येथे आले.व अर्वाच्य भाषेत बोलू लागले.
त्यावेळी फिर्यादीनी माझे कौटुंबिक अडचणीमुळे मला येण्यास उशीर झाला असून महिला कर्मचारी केंदुळे यांनी सकाळीच ओपीडी चालू केली आहे.
मी आता सर्व पेशंट तपासते तुम्ही जावा असे फिर्यादी म्हणत असताना तु जाणेस सांगणारी कोण? असे म्हणून अर्वाच्च भाषा वापरून दमदाटी करीत शासकिय कामात अडथळा आणल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याचा अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अंकुश वाघमोडे हे करीत आहेत.
राष्ट्रवादीचे माजी शहराध्यक्ष सोमनाथ माळी यांची आरोग्यमंत्री, महिला आयोगाकडे तक्रार
दरम्यान, राष्ट्रवादीचे माजी शहर आध्यक्ष सोमनाथ माळी यांनी मी शहरातील प्रथम नागरिक असल्याने गर्भवती महिलांनी ग्रामीण रुग्णालयातील सेवेबाबत माइयाकडे तक्रार केल्याने मी दि.9 रोजी 11.25 वाजता . वास्तवता जाणून घेण्यासाठी दवाखान्यात गेलो होतो.
सदर प्रसंगी दवाखान्यात मोठया प्रमाणात महिला तपासणीसाठी आल्या होत्या. तेथे महिला डॉक्टर नसल्याने त्यांना दोन तास तिष्ठत बसावे लागले.11.45 वा. महिला डॉक्टर सुलोचना जानकर ह्या रुग्णालयात आल्या.
यावर उशीरा येण्याचे कारण विचारले असता तुम्ही शहाणपणा करू नये,अशी अरेरावीची भाषा वापरल्याने याबाबत माळी यांनी लेखी तक्रार आरोग्यमंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील,महिला आयोग अध्यक्षा मुंबई,जिल्हाधिकारी,जिल्हा शल्य चिकित्सक सोलापूर यंाचेकडे लेखी तक्रार माळी यांनी करून संबधीतावर कारवाईची मागणी केली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज