मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क।
जीवनामध्ये कोणत्याही गोष्टीला शॉर्टकट नसतो. त्यामुळे कठीण परिश्रम घ्या. मोकळ्या वातावरणात तयारी करा व परीक्षेला विस्तृतपणे वाचन करून सामोरे जा असे अनमोल मार्गदर्शन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
कै.आमदार भारत भालके अकादमीला भेट देऊन येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी अकॅडमीचे संचालक श्रीकांत पवार यांची स्वागत केले.
महाराष्ट्र कर्नाटक सीमारेषेवर सोलापूर जिल्ह्याबरोबर कोल्हापूर, सातारा, पुणे ,कोकण, नंदुरबार, धुळे, परभणी, अमरावती विदर्भ विविध जिल्ह्यातील सर्व सामान्य कुटुंबातील मुलांनी घेत असलेल्या भारतनाना भालके करियर अकॅडमी भरतीपूर्व मार्गदर्शन केंद्राचे
संचालक श्रीकांत पवार सर यांनी सुनील फुलारी साहेबाना विद्यार्थ्यांना भरती व पोलीस खात्या संदर्भात मार्गदर्शन करण्याचे फोन वरून विनंती केली असता, सीमा रेषेवरील सर्व पाहणी करून भेट दिली.
यावेळी बोलताना फुलारी साहेब म्हणाले, की विद्यार्थ्यांनी भरतीसाठी कोणताही शॉर्टकट मार्ग धरू नये. प्रामाणिकपणे अवांतर वेगवेगळी पुस्तके वाचा.
पोलीस खात्यामध्ये कायदा सुव्यवस्था दृष्टिकोनातून दिवस रात्र पोलीस असो किंवा अधिकारी यांना काम करावं लागतं पोलीस खात्यात येऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना संबोधित केलं.
विद्यार्थी कशी तयारी करावी , डायट काय करावे, परीक्षक आणि आयोग पॅनलला यांना अपेक्षित उत्तरासाठी चांगले विद्यार्थी घडवावे असे श्रीकांत पवार यांना सुचविले.
भारतनाना भालके करिअर अकॅडमी बालाजीनगर अतिशय मोकळ्या वातावरणात सातत्य ठेवून प्रामाणिक पणे अभ्यास केल्यास यश नक्की मिळते असे यावेळी फुलारी यांनी सांगितले.
यावेळी स्वागत करताना श्रीकांत पवार सर यांनी सांगितले की, स्वतः अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगून स्पर्धा परीक्षेची तयारी केली, परंतु यश मिळालं नाही म्हणून खचून न जाता आपल्या यासारखे सर्वसामान्य कुटुंबातील मुलांना
योग्य मार्गदर्शन करण्याचे व आपण अधिकारी झालो नाही म्हणून न खचता शेकडो पोलीस घडवण्याचं काम या अतिशय ओसाड माळरानावर भारतनाना भालके करिअर अकॅडमी च्या माध्यमातून करत असल्याचे सांगितले.
आज प्रशिक्षण संस्थेत महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून 150 मुली व 100 मुल प्रशिक्षण घेतल्याचे ही सांगितले. सातत्य ठेवून कायम उच्चांकी निकाल असल्याचे ही सांगितले.
यावेळी उपस्थित सोलापूर जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक हिंमतराव जाधव, पोलीस उपाधीक्षक राजश्री पाटील मॅडम, मंगळवेढा पोलीस निरीक्षक रणजीत माने, पंचायत समिती माजी सभापती संभाजी गावकरी सर, पत्रकार प्रशांत मोरे आदीजन उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज