टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा तालुक्यातील सिध्दापूर ते वडापूर जाणाऱ्या रोडवर सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला हरणाच्या शिकारीला लागणारे लोखंडी हत्यारे मिळून आल्याप्रकरणी शंकू उर्फ शंकर सुरेश काळे (वय ३० रा.तामदर्डी) , नितीन विकास भोसले (रा.तामदर्डी ) या दोघांविरूध्द शस्त्र अधिनियम कायदयानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान या घटनेत एक १७ वर्षीय बालकाचाही समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी पोलिस हवालदार विजयकुमार भरले हे सोलापूरच्या स्थानिक गुन्हे शाखेत कार्यरत आहेत. त्यांना एका गंभीर गुन्हयातील आरोपी वडापूर परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर ते अधिकाऱ्यासह सापळा लावून
त्या आरोपीच्या प्रतिक्षेत असताना या दरम्यान वडापूर गावाकडून सिध्दापूर गावाकडे दोन मोटर सायकलस्वार मोठे गाठोडे ठेवून येत असल्याचे निदर्शनास आले.
सदर पथकास मोटर सायकलस्वारांचा संशय आल्याने त्यांना इशारा केला असता त्यातील एकजण पळून गेला. ही घटना दि. ८ रोजी २.१५ वा . घडली.
सदर मोटर सायकलस्वारास पथकाने त्यांची ओळख सांगून त्यांचे नाव, गाव विचारले असता आरोपी शंकू उर्फ शंकर सुरेश काळे व १७ वर्षीय मुलाची झडती घेतली असता एक लोखंडी पाते असलेला दांडपट्टा,
नायलॉन दोरीचे जाळे, काठया असा जंगली प्राणी पकडण्याचे साहित्य मिळून आले. त्याचबरोबर एक माती जातीचे मृत अवस्थेतील फिक्कट तपकिरी रंगाचे सुमारे ८ ते १० महिन्याचे हरीण मिळून आले.
दोन मोटर सायकलीसह इतर साहित्य असा १ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल त्यांच्याकडे मिळून आला असल्याचे पोलिसांनी सांगितले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज