mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 16, 2026
in मंगळवेढा, राज्य, सोलापूर
भीमेचा श्वास गुदमरतोय! वाळू उपशाच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व धोक्यात; पर्यावरणाचा समतोल कोलमडला; वाळू माफियांच्या ‘ड्रेझर’ खाली नदीचं पात्र छिन्नविच्छिन्न; भविष्यात पाणीटंचाईचे संकेत

मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क। 

वाळू माफियांच्या अवाढव्य ‘ड्रेझर’ आणि यंत्रांच्या हव्यासामुळे भीमेचं अस्तित्व आज खऱ्या अर्थाने धोक्यात आलं आहे. नदीपात्रातून होणाऱ्या अवाजवी आणि बेसुमार वाळू उपशामुळे निसर्गदत्त असलेलं भीमा नदीचं पात्र अक्षरशः छिन्नविच्छिन्न झालं असून, ठिकठिकाणी पडलेल्या खोल खड्ड्यांमुळे पर्यावरणाचा नैसर्गिक समतोल पूर्णपणे कोलमडला आहे.

नदीची पाणी साठवून ठेवण्याची नैसर्गिक क्षमता संपत चालली असून, हा केवळ वाळूचा उपसा नसून भविष्यातील पाणीटंचाईची ही भयावह नांदी ठरत आहे. जर वेळीच हा ओरबाडण्याचा प्रकार थांबला नाही, तर भीमा काठच्या गावांना केवळ कोरड्या पात्राकडे पाहून अश्रू गाळावे लागतील, असे गंभीर संकेत आता स्पष्टपणे दिसू लागले आहेत.

​मंगळवेढा तालुक्यातील जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या भीमा नदी पात्रात सध्या नियमांचा अक्षरशः चुराडा होताना दिसत आहे. पर्यावरणाचे सर्व नियम धाब्यावर बसवून नदीपात्रात पोकलेन, जेसीबी आणि डंपरच्या साहाय्याने बेकायदेशीर वाळू उपसा सुरू असून,

वाळू माफियांनी नदीचे पात्र अक्षरशः ओरबडून काढले आहे. विशेष म्हणजे, हा सर्व प्रकार दिवसाढवळ्या सुरू असतानाही महसूल प्रशासन मात्र ‘धृतराष्ट्रा’च्या भूमिकेत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

भीमा नदी: वाळू उपसा आणि वादाचे भोवर

​सध्या भीमा नदी दुथडी भरून वाहत असतानाही वाळू उपसा सुरू आहे. मात्र, हा उपसा ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या पार्श्वभूमीवर ETS (Electronic Total Station) मशीनद्वारे मोजमाप करण्याची मागणी जोर धरत आहे.

मर्यादेचे उल्लंघन:

नदीपात्रातून नेमकी किती ब्रास वाळू काढली गेली आहे, याची अचूक आकडेवारी शेतकरी वर्ग मागत आहे. ​प्रशासनाने दिलेल्या परवानगीपेक्षा जास्त खोदकाम झाले आहे का,? हे ETS मशिनद्वारे मोजमाप केल्यानंतर स्पष्ट होणार आहे.

​यंत्रांचा ‘थैमान’ आणि नियमांची पायमल्ली

​मिळालेल्या माहितीनुसार, भीमा नदीच्या पात्रात सध्या जडयंत्रांनी अक्षरशः थैमान घातले आहे. नियमानुसार नदीपात्रात यंत्रांच्या साहाय्याने उपसा करण्यास सक्त मनाई असतानाही, येथे मात्र पोकलेनच्या साह्याने खोलवर खड्डे पाडून वाळू उपसली जात आहे.

यामुळे नदीची नैसर्गिक रचना धोक्यात आली असून भविष्यात पाणीटंचाई आणि पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होण्याची भीती व्यक्त होत आहे.

​प्रशासनाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

​एकीकडे सरकार अवैध गौण खनिज उत्खननावर कठोर कारवाईचे आदेश देते, तर दुसरीकडे मंगळवेढ्यात मात्र वाळू माफियांचे ‘राज’ सुरू असल्याचे चित्र आहे. नदीपात्रातून शेकडो टिपर वाळू रोज बाहेर काढली जात असताना, महसूल विभागाच्या भरारी पथकाला हे दिसत नाही का? असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत.

​नागरिकांचा सवाल: हा उपसा नेमक्या कोणत्या नियमात?

“नदीपात्रात जडयंत्रे उतरवण्यास परवानगी कुणी दिली? दिवसाढवळ्या होणारी ही लूट रोखण्यासाठी प्रशासन का धजावत नाही? प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर भविष्यात भीमा नदीचे अस्तित्व धोक्यात येईल,” अशी भावना स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

​दोषींवर कारवाई होणार का?

​वाळू उपशामुळे नदीकाठच्या गावांमधील रस्त्यांचीही वाट लागली असून अवजड वाहतुकीमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. आता या प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून दखल घेतली जाणार का आणि ‘सुस्त’ महसूल यंत्रणा जागी होणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: बेकायदेशीर वाळू उपसा

संबंधित बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
पोलिसांनी रोखला अल्पवयीन नवरदेवाचा विवाह; सोलापूर जिल्ह्यातील खळबळजनक घटना

मांडव उधळला! साखरपुडा झाला, मांडवही सजला… पण ऐनवेळी पोलिस पोहोचले; मंगळवेढ्यात बालविवाह रोखत पालकांना दणका; लिहून घेतले ‘हे’ हमीपत्र

September 17, 2026
मंगळवेढ्यातील दोन महिलांनी अनेकांना घातला लाखोंचा गंडा; मोठे रॅकेट उघडकीस येणार

मोठी बातमी! मंगळवेढ्यातील सराईत गुन्हेगार महादेव इरकरवर MPDA; पोलिसांकडून मुसक्या आवळत येरवड्यात रवानगी

September 18, 2026
सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 17, 2026
Next Post
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

रक्ताचं नातं शेतीच्या बांधात गाडलं! जमिनीच्या तुकड्यासाठी सख्ख्या मोठ्या भावाचा गेम; शेतीच्या वादात रक्ताच्या नात्याचा शेवट

ताज्या बातम्या

भेसळखोरांचे धाबे दणाणले! तुकाराम मुंढेंच्या ‘सिंगम’ स्टाईल कारवाईने महाराष्ट्र हादरला; अवघ्या ३ दिवसांत ५३ धाडी, ‘एवढे’ भेसळखोर गजाआड

मोठी बातमी! तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नांना यश; रुग्णांना मिळणार ‘हा’ मोठा दिलासा; केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

September 20, 2026
अभिनंदनास्पद! तहसीलदार मदन जाधव यांना महसूल विभागातील क्षेत्रीय स्तरावरील ‘उत्कृष्ट अधिकारी’ म्हणून पुरस्कार जाहीर

मतदार यादीतून तुमचं नाव तर गायब नाही ना? मंगळवेढेकरांसाठी ‘इतके’ दिवस अत्यंत महत्त्वाचे; विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन

September 20, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

​जमीन खरेदी-विक्रीत मोठा बदल! महाराष्ट्रात लवकरच ‘लँड टायटलिंग कायदा’; जमिनीच्या वादांवर सरकारचा कायमचा तोडगा

September 20, 2026

​पावसाचा खंड पडल्याने सरकार अलर्ट! विहिरी खोदण्यावर बंधने, पाणी चोरी रोखण्यासाठी संयुक्त पथके सज्ज; शासनाने घेतला महत्त्वपूर्ण निर्णय

September 20, 2026
मोठी बातमी! ‘त्या ‘लाडक्या बहिणी’ची रक्कम पुन्हा सरकारजमा, कारवाई सुरू; ‘या’ जिल्ह्यात जे झालं…

एसटीचा प्रवास अधिक सोपा! आता धावत्या बसमध्येच होणार NCMC कार्ड रिचार्ज; महिला अन् ज्येष्ठ नागरिकांची पायपीट थांबली

September 19, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून दहावी व बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर

September 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..