mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

महाराष्ट्रात लॉकडाऊन 15 दिवसांनी वाढवला; नवे नियम जाहीर, पाहा काय सुरू आणि काय बंद?

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
May 30, 2021
in राज्य
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बोलवली आज बैठक

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी राज्यातील लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतलाय. ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटिव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार 15 जूनच्या सकाळी 7 पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत, अशी माहिती उद्धव ठाकरेंनी दिलीय. उद्धव ठाकरेंनी आज जनतेला संबोधित केलंय, त्यावेळी ते बोलत होते.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं देशात हाहाकार माजला होता. त्याचा सर्वात मोठा महाराष्ट्रालाही बसला होता. सध्या राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असली तरी धोका अद्यापही कमी झालेला नाही.

दरम्यान आज रविवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधला. वर्ष दीडवर्ष अवघड असलेली म्हणजेच स्वत:वरील बंधनं अनुभवता आहात असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे आभार मानले.

जी जनता आपल्यावर प्रेम करते त्यांच्यावर निर्बंध लादण्याचं कटू काम मला नाईलाजानं करावं लागत आहे. यावेळच्या कोरोनाबाधितांच्या सर्वोच्च संख्येचं शिखर सणासुदीपूर्वीच गाठलं आहे. गेल्या वेळी ते सणासुदीनंतर गाठलं होतं. म्हणावं तितकी संख्या अद्याप खाली आलेली नाही.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता ९२ टक्क्यांवर आलाय ही दिलायासादायक बाब आहे,” असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं. “यावेळी आपण कडक निर्बंध लावले आहेत. लॉकडाऊन केलेला नाही. महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढताना दिसतंय. शहरी भागात संख्या कमी होतेय तर ग्रामीण भागात संख्या हलकी वाढताना दिसत आहे,” असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

तिसरी लाट ही आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. गेल्या लाटेतील विषाणू आणि यावेळी आलेल्या लाटेतील विषाणूमध्ये फरक आहे. संसर्गाचं प्रमाण वाढवण्याचं प्रमाण नव्या विषाणूमध्ये अधिक आहे. तसंच रुग्णांना बरं होण्यासही वेळ लागत आहे. रुग्णसंख्या गेल्या वेळच्या तुलनेत अधिक आहे,” असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले

सर्व आवश्यक वस्तू व सेवांची दुकाने जी सध्या सकाळी ७ ते ११ या वेळेत सुरु आहेत, ती सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत सुरु ठेवता येतील.

सर्व आवश्यक गटात नसलेल्या इतर दुकानांना उघडणे आणि त्यांच्या वेळा ( केवळ एकल दुकाने. मॉल्स किंवा शॉपिंग सेन्टर्स नव्हे) याबाबतीत स्थानिक आपत्ती

व्यवस्थापन प्राधिकरण निर्णय घेईल. मात्र आवश्यक गटातील दुकानाच्या वेळेप्रमाणेच त्यांच्या वेळा असतील तसेच शनिवार , रविवार ती बंद राहतील

अशा भागांत आवश्यक वस्तूंच्या जोडीने आवश्यक नसलेल्या वस्तू देखील ई कॉमर्स माध्यमातून वितरीत करता येतील

दुपारी ३ नंतर मात्र वैद्यकीय किंवा इतर आणीबाणीच्या प्रसंगांव्यतिरिक्त येण्याजाण्यावर निर्बंध असतील

कोरोनाविषयक कामे करणाऱ्या कार्यालयांव्यतिरिक्त इतर सर्व शासकीय कार्यालये ही २५ टक्के कर्मचारी उपस्थितीनिशी सुरु राहतील. संबंधित विभाग प्रमुखास यापेक्षाही जादा उपस्थिती हवी असेल तर संबंधित आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी त्यास परवानगी देईल.

कृषिविषयक दुकाने आठवड्याच्या कामाच्या दिवसांना दुपारी २ पर्यंत सुरु राहू शकतील. येणारा पावसाळा व पेरणीच्या तयारीसाठी स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी या दुकानाच्या वेळा वाढवू शकते किंवा शनिवार, रविवार सुरु ठेवण्यास परवानगी देऊ शकते

पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असलेल्या जिल्हे व पालिकांसाठी :

वरील ज्या पालिका किंवा जिल्ह्यांत पॉझिटीव्हीटी दर 20 टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेड्स 75 टक्क्यांपेक्षा जास्त भरले असतील तर तिथे १२ मे २०२१ब्रेक दि चेन आदेशातील निर्बंध खालीलप्रमाणे वाढविण्यात येतील.

अशा जिल्ह्यांच्या सीमा पूर्णपणे बंद करण्यात येतील आणि कुणाही व्यक्तीला जिल्ह्याच्या आत बाहेर करण्यास परवानगी राहणार नाही. केवळ कुटुंबातील मृत्यू, वैद्यकीय कारण आणि आवश्यक, आणीबाणीच्या कोविड प्रसंगीची सेवा देणाऱ्या व्यक्तींचा अपवाद असेल.

उपरोक्त प्रशासकीय घटकांमध्ये न येणाऱ्या इतर सर्व जिल्हे व पालिकांच्या ठिकाणी १२ मे २०२१ चे ब्रेक दि चेनचे निर्बंध नेहमीप्रमाणे लागू राहतील.

दुकानांना पुरवठा केल्या जाणारा वस्तूंच्या वाहतुकीवर निर्बंध नाहीत हे पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात येते. मात्र दुकानांना ठरवून दिलेल्या वेळेनंतर ग्राहकांना विक्री करता येणार नाही. या नियमांचा भंग केल्यास दुकान कोरोना साथ जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत बंद ठेवण्यात येईल तसेच १२ मे च्या आदेशाप्रमाणे दंडही आकारण्यात येईल. आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारी यांनी निश्चित केलेल्या वेळेनुसार होम डिलिव्हरी सुरूच राहतील.

१२ मे २०२१ चे ‘ब्रेक दि चेन’ चे आदेश आपल्या माहिती व संदर्भासाठी

कोणत्याही वाहनातून महाराष्ट्र राज्यामध्ये दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडे RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल असणे अनिवार्य आहे. हा अहवाल राज्यामध्ये प्रवेश करण्याच्या जास्तीत जास्त 48 तास अगोदर केलेल्या चाचणीचा असावा.

यापूर्वी 18 एप्रिल आणि 1 मे 2021 रोजी जाहीर केलेल्या निर्बंधांमध्ये महाराष्ट्रात दाखल होणाऱ्या संवेदशील भागातील व्यक्तींसाठी असलेले नियम आता देशाच्या कोणत्याही भागातून महाराष्ट्रामध्ये दाखल होणाऱ्या व्यक्तींसाठी लागू राहतील.

मालवाहतूक करणाऱ्यांकरिता एका वाहनांमध्ये फक्त दोन व्यक्ती (चालक आणि क्लिनर/हेल्पर) यांना प्रवास करण्याची मुभा असेल. जर हे मालवाहक महाराष्ट्राच्या बाहेरून येत असतील तर त्यातील दोघांना RT-PCR निगेटिव्ह चाचणी अहवाल द्यावा लागेल आणि हा अहवाल राज्यात दाखल होण्याच्या जास्तीत जास्त 48 तासापूर्वीचा असावा. हा अहवाल सात दिवसांकरिता वैध राहील.

स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्रशासन (डीएमए) हे ग्रामीण बाजारपेठ आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कामावर सनियंत्रण ठेवतील आणि कोरोना निर्बंधांचे काटेकोर पालन केले जात आहे की नाही यावर लक्ष ठेवतील. जर ‘डीएमए’ला असे आढळले की, अशा काही ठिकाणी व्यवस्था करणे व शिस्तीचे पालन होत नाहीये, तर त्या त्या ठिकाणच्या ग्रामीण बाजारपेठा आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे कामकाज बंद करण्याचा निर्णय किंवा अधिक निर्बंध लावण्याचा निर्णय घेतला जाईल.

दूध संकलन, दुधाची वाहतूक आणि प्रक्रिया हे सर्व कोणत्याही निर्बंधांशिवाय चालू ठेवता येईल, परंतु लागू असलेल्या सर्व निर्बंधांचे काटेकोरपणे पालन करून आवश्यक वस्तू विक्रीसाठीची परवानगी असलेल्या दुकानांसाठी किरकोळ दूध विक्रीला मुभा असेल किंवा ते ‘होम डिलिव्हरी’ करू शकतील.

कोविड-19 व्यवस्थापनाच्या कामासाठी औषधी आणि इतर साहित्यांची मालवाहतूक करण्याच्या कामात सहभागी असलेले विमानतळ आणि बंदर सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल, मोनो आणि मेट्रो रेल्वेने प्रवास करण्याची मुभा असेल.

स्थानिक डीएमए आपल्या अखत्यारीतील विशेष भागांमध्ये अधिक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेऊ शकतात. परंतु याची कल्पना राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाला (एसडीएमए) द्यावी लागेल आणि हे निर्बंध लागू करण्याच्या 48 तास अगोदर त्याची जाहीर घोषणा करावी लागेल.

राज्यातील जिल्हाबंदी कायम ठेवण्यात आलीय

29 मे 2021 च्या तारखेनुसार आठवड्याच्या शेवटी असलेली पॉझिटीव्हीटी दर आकडेवारी आणि तेथील ऑक्सिजन बेड्सची उपलब्धता यासाठी गृहीत धरली जाईल.

पालिका स्वतंत्र प्रशासकीय घटक असतील

२०११ च्या जणगणनेनुसार 10 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या सर्व महानगरपालिका जसे की, बृहन्मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी चिंचवड , नागपूर, औरंगाबाद, नाशिक यांना कोरोना संसर्गाला रोखण्यासाठी स्वतंत्र प्रशासकीय घटक म्हणून समजण्यात येईल. या पालिकांच्या क्षेत्रांव्यतिरिक्तचा जिल्ह्यातील उर्वरित भाग हा वेगळा प्रशासकीय घटक राहील.

ADVERTISEMENT

 

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

संबंधित बातम्या

संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

प्रा.लक्ष्मणराव ढोबळे यांचे मंगळवेढ्यासाठी मोठे योगदान; विशाल खंदारे यांचा संपूर्ण लेख वाचा सविस्तर

May 18, 2022
नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

मंगळवेढ्यात शंभरी पार केलेल्या आजींचा वाढदिवस आज धूमधडाक्‍यात साजरा होणार; सर्व ग्रामस्थांच्या वतीने आयोजन

May 18, 2022
शेतकऱ्यांन समोर पुढचे काही तास अवकाळी पावसाच संकट! ‘या’ जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह गारपीट

नागरिकांनो! राज्यात ‘या’ जिल्ह्यांना वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा

May 18, 2022
अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

धुसपूस वाढली! काँग्रेस महाविकास आघाडीतून बाहेर पडणार?

May 16, 2022
शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

शिष्टाईला यश! सिद्धेश्वर आवताडे यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केले असे काही…; घालून दिला नवा आदर्श

May 16, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभाजीनगर, बाबरी, राणा, हनुमान चालिसा ते मुंबईचा अन् महाराष्ट्राचा बाप फक्त.. देवेंद्र फडणवीसांचं भाषण ‘या’ मुद्यांमध्ये

May 15, 2022
तुका म्हणे पवारा; नको उडवू तोंडाचा फवारा..! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

तुका म्हणे पवारा; नको उडवू तोंडाचा फवारा..! ‘या’ प्रसिध्द अभिनेत्रीची शरद पवारांबाबत आक्षेपार्ह पोस्ट; गुन्हा दाखल

May 14, 2022
मोठी बातमी! स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ‘या’ महिन्यांनंतर होणार; निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापज्ञ

Breaking! महाराष्ट्रातील निवडणुका नेमक्या कधी; सुप्रीम कोर्टात ‘या’ तारखेला होणार फैसला

May 13, 2022
Next Post
पंढरपूर ब्रेकिंग! कार्तिकी यात्रेच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल-रुक्मिणीचे मुखदर्शन तीन दिवस बंद राहणार

विठ्ठल भक्ती! बिग बी अमिताभ बच्चन यांनी केले पंढरपुरातील विठ्ठल-रुक्मिणी मातेचे फोटो ट्विट

ताज्या बातम्या

धक्कादायक! मंगळवेढ्यातील विवाहित महिलेला पळवून नेवून केला बलात्कार; आरोपीला अटक

सोलापुरात प्रेमविवाहानंतर हुंडा दिला नाही म्हणून पत्नीला घटस्फोटाची धमकी; पतीविरुद्ध गुन्हा दाखल

May 19, 2022
सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

सोलापूरच्या विकासाची जबाबदारी विसरून भरणेमामांनी इंदापूर, बारामतीचा फायदा पाहिला; आमदार प्रणिती शिंदे राष्ट्रवादी विरूध्द आक्रमक

May 19, 2022
दहावी-बारावीच्या परीक्षा घ्यायचं ठरल! ‘या’ तारखेपासून सुरुवात, परीक्षांचे वेळापत्रक जाहीर

विद्यार्थ्यांनो! सोलापूर विद्यापीठाच्या परीक्षा ऑफलाइन पद्धतीनेच; प्रत्येक तासाला मिळणार ‘एवढ्या’ मिनिटांचा अधिकचा वेळ

May 19, 2022
संचारबंदीपूर्वी पंढरपूरमध्ये आषाढीसाठी आलेल्या भाविकांना पोलीस बाहेर काढणार

पंढरी गजबजनार! आषाढी वारीसाठी ‘या’ प्रमुख पालख्यांसह ‘इतके’ लाख वारकरी वाढणार

May 19, 2022
Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

Breaking! मंगळवेढ्यात पडक्या घरात सापडली ब्रिटिशकालीन ४५ जुनी नाणी, बालकाला आमिष दाखवून फसवणूक; पोलिसांनी केली एकाला अटक

May 19, 2022
राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

राजकीय भूकंप! विठ्ठल कारखाना निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिजीत पाटील गटात ‘या’ नेत्यांचा जाहीर प्रवेश; विठ्ठलच्या सभासदांचाही समावेश

May 18, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा