टीम मंगळवेढा टाईम्स।
सालाबादप्रमाणे याही वर्षी श्री संत दामाजीपंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती श्री दामाजी संस्थेचे अध्यक्ष विष्णूपंत आवताडे यांनी दिली.
आज मंगळवार दि.२१ मे रोजी सकाळी ८ वाजता आवताडे (रांझणीकर) व संस्थेचे सर्व विश्वस्त यांचे हस्ते विणा पुजन करण्यात येणार आहे.
सकाळी ९ ते १२ ह.भ.प.महादेव यादव, तुकाराम घुले, भिमा इंगळे, पुण्यवंत वाघमारे, अरुण शिवशरण यांचे संगीत भजन, दुपारी १२ ते ४ नामवंतांचे भारुड, ४ ते ६ ह.भ.प. विठ्ठल पाटील घरनिंकी यांचे प्रवचन
तसेच नृसिंह जयंतीनिमित्त ह.भ.प. केराप्पा लेंडवे लेंडवेचिंचाळे यांचे किर्तन, रात्री ९ ते ११ खोमनाळ, फटेवाडी, तळसंगी, सिध्देवाडी, बोराळे भाळवणी तसेच मंगळवेढा शहरातील सर्व भजनी मंडळ यांचा जागर,
उद्या बुधवार दि.२२ मे रोजी सकाळी ९ ते १२ भजनसम्राट मस्तान मुल्ला व माचणूर भजनी मंडळ यांचे संगीत भजन, दुपारी १२ ते ४ नामवंतांचे भारुड, ४ ते ५ ह.भ.प. सतिश भोसले यांचे प्रवचन, सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. भगवंत चव्हाण माळखांबी यांचे किर्तन,
रात्री ९ ते ११ भालेवाडी, वडदेगाव, रहाटेवाडी, माचणूर, घरनिंकी तसेच मंगळवेढा शहरातील सर्व भजनी मंडळ यांचा जागर,
गुरुवार दि. २३ मे रोजी सकाळी ९ ते १२ संगीत विशारद कु. प्रियांका क्षिरसागर गुंजेगाव, दत्तात्रय डोंगरे अनवली, संगीत अलंकार रामदास रोंगे व मंगळवेढा तालुक्यातील व शहरातील सर्व भजनी मंडळ यांचे संगीत भजन,
दुपारी १२ ते ४ नामवंतांचे भारुड, ४ ते ५ ह.भ.प. दिनानाथ जाधव-नांद्रेकर यांचे प्रवचन, दुपारी ४.३० ते सायंकाळी ६.४५ श्री संत दामाजीपंत यांच्या पुण्यतिथीनिमित्त वासकर फडाचे फड प्रमुख गुरुवर्य विठ्ठलदादा वासकर महाराज यांचे किर्तन,
तसेच सायंकाळी ७ ते ९ ह.भ.प. दिगंबर एकनाथ फंड दादपूर ता. मोहोळ यांचे किर्तन, रात्री ९ ते ११ भालेवाडी, शेळवे, पांढरेवाडी, माळखांबी, मारापूर, तावशी, मंगळवेढा शहरातील सर्व भजनी मंडळ यांचा जागर,
शुक्रवार दि. २४ मे रोजी सकाळी १० ते १२ अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह.भ.प. सुधाकर इंगळे महाराज यांचे काल्याचे किर्तन तसेच ह.भ.प. नामदेव आबा दिंडीवाले पंढरपूर यांचे दहीहंडी सोहळा त्यानंतर दामाजी हमाल सोसायटी मंगळवेढा यांचे यांचा महाप्रसाद संपन्न होईल.
तरी मंगळवेढा शहर व तालुक्यातील सर्व भाविकांनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे व्यवस्थापक आनंदराव जावळे यांनी केले आहे.
पंढरपूर येथे श्री दामाजीपंत मठात गुरुवार दि.२३ मे रोजी वैशाख शुध्द पौर्णिमा या दिवशी पुण्यतिथी सोहळा दत्ताजीराव कल्याणराव पाटील यांच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. तरी यासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन विष्णूपंत आवताडे यांनी केले आहे.
अशाच महत्वपूर्ण बातम्या आणि माहीती मनोरंजन मिळवा तुमच्या व्हॉट्सअँप ग्रूपमध्ये, त्यासाठी पुढील नंबर तुमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट करा – 9970766262
“मंगळवेढा टाईम्स”च्या बातम्या मिळविण्यासाठी 9970766262 हा नंबर तुमच्या व्हॉट्सऍपवर ग्रुपवर ऍड करून फक्त एक मेसेज करा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी Mangalwedha Times वर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट मंगळवेढा टाईम्स.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा.
बातम्या सर्वप्रथम जाणून घेण्याकरिता लाईक करा आमचे फेसबुक पेज