mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

शेतकरी संतप्त! मंगळवेढा तालुक्यातील 24 गावे कर्नाटकात जाणार?; गावकऱ्यांनीच दिला सरकारला ‘हा’ इशारा

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
March 5, 2024
in मंगळवेढा
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

टीम मंगळवेढा टाईम्स। 

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला कर्नाटकात जाण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्र स्वातंत्र्य होऊन 64 वर्षे झाली तरी महाराष्ट्रात आम्हाला साधे पाणी मिळू शकत नसेल तर आम्ही कर्नाटकात जाणार, अशी भूमिका या 24 गावांनी घेतली आहे.

इतकंच नव्हे तर, या गावकऱ्यांनी थेट कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या भेटीची वेळदेखील मागितली आहे.

मंगळवेढा तालुक्यातील 24 गावातील शेतकऱ्यांनी व पदाधिकाऱ्यांनी पाण्यासाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. मंगळवेढा उपसा सिंचन योजनेसाठी कोणतीही तरतूद राज्य शासनाने केली नसल्याने २४ गावातील शेतकरी संतप्त झाले आहेत. या गावकऱ्यांनी राज्य सरकारला थेट इशारा दिला आहे. या पूर्वीही गावकऱ्यांनी पाण्यासाठी आवाज उठवला होता.

गावकऱ्यांचा बहिष्कार

मंगळवेढा मधील निंबोणी गावात कायम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांची पाणी परिषद सुरू असून लोकसभेसाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेला मंजुरी देण्याची मागणी करण्यात येत आहे. जर मंजुरी मिळाली नाही तर आम्ही लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकून कर्नाटकात जाण्याचा निर्णय घेतल्याचे गावकरी सांगत आहेत.

योजना लालफितीत अडकली

दरम्यान, 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित असून यावर मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी झाली आहे. मात्र, लालफितीमध्ये हा प्रकल्प अडकून पडला आहे, असं गावकऱ्यांनी म्हटलं आहे.

24 गावांसाठी उजनी धरणातील अतिरिक्त 2 टीएमसी पाणी या मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस देण्यात येणार आहे, असं सांगण्यात येतंय.

काय आहे प्रकरण?

2009 पासून राजकीय पातळीवर मंगळवेढा उपसा सिंचन योजना चर्चेत आहे. 2014 साली जवळपास 560 कोटी रुपयाच्या योजनेस प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. सरकारने आत्ता या योजनेच्या सर्व्हेसाठी शासनाने 2 कोटी 17 लाख रुपयांची तरतूद केली आहे.

बंदिस्त पाइपलाइनद्वारे 21 हजार 358 हेक्‍टरचे सर्व्हे करण्यासाठी निविदा कृष्णा खोरे महामंडळाने काढली. या सर्व्हेमधून कालव्याद्वारे बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी देता येणे शक्‍य आहे, का याबाबत सर्व्हे सुरू झाले होते.

गावकऱ्यांच्या भूमिकेने खळबळ

24 गावांनी कर्नाटकात जाणार असल्याचा इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. तसंच, 24 गावातील पदाधिकाऱ्यांनी कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांची भेटीची वेळ मागितली आहे. त्यामुळं आता सरकार यावर काय निर्णय घेतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मंगळवेढा 24 गाव

संबंधित बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 4, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 4, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
खुनीहल्ल्याप्रकरणी मंगळवेढ्यातील आरोपीविरुद्ध २१ लाखांचा नुकसान भरपाईचा दावा

कोर्टाच्या चकरा मारण्यापासून सुटका! मंगळवेढा दिवाणी न्यायालयात ‘विशेष लोकअदालत’; वाद मिटवण्याची मोठी संधी

July 3, 2026
दादांचा वादा! मंगळवेढा पंचायत समितीच्या सभापतीपदी दीपाली ताड यांची वर्णी लागणार? महिला दिनी समर्थकांकडून सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव

कामाची बातमी! ग्रामीण भागातील बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी; मोफत राहणे, खाणे आणि १००% नोकरीची हमी; ‘प्रथम फाउंडेशन’ व पंचायत समितीचा मोठा पुढाकार

July 2, 2026
खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

खाकीची कमाल! ३ राज्यांतून शेकडो जणांचा शोध; महिला फौजदार डॉ.आरती कणिरे यांचा धडाका; बेपत्ता नागरिकांची झाली कुटुंबाशी गळाभेट

July 3, 2026
Next Post
विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून, सर्वसामान्यांना काय मिळणार? असं असेल अधिवेशनाचे कामकाज

भाजपच्या संभाव्य लोकसभा उमेदवारांची यादी; सोलापूरचे तिकीट कोणाला मिळणार? माढ्याचा उमेदवार कोण? उमेदवारांची यादी आली समोर

ताज्या बातम्या

खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

​काळजाचा थरकाप! लेकरांना जेवत्या ताटावरून उठवलं, झोपवायला नेते म्हणून गेली; विहिरीतील ‘ते’ दृश्य पाहून गावकऱ्यांचा हंबरडा

July 4, 2026
बसवेश्वर स्मारकासाठी निधी देण्याचे दिले आश्वासन; अर्थसंकल्पात कोणतीच निधीची तरतूद केली नाही

अखेर प्रतीक्षा संपली! महात्मा बसवेश्वर राष्ट्रीय स्मारकासाठी महत्त्वाची पाऊले; ‘या’ तारखेपर्यंत ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

July 4, 2026
मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, दहा जणांविरूध्द गुन्हे दाखल; तालुक्यात ‘या’ ठिकाणी जुगार अड्डे त्यांच्यावर कारवाई करण्याची महिला वर्गाची मागणी

​अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले! मंगळवेढ्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा सर्जिकल स्ट्राईक; लाखो रुपयांच्या मुद्देमालासह जुगाऱ्यांचा खेळ खंडोबा

July 4, 2026
मोठा दिलासा! शेतकऱ्यांच्या मदतीसाठी 10 हजार कोटींच्या पॅकेजची ठाकरे सरकार कडून घोषणा

मंगळवेढ्यात खळबळ! नामांकित शाळेच्या प्रवेशद्वारावरच मध्यरात्री ‘अघोरी पूजा’; संशयिताविरुद्ध पोलिसांत तक्रार

July 4, 2026
नवी तारीख शाळेची घंटा वाजण्याची! शाळा कधी सुरू होणार? शिक्षणमंत्र्यांनी दिले संकेत

सभापती दीपाली ताड यांच्या पाठपुराव्याला मोठे यश! मंगळवेढा तालुक्यातील ७ जिल्हा परिषद शाळांना मिळाले नवीन शिक्षक; ​पालक वर्गातून व्यक्त होतोय आनंद

July 3, 2026
ग्रामपंचायतीची भराल बिले तर मिळतील बक्षिसे; करवसुलीसाठी मंगळवेढा तालुक्यातील ‘या’ गावात अफलातून योजना

वटपौर्णिमेलाच सुहासिनीचा कुंकवाचा धनी हिरावला! ८ दिवसांत बेकायदा दारू विक्री बंद करा; अन्यथा महिला दारू धंद्यावर जाऊन बाटल्या फोडणार

July 3, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..