टीम मंगळवेढा टाईम्स ।
पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील ग्रामीण भागातील रस्ते व पाणी प्रश्न सोडवणार असून ही निवडणूक जनतेच्या भविष्याचा फैसला करणारी असून येणाऱ्या काळात एकही प्रश्न शिल्लक राहणार नसल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
भाजप उमेदवार समाधान आवताडे यांच्या प्रचार्थ आयोजित मंगळवेढा येथील सभेत ते बोलत होते.
व्यासपीठावर राष्ट्रवादी नेते लतीब तांबोळी, भाजप जिल्हा सरचिटणीस शशिकांत चव्हाण, पक्षनेते अजित जगताप, अँड.शिवानंद पाटील, दामाजी कारखान्याचे माजी चेअरमन सूर्यकांत ठेंगील, विजयकुमार देशमुख, रामेश्वर मासाळ, तालुकाध्यक्ष अंबादास कुलकर्णी, सोमनाथ आवताडे, सुरेश जोशी, नगरसेवक प्रवीण खवतोडे, ज्ञानेश्वर भगरे, प्रकाश गायकवाड, शेतकरी नेते दीपक भोसले, मुजमिल काझी आदीजन उपस्थित होते.
नितीन गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, मी दुसऱ्यांदा इथे आलो आहे, मी जे बोलले ते मी करतो, मी दिलेला शद्ब पाळून भरगोस निधी पण दिला आहे.आपला देश सुखी समृद्ध व्हावा, अर्थव्यवस्था बळकट व्हावी यासाठी भाजप सरकार सत्तेत पाहिजे. सरकारच्या धोरणांवर बरेच अवलंबून आहे.
सोलापूर जिल्ह्यात 15 हजार कोटी रुपयांची कामे पूर्ण केली. आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयांची कामे केली आहेत.
खराब कामे करणाऱ्यांना इशारा दिला.. रस्त्यावर खड्डा पडला तर ठेकेदाराची खैर नाही.
रस्त्याचे काम घेत असताना ठेकेदारांनी गुणवत्तापूर्ण चांगले रस्ते करावे, खराब रस्ते व रस्त्यावर खड्डे पडले तर ठेकेदारांची खैर नाही असा दम ही त्यांनी दिला.
हा देश बदलला पाहिजे. प्रत्येक गावाला पाणी, रस्ते, शेतीला चांगला दर मिळाला पाहिजे तरुणांच्या हाताला काम पाहिले गावात शाळा चांगल्या पाहिजेत. मी प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या माध्यमातून प्रत्येक ग्रामीण भागात रस्त्यांची कामे झाली. अटलबिहारी वाजपेयी यांनी हे धोरण राबविले.
शिक्षण, आरोग्य, रस्ते यासाठी मी प्राधान्याने काम करत आहेत. काँग्रेसच्या काळात ग्रामीण भागाचा विकास झाला नाही. जनतेला लुटाचे काम फक्त त्यांनी केले.
आम्ही 12 हजार कोटी रुपयांचा पालखी मार्ग केला. वारी साठी येणाऱ्या वारकऱ्यांच्या पायाला तकलीप होऊ नये म्हणून मार्ग काढला.
माझी आई अक्कलकोट व गाणगापूरला जाताना रस्ता नीट कर म्हणून जाताना सांगून गेली. तोही रस्ताही नीट करून घेतला.
शेतकरी ऊर्जा दाता झाला आहे. शेतकऱ्यांना तयार केलेल्या इथेनॉल्वर चालणाऱ्या गाड्या सुरू केल्या. अनेक कंपन्या इथेनॉलवर चालणाऱ्या टू व्हीलर गाड्या बाजारात आणत आहेत. इथेनॉलचा फायदा शेतकऱ्यांचे उत्त्पन्न वाढवण्यावर होणार आहे.
गाव समृद्ध व संपन्न झाली तर बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. टेंभू म्हैसाळ प्रकल्प मार्गी लावले त्यामुळे मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी मिळाले.
मागच्या जन्मात ज्यांनी पाप केले ते लोक एक तर कारखाना सुरू करतात नाही तर वृत्तपत्र सुरू करतात. देशात उत्पादन वाढून खर्च कमी करून चांगला दर दिला पाहिजे. येणाऱ्या काळात महाराष्ट्राचे चित्र बदलायचे आहे.
काँग्रेसने अपप्रचार करून लोकसभेत जागा जिंकल्या, बाबासाहेबांचे संविधान बळकट करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. घटनेचे मूलभूत तत्व कधी कोणी बदलत नाहीत. कोणत्याही जातीवादी प्रचारावर विश्वास ठेवू नका असे भावनिक आवाहन देखील नितीन गडकरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भारत मुढे तर प्रस्ताविक आमदार समाधान आवताडे यांनी केले.
प्रशांत परिचारक यांच्या मनाचा मोठेपणा
मंगळवेढा पंढरपूर विधानसभेसाठी उमेदवार देत असताना प्रशांत परिचारक यांनी मनाचा मोठेपणा दाखवला असल्याचे गौरवउद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज