मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
भूसंपादनाच्या मोबदल्यातील लाच प्रकरणानंतर बदनाम झालेल्या प्रांताधिकारी कार्यालयातून जातीचे व नॉनक्रिमिलियर दाखले सोडण्यास टाळाटाळ केल्याची तक्रार आमदार समाधान आवताडे यांच्या गाव भेट दौऱ्यात खोमनाळ येथील ग्रामस्थांनी केली होती.
आमदार आवताडे यांनी याबाबत प्रांताधिकाऱ्यांना दाखले वेळेत सोडण्याची तंबी दिली व निष्काळजीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्याचा टेबल बदलण्याची सूचना दिल्यानंतर प्रलंबित दाखले सोडले आहे.
पंढरपूर-मंगळवेढा या दोन्ही तालुक्यामध्ये सध्या जातीचे दाखले, नॉनक्रिमिनल दाखले हे प्रांताधिकारी कार्यालयातून वेळीच सोडण्यास टाळाटाळ झाल्याने अनेक दाखले प्रलंबित आहेत.
१५ दिवसांपासून नॉनक्रिमिलेअरच्या दाखल्यासाठी विद्यार्थ्यांची धावपळ होत असून अनेकांच्या शाळेचे प्रवेश रखडल्याची तक्रार खोमनाळ येथील पालकांनी आमदार आवताडे यांच्याकडे गावभेट दौऱ्यादरम्यान केली.
नंतर तत्काळ प्रांताधिकारी यांना फोनवरून याबाबत तंबी देत निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्याचा टेबल बदलण्याचे सूचना दिल्या होत्या. सध्या अनेक जण नोकरीसाठी, शाळेच्या प्रवेशासाठी कागदपत्रांची जुळवाजुळव करत आहेत. त्यातच वेळेवर दाखल्यासाठी मोठ्या प्रमाणावर धावपळ सुरू असते.
नोकरीसाठी ऑनलाइन अर्ज भरत असताना विविध दाखल्यांची गरज लागते. यामध्ये प्रांत कार्यालयाकडून प्रांताधिकारी यांच्या ऑनलाइन प्रणालीच्या सहीद्वारे नॉनक्रिमिलेअर, जातीचा दाखला सोडला जातो.
काही महा ई-सेवा चालकांनी तत्काळ, अतितत्काळ, निवांत दाखल्यासाठी वेगवेगळ्या रकमा ठरविल्या असून दाखल्याची शासकीय फीपेक्षा जास्त पैसे उकळले जात असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात येत आहे.
केवळ चिरीमिरी मिळवण्याच्या उद्देशाने दाखले प्रलंबित ठेवून सर्व्हर बंद असल्याचे कारण सांगून काही ठराविक हस्तकांमार्फत प्रांत कार्यालयातील “त्या” कर्मचारी भेटल्यानंतर ठराविक लोकांचे दाखले तत्काळ सोडले जात असल्याची चर्चा असून
राष्ट्रीय महामार्गाच्या प्रकरणातील भूसंपादनाच्या मोबदल्यावरून तलाठी व झिरो व्यक्तींवर कारवाई होऊनसुद्धा प्रांताधिकारी कार्यालयातील सावळा गोंधळ आटोक्यात आला नाही नसल्याचे दिसत आहे. मात्र पालकांच्या तक्रारीचे आमदार आवताडे यांनी गंभीर दखल घेतली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज