मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
इस्रो आणि भारतातील प्रत्येक नागरिकासाठी आजचा दिवस ऐतिहासिक ठरणार आहे. कारण आज भारताचे महत्वाकांक्षी तिसरं चांद्रयान-3 मिशन लॉन्च झालं आहे. चांद्रयान-3 ने आज दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी यशस्वी उड्डाण केलं आहे.
आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून हे अंतराळयान आज प्रक्षेपित करण्यात आलं आहे. चांद्रयान-3 मोहिमेचं नेतृत्व करणाऱ्या ‘रॉकेट वुमन’, रितू कारिधाल कोण आहेत?
गेल्या चार वर्षांमध्ये जवळपास 615 कोटी रुपयांचा खर्च करुन चांद्रयान – 3 विकसित करण्यात आलं. आज अखेर हे अंतराळयान अवकाशात झेपावलं आहे. चांद्रयान 3 ऑगस्टमध्ये लँड करेल आणि त्याचा लँडर आणि रोव्हर चंद्राच्या एक दिवसा इतके काम करणार आहे.
चंद्राचा एक दिवस म्हणजे पृथ्वीचे 14 दिवस. लँडर आणि रोव्हर केवळ चंद्रावरील एका दिवसासाठी काम करण्यासाठी डिझाइन केलेले आहेत, कारण ते रात्रीच्या अति थंडीचा सामना करू शकत नाहीत. त्यामुळे, त्यांना पहाटेच उतरावं लागतं.
चांद्रयान-3 च्या लँडर, रोव्हर आणि प्रोपल्शन मॉड्युलमध्ये एकूण सहा पेलोड्स जात आहेत. चांद्रयान-3 मध्ये ऑर्बिटर पाठवले जाणार नाहीत. या वेळी त्यासोबत स्वदेशी प्रोपल्शन मॉड्युल पाठवले जात आहे. ते लँडर आणि रोव्हरला चंद्राच्या कक्षेत घेऊन जाईल. यानंतर ते चंद्राभोवती 100 किलोमीटरच्या वर्तुळाकार कक्षेत फिरत राहील.
#WATCH आंध्र प्रदेश: भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (ISRO) ने सतीश धवन अंतरिक्ष केंद्र, श्रीहरिकोटा से चंद्रयान-3 लॉन्च किया। pic.twitter.com/Jvrfq2gT1c
— ANI_HindiNews (@AHindinews) July 14, 2023
त्याचे वजन 2145.01 किलोग्रॅम असेल, त्यापैकी 1696.39 किलो इंधन असेल. म्हणजेच, मॉड्युलचं वास्तविक वजन 448.62 किलो आहे. इस्रोने 23-24 ऑगस्ट रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंगची योजना आखली आहे, परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो.
परंतु तेथील सूर्योदयानुसार त्यात बदल होऊ शकतो. चंद्राच्या पृष्ठभागाचं विश्लेषण करणं हे चांद्रयान -3 चं प्रमुख उद्दिष्ट आहे. यासोबतच भारताच्या या मोहिमेमुळे चंद्र मोहिमांसाठी आवश्यक असलेलं नवीन तंत्रज्ञान शोधण्यासाठीही मदत होईल. चांद्रयान -3 मोहिम यशस्वी झाल्यास चंद्रावर यान उतरवणारा भारत हा चौथा देश ठरेल
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज