टीम मंगळवेढा टाईम्स।
लग्नात व्यवस्थित मानपान केलेला नाही, नवीन घर घेण्याकरिता २५ लाख रुपये घेऊन ये, असे म्हणून विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ करून जाचहाट करून, घराबाहेर ठेवून व उपाशी ठेवून हाताने मारहाण करून
शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी पती रामदास यशवंत लोखंडे व सासू लक्ष्मी यशवंत लोखंडे (रा. कामोठे, सेक्टर रिद्धी सिद्धी सृष्टी सोसायटी, नवी मुंबई) या दोघाविरोधात मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी काजल रामदास लोखंडे (वय ३०, रा. सध्या मित्र नगर, मंगळवेढा) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, काजल यांचा एचडीएफसी बँकमध्ये नोकरी करत असलेले
रामदास यशवंत लोखंडे (रा- कामोठे,३५ सेक्टर रिद्धी सिद्धी सृष्टी सोसायटी, नवी मुंबई) यांच्याशी १४ जुलै २०२३ रोजी विवाह झाला होता.
लग्न झाल्यापासून ते डिसेंबर २०२३ पर्यंत पती, सासू यांनी मला व्यवस्थित सांभाळले. सन २०२३ पासून पती रामदास यांनी मला दारू पिऊन येऊन संशय घेऊन लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून मारहाण करू लागले.
तसेच मला उपाशी पोटी ठेवून शारीरिक मानसिक त्रास देऊन तुझ्या वडिलांनी लग्नात माझा मानपान व्यवस्थित केला नाही. मुंबई येथे नवीन प्लॅट घ्यायचा आहे,
त्यासाठी वडिलांकडून २५ लाख रुपये घेऊन ये, नाही तर तुला आम्ही नांदवत नाही, असे म्हणून रात्रीचे घरातून बाहेर काढले. तरीही काजलला पती व सासू हे आज ना उद्या सुधारतील व चांगले नांदवतील असे वाटत होते. परंतु त्यांच्या वागण्यामध्ये कोणताही बदल झाला नाही.
उलट ते सर्वजण जास्तच त्रास देऊ लागले. त्यावेळी माझे आई वडील व मध्यस्थी यांनी येऊन पती व सासू यांना समजावून सांगितले. तरीही पती व सासू यांच्या वर्तनात बदल झाला नाही. तसेच वेळोवेळी नवरा रामदास लोखंडे व सासू लक्ष्मी लोखंडे यांनी मिळून तुझ्या वडिलांनी लग्नात व्यवस्थित मानपान केलेला नाही,
नवीन घर घेण्याकरिता २५ लाख रुपये तुझ्या वडिलांकडून घेऊन ये, असे म्हणून माझा मानसिक व शारीरिक छळ करून जाचहाट करून घराबाहेर ठेवून व उपाशी ठेवून मला हाताने मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी केल्याप्रकरणी दोघाविरोधात फिर्याद दिली आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज