टीम मंगळवेढा टाईम्स ।
एका 70 वर्षीय आजीला चारचाकी वाहानात बसवुन नंदेश्वरला साेडन्याचा बहाना करीत सांगाेला माण नदी पात्रात निर्जऴस्थळी नेऊन चाकूचा धाक दाखवून अंगावरील पन्नास हजाराचे दागिने लुटून नेल्या प्रकरणी
चार महिन्यानंतर आराेपी संभाजी शिवाजी भोसले रा.(मुळेगाव पारधी कॅम्प) याला अटक करण्यात पाेलीसांना यश आले असून त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
या घटनेची हकीकत अशी की, फिर्यादी लक्ष्मी मुरलीधर शेजाळ (रा.नंदेश्वर) ह्या आजी दि.3 एप्रिल रोजी दुपारी 12:45 वाजता नंदेश्वर गावाकडे जाण्यासाठी मंगळवेढा येथिल सांगोला नाका येथे थांबले असता
एक ओमनी सारखी दिसणारी चार चाकी गाडी तिथे आले व आरोपी तथा चालक संभाजी भोसले यांनी आजी गाडी नंदेश्वरला जाते गाडीत बसा असे म्हणून अजिला गाडीत बसून नंदेश्वरला न नेहता
ती सांगोला येथील माण नदीच्या पुढे निर्जनस्थळी नेऊन आजीला चाकूचा धाक दाखवून आजीच्या गळ्यातील एक तोळा सोन्याचे 50 हजार रुपये किमतीचे गंठण
जबरदस्तीने काढून घेण्याची घटना घडली हाेती त्यानंतर आजीने मंगळवेढा पोलिसात फिर्याद दाखल केल्यानंतर यामध्ये आजीने चालकाच्या अंगावर
काळा रंगाचा शर्ट, काळ्या रंगाचे पॅन्ट व डोक्याला टोपी, वय अंदाजे 30 ते 35 वर्षाचे असल्याचे वर्णन फिर्यादीत नमूद केले होते.
या वर्णनावरून पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली डी वाय एस पी राजश्री पाटील व पोलीस निरीक्षक रंणजीत माने यांनी सुतावरून स्वर्ग गाठत तब्बल चार महिन्याच्या कालावधीनंतर का? होईना
आरोपीला पकडण्यात यश मिळवले असून त्याच्याकडून 50 हजार रुपये किमतीचे दागिनेही हस्तगत करून आजीला न्याय मिळवुन दिला आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज