टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील हिंदू मुस्लिमांच्या एकोप्यातून साजरा होणाऱ्या गैबीपीर उरूसाच्या कार्यक्रमाची जबाबदारी हिंदू धर्मीयाच्या हाती असून हा एकोपा जातीयवादाला मूठमाती देणारा असून
आज दि.30 जानेवारी ते दि.4 फेब्रुवारी दरम्यान विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उरूस कमिटीचे सरपंच महेश हजारे यांनी दिली.
आज गुरुवार दि.30 जानेवारी रोजी सायंकाळी बोराळे नाका येथून कळसाची भव्य मिरवणूक व देवाचा गंध कार्यक्रमाचे उद्घाटन जेष्ठ नेते बबनराव बावताडे यांच्या शुभहस्ते सुरू होणार असून अध्यक्षस्थानी माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे असणार आहेत.
यावेळी उपविभागीय अधिकारी बी.आर.माळी, तहसीलदार मदन जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रांत गायकवाड, मुख्याधिकारी चरण कोल्हे, पोलीस निरीक्षक महेश ढवान, अनिल पाटील, मौलाना कैसर पाशा, हजरत अफीज वखारी आदी उपस्थित राहणार आहेत.
शुक्रवारी दि.31 जानेवारी रोजी सोमनाथ आवताडे यांच्या शुभहस्ते शोभेचे दारूकामाचे उद्घाटन होणार असून यावेळी माजी नगरसेवक अजित जगताप, प्रवीण खवताडे, सोमनाथ बुरजे, यांची उपस्थिती राहणार आहे.
धनश्री परिवाराचे संस्थापक शिवाजीराव काळुंगे यांच्या हस्ते रतनशहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा यांच्या अध्यक्षतेखाती महाप्रसाद वाटप होणार असून यावेळी अॅड बिराप्पा जाधव, नामदेव शिंदे यांच्या उपस्थिती राहणार आहे.
सायं. 7 वाजता जंगी कवालीचे आ.समाधान आवताडे यांच्या हस्ते सुरुवात होणार. यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक व माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले यांची उपस्थिती राहणार आहेत.
दि.1 फेब्रुवारी रोजी राधा पाटील मुंबईकर यांचा नृत्य कार्यक्रम होणार असून उद्घाटन आ. अभिजीत पाटील यांच्या हस्ते शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड सुजित कदम यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी मनसेचे दिलीप धोत्रे व युवा उद्योजक राहुल ताड यांची उपस्थिती राहणार आहे.
दि.2 फेब्रुवारी यांच्या हस्ते जंगी कुस्त्याचा शुभारंभ भगीरथ भालके यांच्या हस्ते होणार असून, यावेळी खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर अवताडे यांची उपस्थिती लाभणार आहे. सोमनाथ माळी, राहुल वाकडे, व प्रशांत गायकवाड यांची उपस्थिती राहणार आहे.
दि.3 फेब्रुवारी जंगी कुस्त्याचा शुभारंभ आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांच्या शुभहस्ते तर भैरवनाथ शुगरचे उपाध्यक्ष अनिल सावंत यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, यावेळी दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णुपंत अवताडे यांची उपस्थिती होणार आहे.
दि.4 फेब्रुवारी रोजी स. 9 वा. कुरानखाणी तर रात्री नऊ वाजता मौलुद शरीफ होऊन सोहळ्याची सांगता होणार आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज