टीम मंगळवेढा टाईम्स ।
अवकाळी पाऊसामुळे पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील नुकसानग्रस्त पिकांचे त्वरित पंचनामे करावेत अशा सूचना मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांनी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांना दिल्या आहेत.
सदर विषयाला धरून मागणी करताना आ.आवताडे यांनी म्हटले आहे की, पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघामध्ये असणाऱ्या द्राक्षे, डाळिंब, आंबा, पेरू, केळी, पपई आदी फळबागांचे आकस्मित आलेल्या अवकाळी पाऊसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्याचबरोबर नुकत्याच या हंगामामध्ये पेरणी झालेल्या ज्वारी, मका, हरभरा, कांदा, करडई, सोयाबीन, सूर्यफूल,तूर,मटकी,बाजरी, हुलगा यासारख्या तसेच भाजीपाला व इतर सर्व निरनिराळ्या पिकांचेसुद्धा भरपूर प्रमाणात नुकसान झाले आहे.
अगोदरच दुष्काळी सावटाखाली दबलेल्या बळीराजावर या अवकाळी पावसामुळे अस्मानी संकटाचे ढग आणखी गडद झाले आहेत.
त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी आपल्या प्रशासकीय यंत्रणामार्फत पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील पंचनामे करून आवश्यक त्या मदतीसाठी लवकरात-लवकर राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करावेत अशा सूचना आमदार आवताडे यांनी दिल्या आहेत.
यावर्षी पावसाने अपेक्षित हजेरी न लावल्याने शेतकरी शेती उत्पादनासाठी व कृषीपूरक बाबींसाठी हवालदील झाला असताना हा हा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांवर आता दुहेरी संकट आली आहे.
त्यामुळे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांप्रती सहकार्याची भावना निर्माण होण्यासाठी हे पंचनामे लवकरात लवकर होणे गरजेचे असल्याचेही आमदार आवताडे यांनी सूचित केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज