टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहरातील एस.टी स्टँड समोर असलेल्या पेट्रोल पंपावरून एका कर्मचाऱ्याची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल चोरट्याने हातोहात पळवून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
मागील काही दिवसापासून मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या आहेत. ती मोटारसायकल मिळण्यापूर्वीच चौथी मोटारसायकल चोरट्याने पळवून नेल्याने मोटारसायकलस्वारामध्ये धास्ती बसली आहे.
यातील फिर्यादी निशांत अंकुश रोकडे मंगळवेढा शहरातील खरेदी विक्री संघातील पेट्रोल पंपावर कर्मचारी असून त्यांनी दि. ३ ऑक्टोबर रोजी
संध्याकाळी हिरो होंडा स्प्लेडर कंपनीची (एम.एच.१०.सी.पी.८९४१) या क्रमांकाची २० हजार रुपये किमतीची मोटारसायकल रात्री पेट्रोल पंपावर लावली होती.
सकाळी उठल्यानंतर फिर्यादीने पाहिले असता मोटारसायकल जागेवर दिसून आली नाही. सर्वत्र शोध घेतला मात्र ती मिळून आली नाही.
चोरट्याने चोरून नेल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज