mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

लाडली बहना योजना महाराष्ट्रात लागू होणार, शिंदे सरकारचा मानस; महिलांना मिळणार ‘इतके’ हजार मानधन

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
December 11, 2023
in राज्य
बातमी कामाची! दुसरे अपत्य मुलगी झाल्यास मिळणार ६ हजार; राज्यात पंतप्रधान मातृवंदना-२ योजना जाहीर

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मध्यप्रदेशात शिवराजसिंह चौहान यांनी सुरू केलेली लाडली बहना योजना लवकरच महाराष्ट्रात सुरू करणार असल्याचं शिंदे गटानं म्हटलं आहे. त्यामुळंच आता शिंदे सरकार या योजनेचा प्राधान्यानं विचार करत असून लवकरच अशी योजना जाहीर करण्याची तयारी सुरू असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी म्हटंलय.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपानं राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेशात एकहाती विजय मिळवलाय. विशेषत: मध्य प्रदेशातील विजयाची जोरदार चर्चा रंगली असून या विजयामागं मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची लाडकी बहना योजना असल्याचं बोललं जात आहे.

या निवडणुकीत लाडली बहना योजनेचा वापर करण्यात आला असून भाजपाला मोठा फायदा झाल्याचं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आता महाराष्ट्रात देखील अशीच योजना राबवण्याचा सरकारचा मानस आहे.

याआधी सरकारनं महिलांसाठी लेक लाडकी योजनाही सुरू केली आहे. मात्र, लाडली बहनासारखी योजना राज्यात सुरू झाल्यास त्याचा सरकारला मोठा फायदा होईल, असं तज्ज्ञांचं मत आहे.

महिलांची भूमिका अतिशय महत्त्वाची मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांच्या विजयासाठी लाडली बहना योजना गेम चेंजर असल्याचं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटलं आहे.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2023/11/VID-20231130-WA0022.mp4

प्रत्येक निवडणुकीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यानुसार मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी वर्षाच्या सुरुवातीला मध्य प्रदेशात लाडली बहना योजना सुरू केली होती.

या वर्षाच्या सुरुवातीला, जानेवारीमध्ये, महिलांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी, तसंच त्यांना बालसंगोपनात सक्षम करण्यासाठी ही योजना जाहीर करण्यात आली. त्यानंतर मार्चमध्ये योजना लागू करण्यात आली. या योजनेंतर्गत लाभार्थ्यांना दरमहा 1000 रुपये दिले जात होते.

मात्र, त्यात बदल करून 1 हजार 250 रुपये प्रति महिना करण्यात आला. त्यामुळं महिलांना दरवर्षी 15 हजार रुपये मिळत आहेत. या योजनेचा 1 कोटी 31 लाखांहून अधिक महिलांना फायदा झाला आहे.

महिन्याला 1250 रुपये देणारी योजना :

मध्य प्रदेशात भाजपाला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या लाडली बहना योजनेची जोरदार चर्चा आहे. आता इतर राज्यांनीही या योजनेकडं बारकाईनं लक्ष देण्यास सुरुवात केली आहे.

या योजनेची संपूर्ण माहिती घेऊन महाराष्ट्र राज्यही ही योजना राबवणार असल्याचं शिंदे गटाचे प्रवक्ते वैजनाथ वाघमारे यांनी सांगितलं आहे.

अशी आहे योजना :

या योजनेत, मुलगी जन्मल्यापासून ती 18 वर्षांची होईपर्यंत तिला पैसे मिळणार आहेत. मुलींचा जन्मदर वाढवणं, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा तिच्या कुटुंबाला 5 हजार रुपये दिले जातात. त्यानंतर मुलगी प्रथम वर्गात गेल्यावर तिच्या कुटुंबाला 6 हजार रुपये दिले जातील.

तसंच मुलगी सहाव्या वर्गात गेल्यानंतर 7 हजार रुपये, 11 वर्षानंतर 8 हजार रुपये, 18 वर्षानंतर मुलीच्या कुटुंबाला 75 हजार रुपये देण्यात येणार आहेत. मुलीच्या जन्मापासून, ती 18 वर्षांची होईपर्यंत, कुटुंबाला 1 लाख 1 हजार रुपये मिळतील.

राज्यात, मणिपूर मध्ये का नाही? : लाडली बहना योजनेच्या यशाबद्दल माजी मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे यांनी देखील या योजनेचं कौतुक केलंय. याबाबत बोलताना ते म्हणाले की, जर ही योजना मध्य प्रदेशात लागू होऊ शकते,

तर मणिपूर, महाराष्ट्रात का नाही? राज्यात महिलांवरील अत्याचाराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं असून सरकारनं याकडेही लक्ष द्यावं. नुसती योजना आखून काहीही होत नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: लाडकी बहना

संबंधित बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 15, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

बापरे..! सोलापुरातील वकिलास जीएसटीची १२१ कोटी दंडाची नोटीस; काय आहे नेमके प्रकरण?

April 12, 2026
शेतरस्ते बंद करणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा; पोलीस संरक्षणासह ‘ही’ फी बंद करणार; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

कामाची बातमी! ‘या’ परवानग्यांचे अधिकार आता थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा निर्णय

April 9, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

मोठी बातमी! भोंदूबाबाचा पाय आणखी खोलात; अशोक खरात विरोधात ‘हा’ गुन्हा दाखल

April 6, 2026
जनता संभ्रमात! भगीरथ भालकेंचे नेमकं चाललंय तरी काय, दोन दिवसात दोन वेगवेगळ्या पक्षाकडून भरले अर्ज; पंढरपूर-मंगळवेढ्याच्या जागेबाबत सस्पेन्स आणखी वाढला?

जनता संभ्रमात! भगीरथदादा, तुमची निष्ठा नेमकी कुणाकडे? ​बीआरएस, काँग्रेस, राष्ट्रवादी अन् आता शिवसेना; भालकेंच्या वारंवार बदलणाऱ्या भूमिकांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संताप

April 6, 2026
मास्क वापरा अन्यथा भरा ‘एवढा’ दंड! सोलापूर जिल्हा प्रशासनानं जारी केला नवा आदेश

कामाची बातमी! SIR म्हणजे काय? SIR यादीत नाव आहे की नाही? कसं चेक करायचं?

April 1, 2026
बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

बाबो..! अशोक खरातच्या मोबाइलमधील डेटा पाहून पोलीसही चक्रावले, धक्कादायक माहिती समोर; पुन्हा गूढ वाढले

March 30, 2026
‘मी देवेंद्र फडणवीस शपथ घेतो की.’, महाराष्ट्रात ‘देवेंद्र’ पर्वाला सुरुवात; आजपासूनच फडणवीस यांच्यापुढे असतील ‘हे’ 5 आव्हान

नागरिकांनो! देशात इंधनाचा तुटवडा नाही, लॉकडाऊनच्या अफवा पसरवणाऱ्यांवर कारवाई करणार; मुख्यमंत्री फडणवीसांचा कडक इशारा

March 29, 2026
Next Post
सर्वात मोठी बातमी! मराठा आंदोलक आक्रमक; उद्या मंगळवेढा बंदची हाक

महाराष्ट्राचं लक्ष! मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस अत्यंत महत्वाचा; क्युरेटिव्ह पिटीशनवर आज सुनावणी

ताज्या बातम्या

Breaking! मंगळवेढा तालुक्यातील वृद्धाने चिठ्ठी लिहून संपविले जीवन; मुलाविरोधात गुन्हा दाखल धक्कादायक कारण आले समोर..?

धक्कादायक! अविवाहित तरुणीचा गर्भपाताच्या गोळ्यांच्या अतिसेवनाने मृत्यू; रक्तदाब कमी झाला, झटके आले अन्…

April 15, 2026
Gas booking Number : आता गॅस बुकिंगसाठी संपूर्ण देशात एकच नंबर; जूना नंबर करा डिलिट

खळबळ! गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त; अनेक ठिकाणी काळाबाजार सुरूच

April 15, 2026
मंगळवेढा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी पोलिस भरतीसाठी मोफत ऑनलाईन टेस्ट सिरीजचे आयोजन

टवाळखोरांनो सावधान! मंगळवेढ्यात ‘निर्भया पथक’ फिरतेय; शाळा आणि बाजारपेठेत कडक गस्त

April 15, 2026
पालकमंत्रिपदी नियुक्त झाल्यानंतर पहिल्यांदाच जयकुमार गोरे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

​भगीरथ, मला बोलायला लावू नका; तुम्ही मला का भेटला होता, ते जाहीर करू का?– पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खळबळजनक इशारा

April 15, 2026
धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

धडपड गावासाठी! सामाजिक कार्यकर्ते नागराज व्हनवटे यांच्याकडून जयंतीनिमित्त गावाला ‘बाकडे’ भेट; पुणे येथे कार्यरत असूनही जपली गावाची नाळ

April 15, 2026
धक्कादायक! मंगळवेढा तालुक्यात एकाच दिवशी कोरोनाने घेतला दोघांचा बळी; आज 20 जण कोरोनामुक्त

खळबळजनक! पंढरपुरातील ॲसिड हल्ला प्रकरणाला नवं वळण; तरुणीचा धक्कादायक खुलासा

April 15, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा