टीम मंगळवेढा टाईम्स।
दलितमित्र स्व. कदम गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त १ ते ४ मे या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असल्याची माहिती अध्यक्ष अॅड. सुजित कदम यांनी दिली.
१ मे रोजी दुपारी १२ वाजता दलितमित्र कदम गुरुजी यांच्या पुतळ्याचे पूजन व सर्व शाखांच्या सांस्कृतिक कार्यक्रमांचे सादरीकरण होणार आहे.
हा कार्यक्रम सोलापूरचे डॉ. एन. बी. चव्हाण यांच्या हस्ते व अध्यक्ष अॅड. सुजित कदम, उपाध्यक्ष डॉ. सुभाष कदम, डॉ. एम. ए. अनुसे आदींच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
त्यानंतर शिवशंभो महिला ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेचा द्वितीय वर्धापनदिन बालरंगभूमी परिषद, मुंबईच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांच्या हस्ते, शिक्षण प्रसारक मंडळाच्या अॅडमिनिस्ट्रेटर डॉ. मीनाक्षी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल.
२ मे रोजी सकाळी सात वाजता कृषी क्रीडा ज्योत दौड व सायकल रॅली जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले कसगावडे यांच्या हस्ते, स्व. कदम गुरुजी स्मारक ते ताड आप्पा मळा यादरम्यान होईल.
सकाळी ११ वाजता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे उपकुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांचे ‘नवीन शैक्षणिक धोरणातील आव्हाने’ या विषयावर व्याख्यान होईल.
दुपारी चार वाजता संस्थांतर्गत मुलांच्या व मुलींच्या भव्य कुस्ती स्पर्धेचे महाराष्ट्र केसरी समाधान घोडके यांच्या हस्ते उद्घाटन होईल. दि.३ मे रोजी सकाळी आठ वाजता उद्धव बिनवडे व ग्रुप वेळापूर यांचा गोंधळ कार्यक्रम होईल.
सकाळी नऊ वाजता इंग्लिश स्कूलच्या झांज पथकाचे सादरीकरण होईल. सकाळी नऊ ते सायंकाळी पाचपर्यंत अ. भा. मराठी नाट्यपरिषद, मंगळवेढा शाखा आयोजित सूत्रसंचालन कार्यशाळा होईल.
ज्येष्ठ पत्रकार अरविंद जोशी, निवेदिका श्वेता हुल्ले यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी ११ वाजता डॉ. नसिमा पठाण यांच्या ‘विद्यार्थी, पालक, शिक्षक बदलत्या काळानुसार शैक्षणिक संदर्भ’ या विषयावरील व्याख्यानाचे उद्घाटन डॉ. वृषाली पाटील यांच्या हस्ते होईल.
४ मे रोजी सकाळी नऊ वाजता भजनाचा कार्यक्रम होईल. सकाळी १० वाजता चंद्रकांत महाराज खळेकर यांचे प्रबोधनात्मक कीर्तन होईल. दुपारी १२ वाजता पुष्पवृष्टी होईल. त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होईल.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज