टीम मंगळवेढा टाईम्स ।
मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात महावितरण कंपनीकडून वीज चोरी विरोधात कडक मोहीम राबवली जात असून १ जानेवारी ते ३१ मार्च २४ अखेर २७ वीज चोरांविरोधात कारवाई करून ४७ लाखाचा दंड आकारण्यात आला आहे.
त्यापैकी १८ लाख ३० हजारांचा दंड वसूल झाल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांनी दिली. मंगळवेढा तालुक्यात वीज ग्राहकांना पुरेशा दाबाने व अखंडितपणे वीज पुरवठा व्हावा, यासाठी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी २४ तास कार्यरत आहेत.
महावितरण कडून पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी निधीची गरज भासते त्यामुळे वीज बिल वेळेवर भरणे गरजेचे आहे. गेल्या काही दिवसापासून मंगळवेढा उपविभागाच्या वतीने घरगुती, औद्योगिक वीजचोरी करणाऱ्याविरोधात कडक मोहीम राबविण्यात येत आहे.
मंगळवेढा शहरात २०, आंधळगाव, बोराळे प्रत्येकी १ व मंगळवेढा ग्रामीणमध्ये ५ अशा २७ जणांविरोधात कारवाई केली असून त्यांना ४६ लाख ९४ हजारांचा दंड केला आहे. त्यातील १८ लाख ३० हजारांचा दंड वसूल झाला आहे.
दंड न भरणाऱ्या विरोधात पोलीस कारवाई केली जाणार आहे. वीज ग्राहकांनी चोरीची वीज न वापरता रीतसर वीज जोड घेऊन विजेचा वापर करावा, तसेच पुढील काळातही विज चोराविरोधात कडक कारवाईची मोहीम राबवली जाणार आहे.
ही कारवाई पंढरपूर विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील, उप कार्यकारी अभियंता प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता सचिन कोळेकर, प्रशांत गायकवाड, योगेश खेर, दत्तात्रय आसबे, अमर कांबळे हे करत आहेत.
सध्या पावसाळयाचे व वादळ वाऱ्याचे दिवस असून अनेक वेळा वीज पुरवठा तांत्रिक अडचणीमुळे खंडित होऊ शकतो.
त्यामुळे ग्राहकांना तातडीने वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे अधिकारी व कर्मचारी कार्यरत असून ग्राहकांनीही सहकार्य करणे अपेक्षित आहे. तसेच वीज बिल वेळेवर भरून सहकार्य करण्याचे आवाहन उपकार्यकारी अभियंता पाटील यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.

बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज