mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्राचं लक्ष! मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 6, 2023
in राज्य
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. कारण मराठा आरक्षणासाठी दाखल करण्यात आलेल्या क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. आजच्या सुनावणीत युक्तिवाद होणार नाही. तर फक्त दालनात आज केस पुढे चालवायची की नाही याचा आज निर्णय होईल. यासाठी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड आणि 3 न्यायमूर्ती उपस्थित राहणार आहेत.

मराठा आरक्षणावर आज सुप्रीम कोर्टात महत्वपूर्ण सुनावणी होणार आहे. या सुनावणीसाठी मराठा आरक्षणाचे याचिकाकर्ते विनोद पाटील हे छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून सुनावणीसाठी दिल्लीला रवाना झाले आहेत.

यावेळी विनोद पाटील यांनी आज मराठा समाजाला शंभर टक्के आरक्षण मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले तर आरक्षणाला कोणीही चॅलेंज करू शकत नाही. त्यामुळे मराठा समाजाला आज टिकणारं आरक्षण मिळेल अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे.

क्युरेटिव्ह पिटीशन कुणाविरूद्ध?

मराठा आरणक्षासाठीची ही क्युरेटिव्ह पिटीशन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विरूद्ध अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री लक्ष्मण पाटील अशी आहे. तसंच मराठा आंदोलक विनोद लक्ष्मण पाटील विरूद्ध जयश्री लक्ष्मण पाटील अशा या दोन क्युरेटिव्ह पिटीशन आहेत.

तर न्यायालय आता याबाबत निर्णय घेईल की, जयश्री पाटील किंवा इतरांना नोटीस बजावायची की नाही. बऱ्यातदा क्युरेटिव्ह पिटिशन सुरुवातीच्या टप्प्यातच याचिका फेटाळली जाते. त्यामुळे आज या प्रकरणी काय होतं? हे पाहणं महत्वाचं असेल.

आजच्या निर्णयाकडे लक्ष

मे 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भातला एक निकाल दिला. न्यायालयाने हे मराठा आरक्षण फेटाळलं. त्यानंतर या संदर्भात रिव्हिव पिटिशन दाखल केली गेली. ती देखील न्यायालयाने फेटाळली. आता क्युरेटिव्ह पिटिशन दाखल करण्यात आली आहे. उद्यापासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. याआधी आता ही सुनावणी होते आहे.

मराठा आरक्षणासाठी वर्षानुवर्षे लढा सुरु आहे. अशात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी हा लढा अधिक तीव्र केला. सरकारला धारेवर धरलं. अशात आता आज सर्वोच्च न्यायालयात काय होणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मराठा आरक्षण

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढा तालुक्यात पंतप्रधान किसान सन्मान योजनेत तब्बल २ हजार ६०० बोगस लाभार्थी

बनावट दस्तऐवज तयार करून पतसंस्थेत साडेसहा कोटींचा अपहार; ३६ जणांवर फसवणुकीचा गुन्हा; अशी झाली फसवणूक?

April 18, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

शाळांमधून ‘या’ साहित्य खरेदीची सक्ती करू नका; अन्यथा कारवाई, शिक्षण विभागाचा कडक इशारा

April 18, 2026
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 16, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 16, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 17, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
Next Post
बळीराजासाठी मोठा दिलासा! आजपासून सोलापूर जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पावसाला सुरुवात; उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

पावसाचा अंदाज! पुढील 48 तास 'या' जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी कायम राहण्याचा अंदाज

ताज्या बातम्या

तयारी! बँक ठेवी विमा संरक्षण ‘एवढ्या’ लाखांपर्यंत वाढवण्याचा विचार; सध्या मर्यादा ५ लाख; खातेधार व ठेवीदारांना याचा होणार लाभ

बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेचे सील तोडून अनधिकृत प्रवेश; मंगळवेढ्यातील कर्जदारावर गुन्हा दाखल

April 19, 2026
सबजेल हाऊसफुल्ल पंढरपूरचे कैदी मंगळवेढ्यात वर्ग; कोरोना संसर्गाची कैद्यांना भीती

सावधान! मंगळवेढ्यात ‘हनी ट्रॅप’ स्टाईलने लूट करणारी टोळी गजाआड; LCB ची धडाकेबाज कारवाई, महिला आरोपी अटकेत

April 19, 2026
विद्यार्थ्याने गळफास घेतला; मराठा आरक्षणाच्या स्थगितीमुळे आत्महत्या केल्याचा दावा

काम आटोपून माय-बाप घरी परतले, समोर मुलाचा मृतदेह दिसताच फोडला टाहो; मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावावर शोककळा

April 19, 2026
मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

मंगळवेढ्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय; ‘वसुधा महिला ग्रामीण पतसंस्थेचा’ आज उद्घाटन सोहळा

April 19, 2026
कोरोनाचे संकटामुळे राज्यसेवा पुर्व परिक्षा पुन्हा पुढे ढकलली

मंगळवेढ्यात विनापरवाना अवैध खासगी शिकवणी वर्गांचे पीक; भाजप महिला मोर्चा आक्रमक; थेट कारवाईची केली मागणी

April 18, 2026

शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या खत माफियांना दणका; मंगळवेढ्यात ‘या’ कृषी केंद्रावर गुन्हा दाखल; कृषी विभागाची धडक कारवाई

April 18, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा