टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात अन्न प्रक्रिया उद्योग निर्मितीसाठी चालना मिळावी म्हणून येथील शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या वतीने मंगळवेढा महोत्सवात केंद्रीय सूक्ष्म लघु मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेच्या सचिवा प्रियदर्शनी कदम महाडिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.सुभाष कदम उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती देताना सचिव प्रियदर्शनी कदम महाडिक म्हणाल्या की,
केंद्र सरकारच्या वतीने ग्रामीण भागातील उत्पादित होणाऱ्या अन्नधान्याच्या संबंधित प्रक्रिया करणारे अनेक उद्योग आहेत मात्र या उद्योगाची माहिती ग्रामीण भागात नसल्यामुळे अनेक जण यापासून वंचित राहिले आहेत.
त्यांना या उद्योगाची माहिती व्हावी व आपल्या भागात नवीन उद्योग निर्माण व्हावेत यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत कृषी उद्योजकता मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे सांगून दोन वर्षातील कोरोना साथीमुळे कालावधीत अनेक उद्योग बुडाले,
नोकऱ्या व शिक्षणाचे मोठे नुकसान झाले असले तरी सर्वांनाच अन्नधान्याची गरज असल्यामुळे अन्नप्रक्रिया उद्योग मात्र टिकून राहिला आहे भारतात अनेक चांगले अन्न प्रक्रिया उद्योग तयार होऊ शकतात.
त्याला एक चांगली बाजारपेठ मिळाल्यास या उद्योगातून लोकांना उत्पन्नाचे साधन व अनेक बेरोजगारांना रोजगार निर्माण होऊ शकतो.
महिलांना कडधान्य भाजीपाला फळे यातून उपपदार्थ निर्मिती साठी रोजगार मिळणार आहे आंबा, केळी, पपई, पेरू या फळापासून देखील रोजगार निर्मिती महिलांसाठी होऊ शकते.
आ.समाधान आवताडे हे या मतदारसंघात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. सध्या 40 पेक्षा अधिक अन्न उद्योग हे मंगळवेढा व परिसरामध्ये सुरू होऊ शकतात.
तालुक्यातील उद्योजक होण्याची गुणवत्ता शेतकऱ्यांमध्ये आहे.अनेक अन्नधान्याच्या मालाचे उत्पादन होते मात्र त्याचे मार्केटिंग करणे गरजेचे आहे,सध्या शहरी भागामध्ये नोकरी करणाऱ्या जोडप्याना इन्स्टंट फूड उपलब्ध व्हावे वाटते
अन्नप्रक्रिया उद्योगात या गोष्टी सोप्या होतात.त्यामध्ये शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी वेगवेगळ्या व अन्नपदार्थाची गरज आहे. ते अन्नप्रक्रिया उद्योगातील तयार अन्नाचा वापर करतात.
नाशिक सारख्या ठिकाणी शेतकऱ्याने स्वतःचे वेदर स्टेशन तयार केल्यामुळे त्यांच्याकडे नुकसानीचे प्रमाण कमी आहे. कोरोनाच्या दोन वर्षातील नुकसानीमुळे परिणाम भविष्यात जाणवणार आहेत त्यामुळे प्रत्येकाने राजकीय हेवेदावे सोडून एकत्र येण्याची गरज आहे मंगळवेढ्यातील अनेक उत्पादित अन्नपदार्थावर प्रक्रिया करून त्याला देशासह परदेशात बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची गरज आहे.
त्यासाठी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या माध्यमातून तालुक्याला आशेचा किरण सापडणार आहे. त्यामुळे राणेचा मंगळवेढा दौरा दुष्काळी तालुक्याला दिशा देणारा ठरणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज