mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
April 6, 2026
in मंगळवेढा, राजकारण, राज्य, सोलापूर
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

​टीम मंगळवेढा टाईम्स ।

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात सध्या एकच चर्चा रंगली आहे, ती म्हणजे भगीरथ भालके यांच्या पक्षांतराची. राजकीय वारसा लाभलेले भगीरथ भालके आता ‘शिवसेना शिंदे गटा’चे धनुष्यबाण हाती धरण्याच्या तयारीत आहेत.

मात्र, त्यांच्या या वारंवार बदलणाऱ्या राजकीय भूमिकांमुळे मतदारसंघातील जनता आणि निष्ठावंत कार्यकर्ते आता उघडपणे विचारू लागले आहेत— “भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे?”

​राजकीय धरसोडवृत्तीचा ‘हायव्होल्टेज’ ड्रामा

​स्व.भारतनाना भालके यांच्यानंतर त्यांच्या राजकीय वारशाची धुरा भगीरथ भालके यांच्याकडे आली. मात्र, गेल्या काही वर्षांतील त्यांचा प्रवास पाहता, त्यांनी कोणत्याही एका विचारधारेशी निष्ठा राखली नसल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.

​बीआरएस (तेलंगणा): आधी के.चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत गुलाबी झेंडा हाती घेतला.
​राष्ट्रवादी (शरद पवार गट): त्यानंतर पुन्हा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत नशीब आजमावले. ​काँग्रेस: अधूनमधून काँग्रेसच्या नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.

​शिवसेना (शिंदे गट): आणि आता सत्तेच्या वळचणीला जात शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित केला आहे. ​या वारंवार होणाऱ्या ‘कोलांटउड्यांमुळे’ मतदारांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे.

​संकटाच्या काळात ‘नॉट रिचेबल’ राहण्याची सवय?

​स्व. भारत नानांच्या निधनानंतर पोटनिवडणुकीत पराभव झाला आणि भगीरथ भालके थेट ‘नॉट रिचेबल’ झाले. २०२४ च्या विधानसभा निवडणुकीतही जनतेने त्यांना नाकारले. पराभवानंतर जनतेची कामे करणे, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी जाणून घेणे आणि संघटन मजबूत करणे अपेक्षित असताना, भालके यांनी जनतेकडे सपशेल पाठ फिरवल्याचा आरोप होत आहे.

​निष्ठावंतांची साथ सुटली; आवताडे-परिचारक गट मजबूत

​भगीरथ भालके यांच्या अशा धरसोड वृत्तीला कंटाळून अनेक जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आता त्यांचा हात सोडला आहे. नानांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आता दिशाहीन झाला असून, अनेकांनी आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटामध्ये प्रवेश करणे पसंत केले आहे. “ज्या नेत्याला आपली राजकीय दिशा निश्चित करता येत नाही, त्याच्या मागे किती काळ राहायचे?” असा सवाल कार्यकर्ते विचारत आहेत.

​शिवसेनेत तरी टिकणार का?

​आज जरी भगीरथ भालके शिवसेनेच्या वाटेवर असले, तरी मतदारसंघात एकच प्रश्न विचारला जात आहे— “शिवसेनेत तरी ते किती दिवस टिकणार?” सत्तेसाठी किंवा वैयक्तिक स्वार्थासाठी पक्षांतर करण्याच्या या प्रकारामुळे पंढरपूर-मंगळवेढ्याच्या राजकारणात भालके गटाची पकड ढीली होताना दिसत आहे.

​भगीरथदादा, जनतेला आणि कार्यकर्त्यांना आता आश्वासने नकोत, तर स्पष्ट भूमिका हवी आहे. सत्तेच्या राजकारणात तुम्ही तुमची निष्ठा गहाण तर ठेवत नाही ना? असा रोखठोक सवाल आता जनतेच्या दरबारात विचारला जात आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: भगीरथ भालके

संबंधित बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

सावधान! मंगळवेढ्यात तोतया पोलिसांची दहशत; खुनाचा बनाव रचून शेतकऱ्याचे दागिने लंपास; एकाच दिवशी दोन घटनांनी खळबळ

September 14, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

गावच्या कारभाऱ्यांची गळचेपी? राज्य सरकारच्या निर्णयाने सरपंचपदावर कुऱ्हाड; ‘त्या’ अटीविरोधात सरपंच महासंघ सुप्रीम कोर्टात जाणार

September 15, 2026
शेतकऱ्यांची दिवाळी आनंदात! मंगळवेढा तालुक्यातील 36 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान वर्ग

गुरांना चारा नाही पाणी नाही, हाताला काम नाही, सांगा आम्ही जगावं की मरावं? कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची शेतकऱ्यांची मागणी

September 13, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

साखरेच्या गोडव्यानंतर आता दुग्धक्रांती! ‘भैरवनाथ समूहा’ची दुग्ध व्यवसायात भव्य एन्ट्री; ​अनिल सावंत यांच्या नेतृत्वात उद्योगविस्ताराची नवी झेप; ‘भैरवनाथ डेअरी फार्म व चिलिंग सेंटर’चे आज लोकार्पण

September 13, 2026
Next Post
Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

नवीन मोबाईलसाठी धरला हट्ट, घरच्यांनी नकार देताच 21 वर्षीय तरुणाने संपवलं जीवन; सोलापूर जिल्हा हादरला

ताज्या बातम्या

सदगुरू बागडे बाबा यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आज श्रीक्षेत्र मारोळी येथील मठावर विविध कार्यक्रमाचे आयोजन; ह.भ.प संदेश भोसले महाराज यांची माहिती

मारोळीत उसळणार भक्तीसागर! बागडे बाबांच्या पुण्यतिथीचा सोहळा आज उत्साहात संपन्न होणार ​भक्तांच्या उपस्थितीत होणार पुष्पवृष्टी; मठाधिपती संदेश भोसले महाराजांचे उपस्थितीचे आवाहन

September 16, 2026
​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

​‘माणगंगा’चा माणुसकीचा झरा! उपनगराध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त हजारो रुग्णांची मोफत आरोग्य तपासणी; मूकबधिर विद्यार्थ्यांना मदतीचा हात

September 16, 2026
तगडा उमेदवार! पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर शिंदे गटाचा दावा; भैरवनाथ शुगरचे व्हा.चेअरमन अनिल सावंत निवडणूक लढवणार?

राजकीय भूकंप! आता थांबायचं नाय, अनिल सावंतांना विधानसभेत पाठवायचंच; विठ्ठल परिवारातून थेट बंडाचे निशाण, प्रस्थापितांना उघड आव्हान

September 16, 2026
अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

अडीच हजार कोटींच्या ठेवी ही जनतेच्या कष्टाची पावती; ठेवीदारांचा विश्वास जपणे हीच धनश्रीची खरी गणेशभक्ती : प्रा.शोभाताई काळुंगे

September 15, 2026
विद्यापीठाची पोलिसात धाव, अंतिम परीक्षेवर सायबर अटॅक

सावधान! गुगल मॅप्सवरून दुकानं शोधून फसवणारी नवी टोळी सक्रिय; ​खोटा स्क्रीनशॉट पडला महागात; सोलापुरात व्यापाऱ्याची पावणेचार लाखांची फसवणूक

September 16, 2026
माणगंगा परिवार बँकेचे अध्यक्ष नितीन इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त आज रक्तदान शिबीर आणि पशु पालक शेतकरी मेळाव्याचे आयोजन

सेवेचा संकल्प, विकासाचा ध्यास! नितीन आबासाहेब इंगोले यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला ते मंगळवेढ्यापर्यंत विधायक कार्याचा झंझावात; माणगंगा परिवारातर्फे महाआरोग्य शिबीराचे आयोजन

September 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..