मंगळवेढा टाईम्स न्युज नेटवर्क ।
संपूर्ण महाराष्ट्र व कर्नाटक अशी दोन राज्य कार्यक्षेत्र घेऊन 43 शाखांच्या माध्यमातून ग्राहकांच्या सेवेत तत्पर असलेली एल के पी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सोलापूर या संस्थेच्या सांगली शहर येथील शाखेचा लोकार्पण सोहळा दिमाखात व उत्साही वातावरणामध्ये संपन्न झाला.
दिवसभर पावसाळी वातावरण असताना देखील या लोकार्पण सोहळ्याकरिता शहरांमधील नागरिक, छोटे- मोठे व्यावसायिक, व्यापारी वर्ग व विविध क्षेत्रांमधील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.
कापूर अग्रणी उद्योग समूहाचे संस्थापक विनायक तात्या पाटील, तासगाव अर्बन बँकेचे चेअरमन महेश्वर हिंगमिरे, ब्रम्हा उद्योग समूहाचे चेअरमन मारुती माळी, माजी नगराध्यक्ष अमोलनाना शिंदे, जाफर मुजावर, उपनगराध्यक्ष अमोल कुत्ते, शितल वस्त्र निकेतनचे सचिन माळी, अग्रणी दूध संघाचे पोपटराव बिले,
मार्केट कमिटीचे संचालक कुमार शेटे, तासगाव अर्बन चे संचालक उदय वाटकर, राजेंद्र माळी, अभिषेक देशिंगकर, सचिन धोत्रे, वैभव माने ,प्रतीक चव्हाण, सिद्धिविनायक इंटरप्राईजेस चे महेंद्रसिंग ,धैर्यशील पाटील, सय्यद साहेब ,मिलिंद पवार इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
सांगोला तालुका आणि सोलापूर जिल्ह्याच्या परिसरामध्ये सुमारे तेरा वर्षापासून सूर्योदय नावाचा एक उद्योग समूह कार्यरत असून कृषी, उद्योग, कापड, दुध, शिक्षण यासारख्या अनेक क्षेत्रांमध्ये हा समूह कार्यरत असून याद्वारे शेकडो तरुणांच्या हाताला काम उपलब्ध झालेले आहे.
एल के पी मल्टीस्टेटचे चेअरमन व सूर्योदय उद्योग समूहाचे संस्थापक अनिलभाऊ इंगवले, डॉ. बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी व सुभाष दिघे गुरुजी हे चार तरुण सन 2010 सालापासून या समुहाच्या माध्यमातून अखंड कार्यरत आहेत.
याच उद्योग समूहाने एल के पी मल्टीस्टेटच्या माध्यमातून वित्तीय क्षेत्रामध्ये क्रांतिकारी पाऊल टाकलेले आहे. छोट्या मोठ्या व्यावसायिकांसाठी दोन लाखापर्यंतची झटपट कर्ज भयोजना या संस्थेच्या वतीने कार्यान्वित असून आरटीजीएस, एनईएफटी व आय एम पी एस यासारख्या कितीतरी सेवा ग्राहकांना मोफत दिल्या जात आहेत.
आपल्या प्रास्ताविकामध्ये एल के पी चे चेअरमन अनिलभाऊ इंगवले यांनी संस्थेच्या वतीने देउ करण्यात आलेल्या ठेवीच्या विविध योजनांची माहिती सांगितली. एकविसाव्या शाखेचा लोकार्पण सोहळा आज संपन्न करत असताना सर्व समाधानी ग्राहकांच्या सहकार्याने 165 कोटीहून अधिक व्यवसाय आम्ही करू शकलो , याबद्दल आभार व्यक्त केले.
उद्योजक मारुती माळी यांनी बोलताना आजच्या तरुणांनी या ग्रुपचा आदर्श घ्यावा असे सांगत अनेक वैविध्यपूर्ण दाखले देत उपस्थिततांना मंत्रमुग्ध केले. अनेक मान्यवरांनी यावेळी बोलताना अनिलभाऊ इंगवले व त्यांच्या औद्योगिक मित्र परिवाराच्या कार्याचे विशेष कौतुक केले.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज