माढा : बाळासाहेब झिंजूरटे
माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये उमेदवाराकडून जोरदार प्रचार केला जात आहे. कार्यकर्तेही आपल्या नेत्याचा प्रचार करताना दिसत असताना धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी लग्नातच उखाण्यातून तुतारीला मतदान करा असे आव्हान केले आहे.
अकलूज पदमावती नगर येथील कै.नामदेव हरी पवार यांचे नातू व श्री शामराव नामदेव पवार यांचे जेष्ठ सुपुत्र सुधीर व कै,खंडू शंकर वायभासे यांची नात व श्री महादेव खंडू वायभासे
केम ता.करमाळा यांची द्वितीय कन्या स्वप्नाली (आरती) यांचा शुभविवाह रविवारी २८ एप्रिल रोजी अकलूज येथील अकलाई मंगल कार्यालय येथे संपन्न झाला.
सध्या माढा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असून प्रचाराची जोरदार सुरुवात झाली. अनेक मतदार आपापल्या परीने आपल्या नेत्याचा प्रचार करीत आहेत.
या विवाह सोहळ्यात देखील याची प्रचिती आली. वर सुधीर पवार यांनी एक अनोखा उखाणा घेतला.
घेऊन हाती विजयाची तुतारी
गाढुन टाकू गद्दारी
स्वप्नालीच नाव घेतो
अब की बार धैर्यशील भैय्या खासदार
पण माढ्यात फक्त धैर्यशील भैय्यांचीच तुतारी लग्न सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित असलेल्या मध्ये या उखाण्याचीच चर्चा होती. या अनोख्या उखाण्याची चर्चा दिवसभर अकलूज परिसरात होती.
या विवाहसोहळ्यासाठी व वधू वरांना शुभेच्छा देण्यासाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे सर्वं पदाधिकारी, नातेवाईक, मित्रमंडळी मोठया संख्येने उपस्थित होते.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स“च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज