टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा येथील सावंजी कुटुंबियातील सदस्यांच्या गळयाला चाकू लावून जीवे मारण्याची धमकी देत 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल लुटल्याप्रकरणी
कर्नाटकातील रवी उर्फ विकी बाळूराम भोसले (वय 30,रा.अलीपूर तांडा जि.बिदर),नाजी उर्फ समाधान नामदेव पवार (वय 40,रा.बसापूर) या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायाधीश जी.एम.चरणकर यांचेसमोर उभे केले असता सहा दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली.
या घटनेची हकिकत अशी,यातील फिर्यादी मंदाकिनी अंबादास सावंजी यांच्या बंगल्यात सहा दरोडेखोरंानी दि.24 च्या पहाटे 3.30 वा. कटावनीने दरवाजा तोडून प्रवेश करून फिर्यादी व तीची नववधू सून व मुलास गळयाला चाकू लावून अंगावरील दागिने ओरबडून घेत तसेच रोख रक्कम असा एकूण 4 लाख 50 हजाराचा मुद्देमाल घेवून पोबारा केला होता.
घटनास्थळी अतिरिक्त पोलिस अधिक्षक हिम्मतराव जाधव यांनी तात्काळ भेट देवून तपासाची चक्रे वेगाने फिरवून कर्नाटकातील दोघांना व स्थानिक चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते.
त्यामध्ये कर्नाटकामधील दोघांना चौकशीअंती रात्री उशीरा अटक करून तपासिक अंमलदार तथा पोलिस निरिक्षक जोतीराम गुंजवटे यांनी त्या दोघांना मंगळवेढा न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने दि. 30 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज