मंगळवेढा टाइम्स न्यूज नेटवर्क ।
राज्याचे मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी या योजनेअंतर्गत योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी अभियानाचे उदघाटन
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्या हस्ते व पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मंगळवेढा येथे संपन्न झाले.
शासकीय पातळीवर असणाऱ्या विविध विभागाच्या शासकीय योजना लोकाभिमुख करुन त्यांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी शासन आपल्या दारी योजना जनकल्याणकारी सर्वसामान्यांच्या दारी हे अभियान सुरु केलेले आहे.
या अभियानामुळे जनतेच्या प्रशासकीय कामांना मोठी गती प्राप्त होईल असे आ आवताडे यांनी सांगितले आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, आपल्या विविध कार्यालयीन कामांसाठी ग्रामीण भागातील अनेक नागरिक निरनिराळ्या शासकीय कार्यालयाकडे आपल्या कामानिमित्त येत असतात.
अशा नागरिकांना आपल्या शासकीय कामांसाठी लागणारी विविध कागदपत्रे जलद गतीने आणि वेळेवर मिळावीत यासाठी अशा उपक्रमांची नितांत गरज असल्याचेही आ आवताडे यांनी सांगितले आहे.
यावेळी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत लाभार्थ्यांना प्रमाणपत्र, कुशल पेमेंटचे धनादेश, पशुसंवर्धन विभागाअंतर्गत जनावरांना हिरवा चाऱ्यांसाठी बियानाचे वाटप, आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड वाटप तसेच कामगार विभागामार्फत कामगारांना सुरक्षा संच वाटप, जन्म प्रमाणपत्राचे वाटप,
महिला बालविकास अंतर्गत कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारी निवारण, बाल संगोपन योजनेची माहिती, बेबी केअर किट योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, बेटी बचाव – बेटी पढाव योजना विषयी माहिती देऊन लाभार्थ्याना याचा लाभ देण्यात आला.
यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रदीप खांडेकर, प्रांताधिकारी आप्पासाहेब समिंदर, तहसीलदार मदन जाधव, पोलीस निरीक्षक रणजित माने, भाजपा जिल्हा संघटन सरचिटणीस शशिकांत चव्हाण, भाजपा पंढरपूर – मंगळवेढा विधानसभा अध्यक्ष राजेंद्र सुरवसे, माजी संचालक सुरेश भाकरे, न. पा. मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव,
गटविकास अधिकारी शिवाजी पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल, तालुका कृषी अधिकारी गणेश श्रीखंडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर, न.पा.प्राथ.शिक्षण मंडळ सदस्य दिगंबर यादव त्याचबरोबर तालुक्यातील अनेक गावांचे सरपंच,
महसूल विभागातील तलाठी, ग्रामसेवक, कृषी विभागातील अधिकारी, सहाय्यक, यांचेसह २१ शासकीय अधिकारी, विभागातील विविध राजकीय व कार्यक्षेत्रातील मान्यवर, प्रशासकीय अधिकारी – पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज