mangalwedhatimes.in
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

निर्दयीपणाचा कळस! अंधारात भर रस्त्यावर जन्मलेल्या बाळाला ठेवून आई वडिल पसार

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 21, 2022
in क्राईम, राज्य, सोलापूर
डाळिंबातील ‘बी’ श्‍वासनलिकेत अडकल्याने बालिकेचा मृत्यू; सोलापूरातील ‘या’ गावातील दुर्दैवी घटना!

टीम मंगळवेढा टाईम्स ।

एका तासापूर्वी जन्मलेले एक नवजात पुरुष जातीचे बाळ रस्त्याच्या मधोमध सोडून  आई-वडिलांनी पलायन केले होते. ही घटना नारायण चिंचोली येथे  रात्री साडेदहाच्या सुमारास घडली आहे.

फुलचिंचोली (ता.पंढरपूर) येथील अविनाश नागनाथ वसेकर ( वय ३२ ) हे त्यांच्या कुटुंबासह रात्री साडेदहाच्या सुमारास मायाक्का चिंचणी देवदर्शनासाठी त्यांच्या चारचाकी गाडीने जात होते.

https://mangalwedhatimes.in/wp-content/uploads/2022/02/VID-20220221-WA0024.mp4

या दरम्यान ते नारायण चिंचोली गावातील पाण्याच्या टाकीच्या समोर साईराज ढाब्याजवळ आले असता त्यांना रस्त्याच्या मध्यभागी एक लहान बाळ पडल्याचे दिसून आले.

त्यांनी त्यांचे वाहन तत्काळ बाजुला घेऊन वाहनातून खाली उतरले. मोबाईलची टॉर्च लावून रोडच्या मधोमध पडलेल्या बाळाजवळ जाऊन पाहिले असता एक नवजात पुरुष जातीचे जिवंत अर्भक अंदाजे १ ते २ तासापूर्वी जन्मलेले असल्याचे दिसून आले.

त्यांनी आजुबाजुला पाहिले. मात्र, त्या ठिकाणी त्यांना कोणीही दिसून आले नाही. त्यांनी त्या बाळास त्यांच्याकडे असलेल्या कापडामध्ये गुंडाळून बाजूस घेतले.

नारायण चिंचोली येथील त्यांचे ओळखीचे महेश गुंड यांना याबाबत माहिती देऊन त्यांना बोलावून घेतले त्यानंतर नारायण चिंचोली येथील महेश गुंड व त्यांच्या सोबत गावातील चार ते पाच लोक आले.

त्या सर्वांनी मिळून त्यांच्या वाहनातून संबंधीत नवजात बाळाला उपचारासाठी पंढरपूर येथील खासगी हॉस्पिलटमध्ये दाखल केले आहे.

याबाबत अविनाश नागनाथ वसेकर यांनी पोलीस ठाण्यात माहिती दिली आहे. या बाळाच्या आई वडिलांचा शोध सुरू असल्याचे पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी सांगितले.

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: पंढरपूर

संबंधित बातम्या

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

या दिवाळीत करा स्वतःच्या हक्काच्या जागेचे स्वप्न पूर्ण! मंगळवेढ्यात ‘शिवशाही सिटी’ मध्ये बुकिंग सुरू; बुलेट, ई-स्कूटर जिंकण्याची सुवर्णसंधी; आजच 9970766262 संपर्क साधा

November 7, 2026

रतनचंद शहा बँकेची मोठी कारवाई! जप्त मालमत्तेत अनधिकृत प्रवेश भोवला; कर्जदार दाम्पत्यावर पोलिसांत गुन्हा दाखल

November 11, 2026
खळबळ! मंगळवेढ्यात झालेल्या ‘त्या’ आत्महत्येप्रकरणी पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा तालुक्यात खळबळ! ४० वर्षीय शेतकरी बेपत्ता; अज्ञात व्यक्तीने पळवून नेल्याचा संशय, पत्नीची पोलिसांत तक्रार

November 5, 2026
न्यूरोसर्जन डॉ.शिरीष वळसंगकर प्रकरणाला वेगळं वळण; आरोपी महिलेच्या वकिलाचा मोठा खुलासा

लोकसंख्या नियंत्रणासाठी ‘दोन अपत्यांची अट’ आता कालबाह्य: सर्वोच्च न्यायालयाचे ऐतिहासिक निरीक्षण; ​२००३ च्या निकालाचा फेरविचार होणार

November 5, 2026
कॅनॉलमध्ये अडकलेली गाडी काढण्यासाठी बोलावून जेसीबी मालकास मारहाण करत लुटले

मंगळवेढा हादरले! ग्रामपंचायत कार्यालयासमोरच सरपंच पतीला गाठून चोपले; ६ जणांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल

November 4, 2026

निवृत्तीनंतर उघड झाली ३१ वर्षांची काळी माया! कृषी खात्यातील बड्या अधिकाऱ्याचा तो प्रताप अखेर चव्हाट्यावर…

November 5, 2026
Next Post
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

आमदार साहेब! मंगळवेढ्याची जनता आमसभेच्या प्रतीक्षेत; अनेक प्रश्न प्रलंबित

ताज्या बातम्या

शेतजमिनीचे बांध, हद्द अन् सातबाऱ्याचे वाद आता कोर्टाविना मिटणार; महसूल विभागाचा मोठा निर्णय

November 11, 2026
दुष्काळाच्या अंधारात बळीराजाच्या घरी आनंदाचा दिवा! पालकमंत्री जयकुमार गोरे व आ.समाधान आवताडे यांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी

दुष्काळाच्या अंधारात बळीराजाच्या घरी आनंदाचा दिवा! पालकमंत्री जयकुमार गोरे व आ.समाधान आवताडे यांनी साजरी केली शेतकऱ्यांसोबत दिवाळी

November 10, 2026
मंगळवेढ्यात ‘आदर्श महिला अर्बन पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि लखपती योजना जाहीर

मंगळवेढ्यात ‘आदर्श महिला अर्बन पतसंस्थे’चा आज भव्य शुभारंभ; ठेवींवर आकर्षक व्याजदर आणि लखपती योजना जाहीर

November 10, 2026
मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

मंगळवेढ्यात दिवाळी पाडव्यानिमित्त ७/१२ डेव्हलपर्सचा बंपर धमाका! ‘शिवशाही सिटी’त प्लॉट बुक करा आणि मिळवा रॉयल एनफिल्ड बुलेट; 9890605962 / 9595232626 संपर्क साधावा

November 9, 2026
सोलापूर विद्यापीठाने पुन्हा परीक्षा पुढे ढकलल्या! नैसर्गिक आपत्तीमुळे ऑनलाइन परीक्षा रद्द

मोठी बातमी! दहावी-बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; कधी सुरू होणार परीक्षा? अंतिम वेळापत्रक समोर

November 9, 2026
काय सांगताय! साडी खरेदीवर चक्क सोन्याची नथ मोफत, 10 हजारांच्या खरेदीवर आकर्षक गिफ्ट; दीपावली निमित्ताने मंगळवेढ्यातील ‘शीतल कलेक्शन’ची फुल पैसा वसूल ऑफर

मंगळवेढ्यात ‘शीतल कलेक्शन’च्या माहेश्वरी साडी महोत्सवाला उदंड प्रतिसाद; ग्राहकांच्या आग्रहास्तव पुन्हा एकदा स्टॉक उपलब्ध, खास ऑफर्स सुरूच

November 7, 2026
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..