mangalwedhatimes.in
Advertisement
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
  • होम
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • सोलापूर
  • मंगळवेढा
  • राजकारण
  • क्राईम
  • मनोरंजन
  • शैक्षणिक
No Result
View All Result
Mangalwedha Times
No Result
View All Result

आमदार साहेब! मंगळवेढ्याची जनता आमसभेच्या प्रतीक्षेत; अनेक प्रश्न प्रलंबित

टीम 'मंगळवेढा टाईम्स' by टीम 'मंगळवेढा टाईम्स'
February 21, 2022
in मंगळवेढा, राजकारण
मंगळवेढ्यातील ‘या’ गावात होणार नविन प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ कोटींचा निधी मंजूर; आ.आवताडेंच्या पाठपुराव्याला यश

टीम मंगळवेढा टाईम्स ।

मंगळवेढा तालुक्यातील सर्व अधिकारी पदाधिकारी व सामान्य जनता यांनी एकत्रित बसून तालुक्यातील सर्व प्रश्नावर चर्चा करून मार्ग काढण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे आमसभा.

पण गेल्या आठ वर्षापासून मंगळवेढ्याची आमसभाच न झाल्याने अनेक प्रश्न प्रलंबित राहिले असून या वर्षात तर आ समाधान आवताडे आमसभा घेणार का ?असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.

मंगळवेढ्याची आमसभा आठ वर्षापूर्वी २५ फेब्रुवारी २०१३ रोजी झाली होती. ही आमसभा अत्यंत वादळी स्वरूपात झाली होती. अधिकारी व पदाधिकारी यांच्यात हमरी तुमरी पर्यंत वाद झाले होतेे.

त्याचबरोबर अनेक प्रश्नावरती विधायक चर्चाही झाल्या होत्या. मात्र, त्यानंतरच्या २०१४ च्यावर्षी विधानसभेच्या आचारसंहितेमुळे आमसभा होऊ शकली नाही. तर नंतरच्या वर्षी अधिवेशन असल्याने आमसभा होऊ शकली नाही.

त्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत पाच वर्ष दिवंगत आमदार भारत भालके यांच्या गटाची पंचायत समितीमध्ये सत्ता होती त्यामध्ये पहिली अडीच वर्षे संभाजी गावकरे यांनी तर नंतरची अडीच वर्षे निर्मला काकडे यांनी सभापती पद भुषविले होते.

सध्या पाच वर्षे आवताडे गटाची सत्ता असून त्यांचा पाच वर्षांचा कार्यकाल संपत आला आहे मात्र सरतेशेवटी एखादी आमसभा व्हावी अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे.

दरवर्षी आमसभा झाली असती तर अनेक प्रश्नांना वाचा फुटली असती मात्र, आठ वर्षे आमसभा ना घेता कारभार चालवणाऱ्या पंचायत समितीच्या कारभा-यानी आमसभा न घेण्याचा पराक्रम केला असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

आमसभेचे नियोजन हे पंचायत समिती कडून करण्यात येते. गटविकास अधिकारी व सभापती यांनी नियोजन करून आमदारांची तारीख घेतली जाते व सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना कळवून आमसभा घेतली जाते.

आमसभेमध्ये वर्षभराच्या कामकाजाचा आढावा घेतला जातो. आमसभेचा पदषिध्द अध्यक्ष आमदार असतात. सर्व अधिकारी लोकप्रतिनिधी व तालुक्यातील नागरिक एकत्रित सर्व विषयावर चर्चा, तक्रारी, रखडलेली कामे, झालेली कामे, याचा आढावा आमदार घेत असतात.

पण आमसभाच न झाल्याने तालुक्यात नेमके चाललय तरी काय? हे समजेनासे झाले आहे.

सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांकडे, रखडलेल्या कामांकडे आतापर्यंत दुर्लक्ष झाले असून या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी पं.स कडून त्वरित आमसभेचे नियोजन करणे गरजेचे आहे.

विद्यमान आमदार समाधान आवताडे हे निवडून आल्यापासून पायाला भिंगरी बांधून लोकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी झटत आहेत अशा परिस्थितीत आमसभा लावली तर सर्व खात्याच्या समस्या, प्रश्न अडचणी या एका ठिकाणी समजून येतील त्यामुळे त्यांनी आमसभेच्या वेळ देऊन आमसभा घेणे गरजेचे आहे.(स्त्रोत:पुण्यनगरी)

ADVERTISEMENT

अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

ताज्या बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच जॉईन व्हा

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज

Tags: आ.समाधान आवताडेआमसभा
ADVERTISEMENT

संबंधित बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

मंगळवेढ्यात भाजपात उभी फूट, आ.प्रशांत परिचारकांची कट्टर विरोधक असलेल्या भालकेंशी युती; आ.आवताडेंना भाजप तालुकाध्यक्षाचे आवाहन

June 28, 2022
दामाजीचा रणसंग्राम! आवताडे गटाची एक जागा बिनविरोध, 281 जणांनी माघार घेतली; यांच्यात होणार थेट लढत

दामाजीचा रणसंग्राम! आवताडे गटाची एक जागा बिनविरोध, 281 जणांनी माघार घेतली; यांच्यात होणार थेट लढत

June 27, 2022
नीट समजून घ्या! दामाजी साखर कारखाना निवडणुक; यांनाच मिळणार मताचा अधिकार

दामाजीच्या सत्ताधारी पॅनेलला कोण आव्हान देणार, परिचारक समर्थकांचे अर्ज मोठ्या प्रमाणात शिल्लक; आज होणार चित्र स्पष्ट

June 27, 2022
नोकरीची संधी! मंगळवेढ्यात जॉब पाहिजे; मोठ्या कंपनीत करा नोकरी; विविध पदासाठी होणार मोठी भरती

गोल्डन चान्स! मंगळवेढ्यातील मोठ्या ज्वेलर्स कंपनीत नोकरीची संधी, घडवा एक लखलखते करियर; आजच करा अर्ज

June 27, 2022
सोलापूरच्या शिवसेना माजी मंत्र्याच्या निधनाची अफवा; फेक पोस्टने उडाली खळबळ

फळ मिळाले! शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर सोलापुरातील ‘या’ दोघांची नियुक्ती; पक्षाशी एकनिष्ठता आली कामी

June 26, 2022
Next Post
भगवा फडकला! शिवप्रेमींमध्ये जल्लोष; मंगळवेढा शहरातून काढली 50 ईरटीका गाड्यांची भगवी रॅली

भगवा फडकला! शिवप्रेमींमध्ये जल्लोष; मंगळवेढा शहरातून काढली 50 ईरटीका गाड्यांची भगवी रॅली

ताज्या बातम्या

अखेर ठरले! महाविकास आघाडीची ‘या’ 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे सुपूर्द

करेक्ट कार्यक्रम! ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू; ‘या’ तारखेला बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार

June 28, 2022
Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

Breaking! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल, सत्ता स्थापनेसाठी जोरदार हालचाली; ‘ही’ मागणी केली जाणार

June 28, 2022
ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

ब्रँडेड थाळी! मंगळवेढ्यातील हॉटेल योगीराज येथे ‘बिर्याणी’ महोत्सव, ग्राहकांसाठी मान्सून ऑफर; फॅमिलीसाठी खास सोय

June 28, 2022
बारावीच्या विद्यार्थ्यांनो लक्ष द्या! ‘इथे’ क्लिक करुन पाहता येईल निकाल; ‘या’ तारखा निकालानंतर तुमच्यासाठी महत्त्वाच्यात

विद्यार्थ्यांनो! मंगळवेढयात आज गुणवंतांचा सत्कार; करिअर विषयक मार्गदर्शन शिबीर

June 28, 2022
बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

बंटी और बबली! मंगळवेढ्यात लग्न करून नातेवाईकांकडे आलेल्या नवदांपत्यांने एक लाखांच्या दागिन्यावर मारला डल्ला

June 28, 2022
आवताडे-परीचारकांची शिष्टाई आली कामाला! व्यापारी, सामान्यांना दिलासा द्यावा; फडणवीसांच मुख्यमंत्र्यांना पत्र

संभ्रम अवस्था! विठ्ठलाच्या शासकीय महापूजेचा मान कोणाला मिळणार पालख्यांच्या स्वागताला मामा की बापू?

June 28, 2022
mangalwedhatimes.in

प्रिंट,टीव्ही मीडियानंतर सध्या डिजिटल मीडियाचं महत्व प्रचंड वाढलंय. येणाऱ्या काळात या माध्यमाचं महत्व आणि व्याप्ती आणखी वाढणार असल्यानं . आम्ही हा नवीन बदल स्वीकारून 'मंगळवेढा टाईम्स' या सोशल मीडियाच्या फेसबुक पेजचे रूपांतर वेब मीडिया मध्ये करून 'मंगळवेढा टाईम्स' या नावाने न्युजचे वेब पोर्टल आपल्या सेवेत दाखल झालय. येथे आपण आपल्या स्मार्टफोन, कॉम्पुटर वरून देश विदेशातील घडामोडी तसेच स्थानिक, व्यापार, ग्रामीण, सांस्कृतिक, उद्योग, कृषी, मनोरंजन, तंत्रज्ञान, शिक्षण अश्या विविध श्येत्रांतील बातम्या घरबसल्या वाचू शकता. स्मार्टफोन, सोशल मीडियाच्या माध्यमातून बातम्या पाहण्यात लोकांचा कल वाढतोय, म्हणूनच आम्ही बदलतोय.

© 2020 Website Maintained by Tushar Bhambare..