mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
June 29, 2022
in सोलापूर
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

टीम मंगळवेढा टाईम्स ।

शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी मोताश्रीवर मुक्काम हलवला आहे, तर शिवसेनेचे नाराज आमदार भाजपबरोबर सत्तास्थापन करा म्हणत आहेत.

हिंदुत्व व मराठा बाणा जपत ठाकरे भाजपबरोबर जाण्यास इच्छुक नाहीत. अशा परिस्थितीत राष्ट्रवादी व काँग्रेस मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी असल्याचे सांगत आहेत.

मात्र, तरीही महाविकास आघाडी सरकार टिकेल की नाही, याबाबत व्दिधा मनस्थिती आहे. त्यामुळे यंदा आषाढी वारीची शासकीय महापूजा करण्याचा मान कोणाला मिळणार, याबाबत पंढरीमध्ये चर्चा रंगताना दिसून येत आहे.

दरवर्षी आषाढी सोहळ्यातील शासकीय महापूजेचा मान राज्याच्या मुख्यमंत्र्यांना असतो. अपवादात्मक परिस्थिती वगळता इतर सर्वच वेळी राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढी सोहळ्यातील महापूजा मोठ्या भक्‍तिभावात पार पडल्या आहेत.

अनेकवेळा राज्यातील विविध प्रश्‍न घेऊन मुख्यमंत्र्यांना या महापूजेपासून रोखण्याचा प्रयत्न विविध राजकीय पक्ष व संघटनांकडून होत असल्याने आषाढी सोहळा कालावधीमध्ये या महापूजेबाबत नेहमीच राजकीय फड रंगल्याचे पाहावयास मिळते.

त्यामुळे प्रत्येक आषाढी सोहळ्यातील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणारी शासकीय महापूजा महत्त्वपूर्ण घटना ठरत असते

कोरोनानंतर दोन वर्षांनी आषाढी सोहळा भरत असल्याने मोठ्या भक्‍तिभावाने व भाविकांच्या वाढत्या संख्येने हा सोहळा साजरा होत असून यंदाच्या या सोहळ्यातील महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना विठ्ठल मंदिर समितीच्यावतीने निमंत्रण देण्यात आले आहे.

मंदिर संवर्धनास भरघोष निधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व मंत्री आदित्य ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला होता.

सध्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात राजकीय घडामोडी घडताना दिसून येत आहेत.महाविकास अघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेस या घटक पक्षांच्या गोटातील राजकीय खलबतांना चांगलाचा राजकीय रंग चढू लागला आहे.

या सर्व घडामोडींमुळे राज्यातील महाविकास अघाडीच्या सत्तेला धोका निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळातून होत आहे.

परंतु, भाजपच्या अनेक नेत्यांकडून तसा दावाही केला जात आहे. अशा परिस्थितीमध्ये जर सत्ताबदल झाला तर मुख्यमंत्री या नात्याने यंदाच्या आषाढी वारीची शासकीय महापूजा करण्याचा मान कोणाला मिळणार की हा सत्तासंघर्ष थंडावला जाऊन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनाच निमंत्रणाप्रमाणे महापूजा करण्याची संधी मिळणार, याकडे राज्यातील भाविकांसह पंढरपूरकरांचे लक्ष लागले आहे.

दि.10 जुलै रोजी आषाढी एकादशीचा मुख्य सोहळा साजरा होत आहे. आषाढी एकादशीची शासकीय महापूजा ही राज्याचे मुख्यमंत्री करत असतात.

मुख्यमंत्री कार्यालयाकडून येणारा आदेश अंतिम असणार

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीकडून अलिकडेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना रीतसर निमंत्रण देण्यात आले आहे. सध्या राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यामुळे महापूजेबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून येणारा आदेश अंतिम असणार आहे.– गहिनीनाथ महाराज औसेकर, सहअध्यक्ष

आतापर्यंत १८ मुख्यमंत्र्यांना महापूजेची संधी

यशवंतराव चव्हाण, मारोतराव कण्णमवार, वसंतराव नाईक, शंकरराव चव्हाण, वसंतदादा पाटील, शरद पवार, ए.आर. अंतुले, बाबासाहेब भोसले, शिवाजीराव निलंगेकर, मनोहर जोशी, नारायण राणे, विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडवणीस, उद्धव ठाकरे.

दोनवेळा महापूजेला विरोध

आतापर्यंत दोनवेळा महापूजेला विरोध झालेला आहे. १९७१ साली तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईकांना महापूजा करता आली. तेव्हा समाजवादी विचारसरणीच्या लोकांनी पूजाअर्चा करणे योग्य नाही म्हणून जनआंदोलन छेडले होते. त्यानंतर २०१८ मध्येही मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून देवेंद्र फडणवीस यांना विरोध झाला होता.

पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

जिल्ह्यात माउलींची पालखी ४ जुलैला तर तुकोबारायांची पालखी ५ जुलैला येणार आहे. पालख्यांच्या स्वागताला पालकमंत्री हजेरी लावण्याची परंपरा आहे. यंदा स्वागताला पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे उपस्थित राहणार की सत्तांतरात शहाजीबापूंना संधी मिळाल्यास त्यांना मान मिळणार, याचीही उत्कंठा लागलेली आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: विठ्ठल मंदिर

संबंधित बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
जिल्हा दूध संघ अध्यक्ष निवडीची बैठक ‘या’ महिन्यात; आज सर्वच संचालक गैरहजर

तुकाराम मुंडे पॅटर्नचा सांगोल्यात थरकाप! ग्राहकांच्या जिवाशी खेळणारे रॅकेट रडारवर; १५ लाखांचे ३७ हजार लिटर भेसळयुक्त दूध ओतले गटारात

July 12, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

कागदपत्रे बनावट, विद्यार्थीही खोटे! सोलापुरात केंद्र सरकारच्या योजनेत मोठा गैरव्यवहार; बनावट विद्यार्थी दाखवून केंद्राची शिष्यवृत्ती लाटली

July 11, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

बँकेचे पैसे बुडवणे भोवले! धनश्री मल्टीस्टेटची आक्रमक वसुली; कारखान्याच्या माजी संचालकाची थेट तुरुंगात रवानगी; न्यायालयाचा मोठा दणका

July 10, 2026
नागरिकांनो! शासकीय योजनेंची कामे प्रलंबित आहेत तर तुमच्या समस्या लेखी स्वरूपात आज द्या; आमदार समाधान आवताडे यांनी उद्या बोलावली आढावा बैठक

आ.समाधान आवताडेंचा धडाका! मंगळवेढ्याला म्हैसाळचे, तर पंढरपूरला कॅनॉलद्वारे मिळणार पाणी; वीज पुरवठाही ८ तास होणार

July 10, 2026
मॉर्निंग वॉकला जाताना अनोळखी वाहनाची धडक; मंगळवेढ्यातील वृध्दाचा मृत्यू

हट्टापायी पोटचा मुलगा गेला…; सांगोल्यातील ‘या’ घटनेने पालकांचे डोळे उघडले, नक्की वाचा काय घडलं?

July 8, 2026
शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारणाऱ्या बँकांची आता गय नाही; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन स्वतः करणार अर्जांची तपासणी; ‘या’ ४ बँकांना नोटिसा

मंगळवेढ्यातील १ लाख ९९ हजार मतदारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी! २००२ च्या यादीत नाव नसेल तर ‘या’ कागदपत्रांशिवाय पर्याय नाही

July 7, 2026
मोठी बातमी! सोलापूरचे नवे SP अतुल कुलकर्णी; शिरीष सरदेशपांडे यांची ‘या’ ठिकाणी झाली बदली

गुन्हेगारांनो सावधान! सुधारा, नाहीतर थेट कारवाई..; पोलिसांची सिंघम स्टाईल ॲक्शन; पोलीस अधीक्षकांनी गुंडांना बोलावून भर चौकात दिला सज्जड दम; लिहून घेतले हमीपत्र

July 7, 2026
Next Post
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

ताज्या बातम्या

निवडणूक कामात हलगर्जीपणा; सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल; दिलेले काम मुदतीत केले नसल्याचा ठेवला ठपका

July 14, 2026
धक्कादायक! सोलापुरात गेल्या २४ तासांत खुनाच्या तीन घटना; १६ महिन्यांच्या मुलाचा आईकडून खून

भयंकर! लग्नामध्ये सत्कारात नाव पुकारला नाही, रागाच्या भरात तलाठ्यानं तरुणाच्या डोक्यात टाकला लोखंडी माईक

July 14, 2026
भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

भेसळीच्या विळख्यातून महाराष्ट्राला वाचवण्यासाठी तुकाराम मुंढेंचा ‘हा’ मास्टरप्लॅन; नागरिकांना केली मोठी विनंती

July 14, 2026
शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

शिक्षक बँकेवर ‘गुरुजीं’चा डंका! शिवाजी पाटील गुरुजी व गुलाबराव पाटील यांच्या निवडीनंतर मुंढेवाडीत जल्लोष, भव्य नागरी सत्कार संपन्न

July 13, 2026
राजकीय घडामोड! मंगळवेढा नगरपालिका नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून ‘या’ नावाची चर्चा; राष्ट्रवादी स्वबळावर लढणार?

मंगळवेढेकरांनो लक्ष द्या! सोमवारी सकाळी ७ वाजल्यापासून ‘या’ महत्त्वाच्या मार्गांवर अचानक मोठा बदल, नक्की काय घडणार? पालिकेचा मोठा निर्णय

July 13, 2026
विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन परीक्षांसाठी वीजपुरवठा सुरळीत ठेवा

कर्नाटकात ८ तास, महाराष्ट्रात फक्त २ तास वीज? भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा आक्रोश; शेती धोक्यात; आम्हाला कर्नाटकात जाऊ द्या; शेतकऱ्यांचा सरकारला थेट इशारा

July 12, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा