टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील आठवडा असलेल्या बाजारात मोटार रिवायडींग व सबमर्सिबलचे दुकान फोडून चोरट्यांनी ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला असून याप्रकरणी अज्ञात चोरटयाविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस सुत्रांनी दिलेली माहिती अशी , यातील फिर्यादी बसवेश्वर माळी यांचे शहरातील आठवडा बाजार येथे मोटार रिवायडींग व सबमर्सिबल यांचे दुकान असून रात्री ८.०० वा. ते बंद करून गेले होते.
सकाळी ६.०० वा . जवाहरलाल प्रशालेचे मोरे यांनी फोन करून सांगितले की, तुमच्या दुकानाचे पाठीमागील भिंतीस होल पाडून दुकानातील माल चोरटयांनी नेल्याचे सांगितले.
फिर्यादीने येवून पाहिले असता दुकानात ठेवलेले ३५ हजार रुपये किमतीचे सबमर्सिबल वायर ५ बंडल व ६४ हजार रुपये किमतीचे
मोना ब्लॉक वायडींग वायर असा एकूण ९९ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेल्याचे निदर्शनास आहे.
दरम्यान फिर्यादीचे पुतण्याचे निधन झाल्याने फिर्याद देण्यास विलंब झाल्याचे दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. या चोरीचा पोलिस अधिक तपास करीत आहेत.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज