टीम मंगळवेढा टाईम्स।
मंगळवेढा तालुक्यात मंगळवारी पहाटे ५.३० वाजता व सायंकाळी ६.३० वाजता अवकाळी पावसाने हजेरी लावली असून जवळपास हा पाऊस अर्धा तास पडल्याने रस्त्यावरुन पाणी वाहत असल्याचे चित्र होते.
दरम्यान सायंकाळी विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात खवे येथे एका जर्शी गायीच्या अंगावर तर भोसे येथे एका रेड्याच्या अंगावर वीज पडल्याने दोन जनावरे मृत्यूमुखी पडल्याची घटना घडल्याने पशुपालक वर्ग धास्तावला आहे.
गेली दोन दिवस अधूनमधून आकाशात येणाऱ्या ढगाळामुळे पावसाळी वातावरण निर्माण झाले होते. परिणामी हवेतील तापमान कमी होवून थंडी जाणीव निर्माण झाली होती.
अचानक मंगळवारी पहाटे ५.१५ ते ५.३० च्या दरम्यान मंगळवेढा शहर व अन्य भागात अचानक पावसाला सुरुवात झाली. दरम्यान या पावसाच्या सरी अर्धा तास कोसळत होत्या.
दिवसभर ढगाळ वातावरणामुळे अधूनमधून पावसाचे थेंब पडत होते. सायंकाळी ६ च्या दरम्यान अचानक वीजांचा कडकडाट करीत वरुण राजाने चांगलीच हजेरी लावली.
हा पाऊस ज्वारी पिकाला वरदान ठरणार असला तरी कांदा पिकाचे नुकसान करणारा असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे. सध्या सर्वत्र कांदा काढणी सुरु असून कांदा भिजल्यामुळे कांदा खराब होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
तसेच या पावसामुळे द्राक्ष, डाळींब या बागांचे नुकसान होणार असल्याचे शेतकरी वर्गातून चर्चा सुरु आहे. ऊस गाळपाचा हंगाम सुरु असल्याने सर्वत्र ऊस तोडणी मजूर अवकाशाच्या छायेखाली जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी कुटूंबासह उघड्यावर राहत असल्याने पहाटेच्या व सायंकाळच्या पावसाने त्यांची दयनीय अवस्था झाली.
सायंकाळी वीजांचा कडकडाट झाल्याने त्यामधील एक वीज खवे येथील शेतकरी मच्छिंद्र बिराप्पा दुधाळ यांच्या गायीवर पडल्याने ती जागीच मृत्यूमुखी पडली. पशुपालकांनी गायीला चरावयास शेतामध्ये नेली होती त्यावेळी दुर्घटना घडली.
त्यामुळे या पशुपालकाचे १ लाख २५ हजार रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. नुकतीच चार दिवसापुर्वी ही गाय व्याली होती. तर दुसऱ्या घटनेत भोसे येथील पशुपालक पप्पू महाजन यांच्या दोन वर्ष वय असलेल्या रेड्याच्या अंगावर वीज पडल्याने तो मृत्यूमुखी पडला.
महसूल विभागाकडून अद्याप पंचनामा या घटनेचा झाला नसून आज पशुवैद्यकीय अधिकाऱ्याकडून त्या मृत जनावरांचे पोस्टमार्टम केले जाणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज