टीम मंगळवेढा टाईम्स ।
पाणी विहिरीतील मोटर रस्सीच्या सहाय्याने काढत असताना अचानकपणे तोल जावून विहिरीत पडून डोक्यास जखम होवून
श्रीमंत देवकते हा मयत झाल्याची घटना हाजापूर येथे घडली असून याची आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी, यातील मयत हे दि.१९ रोजी दुपारी १२.०० वा . हाजापूर येथील त्यांचे शेतातील विहिरीतून मोटर काढण्यासाठी गेले होते.
सदर मोटर रस्सीच्या सहाय्याने मयत श्रीमंत व बाळू असे दोघेजण काढत असताना अचानक श्रीमंतचा तोल जावून तो २० फुट खोल पाणी नसलेल्या विहिरीत पडून बेशुध्द झाला.
सदर घटनेनंतर बेशुध्दावस्थेत खाजगी वाहनाने मंगळवेढा येथील एका हॉस्पीटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
मात्र तेथील डॉक्टरांनी श्रीमंत हा मयत झाल्याचे सांगितले. याची खबर सुभाष देवकते यांनी पोलिसांत दिल्यावर आकस्मात मयत अशी नोंद झाली आहे.
राज्यातील व देशातील ब्रेकिंग बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम तुमच्या पर्यंत .आजच Add करा तुमच्या Whatsapp ग्रुपवर 99 70 76 6262 हा आमचा नंबर.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 99 70 76 6262 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Mangalwedha Times News”
विश्वसनीय ऑनलाईन पोर्टल ‘मंगळवेढा टाईम्स’ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 75 88 214 814
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज